पंतप्रधानांनी स्मृती वन उद्घाटन दिवसाच्या आठवणींना दिला उजाळा
August 29th, 08:32 pm
2001 च्या गुजरात भूकंपात प्राण गमावलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून उभारण्यात आलेल्या स्मृती वन उद्घाटन दिवसाच्या आठवणींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उजाळा दिला आहे.Smriti Van chronicles Gujarat’s resilience: PM
October 14th, 09:56 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi has expressed happiness that people are visiting Smriti Van in Bhuj to pay tribute to the those tragically lost in the Earthquake of 2001Development of Kutch is a perfect example of a meaningful change with 'Sabka Prayas': PM
August 28th, 11:54 am
PM Modi inaugurated and laid the foundation stone of projects worth around Rs 4400 crore in Bhuj. Addressing the gathering, the Prime Minister said that Smriti Van Memorial in Bhuj and Veer Bal Smarak at Anjar are the symbols of shared pain of Kutch, Gujarat and the entire country.पंतप्रधानांच्या हस्ते भुजमध्ये सुमारे 4400 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी
August 28th, 11:53 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भुजमध्ये सुमारे 4400 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. तत्पूर्वी त्यांनी भुज जिल्ह्यातील स्मृती वन स्मारकाचं उद्घाटनही केलं. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले, की भुज येथील स्मृती वन स्मारक आणि अंजार येथील वीर बाल स्मारक हे कच्छ, गुजरात आणि संपूर्ण देशानं एकत्रित भोगलेल्या वेदनांचं प्रतीक आहेत. अंजार स्मारकाची संकल्पना कशी पुढे आली आणि ‘कर सेवा’ या स्वयंसेवी कार्यातून स्मारक पूर्ण करण्याचा संकल्प कसा केला गेला, या पूर्वस्मृतिंना त्यांनी यावेळी उजाळा दिला. विनाशकारी भूकंपात प्राण गमावलेल्यांच्या स्मरणार्थ ही स्मारकं, अत्यंत जड अंतःकरणानं समर्पित करण्यात येत असल्याचं ते म्हणाले. कार्यक्रमात झालेल्या आपल्या हृद्य स्वागताबद्दल त्यांनी जनतेचे आभारही मानले.पंतप्रधान 27-28 ऑगस्ट रोजी गुजरात दौऱ्यावर
August 25th, 03:28 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 आणि 28 ऑगस्ट रोजी गुजरातला भेट देणार आहेत. 27 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5:30 वाजता पंतप्रधान अहमदाबादमधील साबरमती काठावर खादी उत्सवाला संबोधित करतील. 28 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता पंतप्रधान भुज येथील स्मृती वन स्मारकाचे उद्घाटन करतील. त्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास पंतप्रधान भुजमध्ये विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. संध्याकाळी 5 वाजता, पंतप्रधान गांधीनगरमध्ये भारतातील सुझुकीला 40 वर्षं पूर्ण झाल्यानिमित्ताने एका कार्यक्रमाला संबोधित करतील.