स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 मधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा मजकूर
December 11th, 05:00 pm
मी लाल किल्ल्यावरून बोलताना नेहमी एका गोष्टीचा उल्लेख केला आहे तो तुमच्या लक्षात असेलच. हे म्हणालो होतो ‘सबका प्रयास’, आजचा भारत सर्वांच्या प्रयत्नांनीच जलद गतीने प्रगती करू शकतो. आजचा हा दिवस याचेच उदाहरण आहे. स्मार्ट इंडिया हॅकेथॉन’च्या या ग्रँड फिनाले ची मला बरेच दिवसांपासून प्रतीक्षा होती. जेव्हा जेव्हा मला तुमच्यासारख्या युवा नवोन्मेषकांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळते, मला खूप काही जाणून घेण्याची शिकण्याची आणि समजून घेण्याची नामी संधी मिळते. माझ्या तुम्हा सगळ्यांकडून खूप काही अपेक्षा देखील असतात. 21 व्या शतकातील भारताकडे पाहण्याचा तुम्हा सर्व नवोन्मेषकांचा दृष्टिकोन वेगळाच आहे आणि म्हणूनच तुमचे पर्याय देखील वेगळेच असतात. म्हणूनच जेव्हा तुमच्यासमोर नवीन आव्हाने उभी राहतात तेव्हा तुम्ही त्यांचे नवीन आणि अनोख्या प्रकारचे उत्तर शोधून काढता. मी यापूर्वी देखील अनेक हॅकेथॉन’चा भाग झालो होतो. तुम्ही माझी कधीही निराशा केली नाही. नेहमीच माझा विश्वास वाढवला आहे. तुमच्या पूर्वीचे जे संघ होते, त्यांनी पर्याय शोधून काढले होते. आज ते पर्याय वेगवेगळ्या मंत्रालयात खूप कमी येत आहेत. आता या हॅकेथॉन मध्ये देशाच्या विविध भागातून आलेले संघ काय करत आहेत? मी मी तुमच्या नवोन्मेषाबाबत जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहे. चला तर मग सुरुवात करू, सर्वप्रथम कोण आमच्याशी संवाद साधणार आहे?पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 मधील सहभागींशी साधला संवाद
December 11th, 04:30 pm
नरेंद्र मोदी यांनी आज स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 च्या ग्रँड फिनालेमध्ये तरुण नवोन्मेषकर्त्यांबरोबर दूरदृश्य प्रणालीमार्फत संवाद साधला. लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात आपण दिलेल्या 'सबका प्रयास' या मंत्राचा पुनरुच्चार केल्याची आठवण पंतप्रधानांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना करून दिली. आजचा भारत सबका प्रयास अर्थात सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांनी प्रगतीच्या दिशेने वेगाने मार्गक्रमण करू शकतो आणि आजचा उपक्रम हे त्याचेच उदाहरण आहे, असे ते म्हणाले. आपण स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 च्या ग्रँड फिनालेची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत होतो असे सांगून पंतप्रधान म्हणाले की युवा नवोन्मेषीच्या बरोबर असताना आपल्याला नेहमीच काहीतरी शिकण्याची आणि त्यांच्याकडून काहीतरी नवीन गोष्ट समजून घेण्याची संधी मिळते. आपल्याला तरुण नवोन्मेषांकडून खूप अपेक्षा असून त्यांच्याकडे एकविसाव्या शतकातील भारताकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन असल्याचे त्यांनी सांगितले. तुमचे उपाय वेगळे असतात आणि म्हणूनच जेव्हा एखादे नवीन आव्हान उभे राहते तेव्हा तुम्ही नवीन आणि अभिनव उपाय सादर करता असे पंतप्रधान म्हणाले. गेल्या काही हॅकेथॉनला आपण उपस्थित होतो याचे स्मरण करून पंतप्रधान म्हणाले की या उपक्रमातून मिळालेल्या यशाने आपल्याला कधीच निराश केले नाही. “तुम्ही माझा विश्वास वाढवला आहे”, हे अधोरेखित करत त्यांनी सांगितले की याआधीचे अभिनव उपाय विविध मंत्रालयांमध्ये अंमलात आणले जात आहेत. आपल्याला सहभागींबद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल असे सांगत पंतप्रधानांनी संवादाला सुरुवात केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 डिसेंबर रोजी स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 च्या सहभागींशी साधणार संवाद
December 09th, 07:38 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 4:30 वाजता स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 च्या ग्रँड फिनालेमध्ये तरुण नवोन्मेषांबरोबर दूरदृश्य प्रणालीमार्फत संवाद साधणार आहेत. या ग्रँड फिनालेमध्ये 1300 हून अधिक विद्यार्थी संघ सहभागी होतील. पंतप्रधान या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करणार आहेत.पंतप्रधान पोलीस महासंचालक/महानिरीक्षकांच्या ५९व्या अखिल भारतीय परिषदेत सहभागी
December 01st, 07:49 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर 2024 रोजी भुवनेश्वर येथे पोलिस महासंचालक/महानिरीक्षकांच्या 59 व्या अखिल भारतीय परिषदेला उपस्थित होते.स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन 2023 च्या महाअंतिम फेरीतील सहभागींसोबत झालेल्या संवादात पंतप्रधानांनी केलेले मार्गदर्शन
December 19th, 11:32 pm
खरेच तुम्हा सगळ्यांशी बोलून खूप छान वाटले . देशासमोरील सध्याच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी देशातील तरुण पिढी अहोरात्र काम करत आहे ,याचा मला आनंद आहे. आधीच्या हॅकॅथॉनमधून मिळालेले उपाय खूप प्रभावी ठरले आहेत. हॅकॅथॉनमध्ये सहभागी झालेल्या अनेक विद्यार्थ्यांनी स्वत:चे स्टार्टअपही सुरू केले आहेत. हे स्टार्टअप्स, हे उपाय सरकार आणि समाज दोघांनाही मदत करत आहेत. आज या हॅकॅथॉनमध्ये सहभागी झालेल्या संघांसाठी आणि हजारो विद्यार्थ्यांसाठी ही मोठी प्रेरणा आहे.स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2023 च्या महाअंतिम फेरीमधल्या स्पर्धकांना पंतप्रधानांनी केले संबोधित
December 19th, 09:30 pm
स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2023 च्या महाअंतिम फेरीमधल्या स्पर्धकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला आणि त्यांना संबोधित केले.पंतप्रधान 19 डिसेंबर रोजी स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2023 च्या महाअंतिम फेरीमधील स्पर्धकांशी साधणार संवाद
December 18th, 06:52 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 डिसेंबर 2023 रोजी रात्री 9:30 वाजता स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2023 च्या महाअंतिम फेरीच्या स्पर्धकांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधणार आहेत. यावेळी पंतप्रधान स्पर्धकांना मार्गदर्शन करतील.India of 21st century is moving ahead with full confidence in its youth: PM
August 25th, 08:01 pm
PM Modi addressed the Grand Finale of Smart India Hackathon 2022. Reiterating his Independence Day proclamation about the aspirational society, the PM said that this aspirational society will work as a driving force in the coming 25 years. Aspirations, dreams and challenges of this society will bring forth many opportunities for the innovators, he added.पंतप्रधानांनी स्मार्ट इंडिया हॅकाथॉन 2022 च्या समारोप कार्यक्रमाला केले संबोधित
August 25th, 08:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्मार्ट इंडिया हॅकाथॉन 2022 च्या समारोप कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केले.स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2022 च्या अंतिम फेरीच्या, 25 ऑगस्ट रोजी होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार मार्गदर्शन
August 23rd, 04:23 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 25 ऑगस्टला, रात्री 8 वाजता स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2022 च्या अंतिम फेरीच्या कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन करतील.Country's development is getting new momentum by the youth: PM
May 14th, 09:59 am
The Prime Minister, Shri Narendra Modi launched the Madhya Pradesh Startup Policy during the Madhya Pradesh Startup Conclave being held in Indore, today, via video conferencing. He also launched the Madhya Pradesh Startup portal, which will facilitate and help promote the startup ecosystem. He also interacted with the startup entrepreneurs.मध्य प्रदेश स्टार्टअप कॉन्क्लेव्हमध्ये पंतप्रधानांनी मध्य प्रदेश स्टार्टअप धोरणाचा केला प्रारंभ
May 13th, 06:07 pm
मध्य प्रदेश स्टार्टअप कॉन्क्लेव्हमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल इंदूर इथं मध्य प्रदेश स्टार्टअप धोरणाचा दूरदृश्य प्रणालीद्वारे शुभारंभ केला. त्यांनी स्टार्टअप इकोसिस्टिम अर्थात परिसंस्थेला चालना देणाऱ्या आणि ती सुलभ करणाऱ्या मध्य प्रदेश स्टार्टअप पोर्टलचेही उद्घाटन केले. त्यांनी स्टार्टअप व्यावसायिकांशीही संवाद साधला.India has a rich legacy in science, technology and innovation: PM Modi
December 22nd, 04:31 pm
Prime Minister Narendra Modi delivered the inaugural address at India International Science Festival (IISF) 2020. PM Modi said, All our efforts are aimed at making India the most trustworthy centre for scientific learning. At the same time, we want our scientific community to share and grow with the best of global talent.PM delivers inaugural address at IISF 2020
December 22nd, 04:27 pm
Prime Minister Narendra Modi delivered the inaugural address at India International Science Festival (IISF) 2020. PM Modi said, All our efforts are aimed at making India the most trustworthy centre for scientific learning. At the same time, we want our scientific community to share and grow with the best of global talent.Pan IIT movement can help realise dream of Aatmanirbhar Bharat: PM Modi
December 04th, 10:35 pm
PM Narendra Modi delivered the keynote address at the Pan IIT-2020 Global Summit. PM Modi lauded the contributions of the IIT alumni in every sphere around the world and asked them to train the future minds in a way that they could give back to the country and create an Atmanirbhar Bharat.PM delivers keynote address at IIT-2020 Global Summit
December 04th, 09:51 pm
PM Narendra Modi delivered the keynote address at the Pan IIT-2020 Global Summit. PM Modi lauded the contributions of the IIT alumni in every sphere around the world and asked them to train the future minds in a way that they could give back to the country and create an Atmanirbhar Bharat.पंतप्रधानांचे बेंगळुरू तंत्रज्ञान शिखर परिषद येथील भाषण
November 19th, 11:01 am
माझ्या मंत्रिमंडळातील सहकारी श्री रवीशंकर प्रसादजी, कर्नाटकचे मुख्यमंत्री श्री बी एस येडीयुरप्पाजी आणि तंत्रज्ञान जगतातील माझ्या प्रिय मित्रांनो. तंत्रज्ञानावरील महत्त्वपूर्ण शिखर परिषद आयोजित करण्यात तंत्रज्ञान मदत करत आहे हे देखील योग्य आहे.पंतप्रधानांनी बंगळुरू टेक समिट अर्थात तंत्रज्ञान शिखर परिषदेचे केले उद्घाटन
November 19th, 11:00 am
आज डिजिटल इंडियाकडे कोणताही नियमित शासकीय उपक्रम म्हणून पाहिले जात नाही, तर आज ती विशेषत: गरीब, उपेक्षित आणि सरकारमधील लोकांसाठी जीवनशैली बनली आहे याविषयी पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला .स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2020 च्या अंतीम फेरी कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
August 01st, 04:47 pm
आपण सर्वजण एकापेक्षा एक पर्यायांच्या, समाधानांच्या शोधासाठी काम करीत आहात. देशासमोर आज जी आव्हाने आहेत, प्रश्न आहेत, त्यांच्यावर उत्तर तर नक्कीच शोधली जात आहेत ; डाटा, डिजिटाझेशन आणि हाय-टेक फ्यूचर यांच्याविषयी भारताच्या आकांक्षानाही बळकटी मिळत आहे.स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2020 च्या ग्रँड फिनालेला पंतप्रधानांनी केले संबोधित
August 01st, 04:46 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2020 च्या ग्रँड फिनालेला व्हिडीओ कॉन्फरसिंग द्वारे संबोधित केले.