भारतीय समुदायाने वेगवेगळ्या देशांमध्ये आपला ठसा उमटवला आहे: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

November 24th, 11:30 am

मन की बात च्या 116 व्या भागात, पंतप्रधान मोदींनी NCC छात्रांचा विकास आणि आपत्ती निवारणाच्या कार्यातील त्यांची भूमिका यावर प्रकाश टाकत NCC दिनाचे महत्व विशद केले. विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी तरुणांचे सक्षमीकरण होण्याची गरज त्यांनी स्पष्ट करण्यासोबतच विकसित भारत यंग लीडर्स डायलॉगची चर्चा केली. ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करण्यास मदत करणाऱ्या तरुणांच्या प्रेरणादायी कथा आणि एक पेड माँ के नाम मोहिमेचे यशही त्यांनी शेअर केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्लोव्हाक गणराज्याचे पंतप्रधान एडूआर्ड हेगर यांच्यात फोनवरून संभाषण

February 28th, 09:48 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्लोव्हाक गणराज्याचे पंतप्रधान एडूआर्ड हेगर यांच्याशी फोनवरून संवाद साधला.

लखनौमधे उत्तर प्रदेश गुंतवणुकदार शिखर परिषदेचे 21 फेब्रुवारीला पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन

February 20th, 07:34 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या लखनौ येथे दोन दिवसीय उत्तर प्रदेश गुंतवणुकदार शिखर परिषद 2018 चे उद्‌घाटन करणार आहेत. राजनाथ सिंह, अरुण जेटली, निर्मला सीतारमण, नितीन गडकरी, सुरेश प्रभू, स्मृती इराणी, रवी शंकर प्रसाद, डॉ. हर्षवर्धन, व्ही.के.सिंग, धर्मेंद्र प्रधान यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री या परिषदेत सहभागी होऊन राज्यासाठी गुंतवणूक आणण्यासाठी वेगवेगळ्या सत्रांचे अध्यक्षपद भूषवणार आहेत. पंतप्रधान 21 फेब्रुवारीला शिखर परिषदेचे उद्‌घाटन करतील तर राष्ट्रपती रामनाथ कोविंद समारोपाच्या सत्राला उपस्थित राहतील.