त्रिशूरमधील श्री सीताराम स्वामी मंदिरातील कार्यक्रमात व्हिडिओ संदेशाद्वारे पंतप्रधानांनी केलेले भाषण
April 25th, 09:21 pm
केरळ आणि त्रिशूर मधील माझ्या सर्व बंधू भगिनींना त्रिशूरपूरम् पर्वाच्या खूप-खूप शुभेच्छा. त्रिशूर ही केरळची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते. जिथे संस्कृती असते, तिथे परंपराही असते, तिथे कलाही असतात. तिथे अध्यात्मही असते तसेच तत्वदर्शनही असते. तिथे सण उत्सवही असतात तसेच हर्षोल्लासही असतो. मला आनंद आहे की त्रिशूर हा वारसा आणि ओळख जिवंत ठेवत आहे. श्री सीताराम स्वामी मंदिर, गेल्या अनेक वर्षांपासून या दिशेने एक ऊर्जा केंद्र म्हणून काम करत आहे. मला सांगण्यात आले आहे की तुम्ही सर्वांनी हे मंदिर आता आणखी दिव्य आणि भव्य केले आहे. या प्रसंगी सुवर्णजडीत गर्भगृह भगवान श्रीसीताराम, भगवान अयप्पा आणि भगवान शिव यांना समर्पित केले जात आहे.पंतप्रधानांनी केरळमधील थ्रिसुर येथील श्री सीताराम स्वामी मंदिरातील कार्यक्रमाला संबोधित केले
April 25th, 09:20 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून थ्रिसुर येथील श्री सीताराम स्वामी मंदिरातील कार्यक्रमाला संबोधित केले. थ्रिसुर पूरम उत्सवाच्या पवित्र पर्वावर त्यांनी सर्वाना शुभेच्छा दिल्या.भारत परिक्रमा पदयात्रा यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर सिताराम केडिलया यांनी पंतप्रधानांची भेट घेतली
August 11th, 06:01 pm
भारत परिक्रमा पदयात्रा यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर सिताराम केडिलया यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. केडिलया यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी 9 ऑगस्ट 2012 रोजी कन्याकुमारी येथून भारत परिक्रमा पदयात्रेला सुरुवात केली आणि यावर्षी 9 जुलै रोजी कन्याकुमारी येथे ही यात्रा पूर्ण केली.