पंतप्रधानांचा सिंगापूरमधील व्यावसायिक नेत्यांशी संवाद

September 05th, 04:57 pm

पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुंतवणूक निधी, पायाभूत सुविधा, उत्पादन, ऊर्जा, शाश्वतता आणि रसदशास्त्र आदी विविध क्षेत्रांत कार्यरत सिंगापूरमधील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या गटाशी संवाद साधला. सिंगापूरचे उपपंतप्रधान गान किम योंग आणि गृह व कायदे मंत्री के षण्मुगम या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंगापूरचे मानद वरिष्ठ मंत्री गोह चोक टोंग यांची भेट घेतली

September 05th, 03:10 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिंगापूरमध्ये त्या देशाचे मानद वरिष्ठ मंत्री गोह चोक टोंग यांची भेट घेतली.

सिंगापूरच्या राष्ट्रपतींसोबत पंतप्रधानांची भेट

September 05th, 03:00 pm

भारत - सिंगापूर भागीदारीसाठी राष्ट्रपती थर्मन यांच्या समर्थनाची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. दोन्ही नेत्यांनी परस्पर हिताच्या द्विपक्षीय आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली. विश्वास, परस्परांचा आदर आणि पूरकतेवर आधारित दोन्ही देशांमधील दीर्घकालीन मैत्री आणि सहकार्याची त्यांनी नोंद घेतली. या संदर्भात, त्यांनी नमूद केले की हे संबंध सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीत रूपांतरित झाल्यामुळे संयुक्त सहकार्यासाठी पुढे जाण्याचा एक ठोस मार्ग आखला जाईल. प्रगत उत्पादन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान यासारख्या नवीन क्षेत्रांमध्ये भारत आणि सिंगापूर कशा प्रकारे सहकार्याचा विस्तार करू शकतात यावर त्यांनी विचार सामायिक केले. पुढील वर्षी राष्ट्रपती थर्मन यांचे भारतात स्वागत करण्यास उत्सुक असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

पंतप्रधानांची सिंगापूरचे वरिष्ठ मंत्री ली सिएन लूंग यांच्यासोबत बैठक

September 05th, 02:18 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिंगापूरचे वरिष्ठ मंत्री आणि माजी पंतप्रधान महामहिम ली सिएन लूंग यांची भेट घेतली. यावेळी मंत्री महोदयांनी पंतप्रधानांच्या सन्मानार्थ दुपारच्या भोजनाचे आयोजन केले होते.

पंतप्रधानांनी एईएम सिंगापूरला दिली भेट

September 05th, 12:31 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्या समवेत सिंगापूरमधील सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी एईएम ला भेट दिली. यावेळी त्यांना जागतिक सेमीकंडक्टर मूल्य साखळीतील एईएम ची भूमिका, तिचे कार्य आणि भारतासाठीच्या योजना यांबाबत माहिती देण्यात आली. सिंगापूर सेमीकंडक्टर उद्योग संघटनेनें सिंगापूरमधील सेमीकंडक्टर परिसंस्थेचा विकास आणि भारताबरोबर सहकार्याच्या संधी याविषयी थोडक्यात माहिती दिली. या क्षेत्रातील सिंगापूरमधील अन्य विविध कंपन्यांचे प्रतिनिधीही यावेळी उपस्थित होते. ग्रेटर नोएडा येथे 11-13 सप्टेंबर 2024 रोजी होणाऱ्या सेमिकॉन इंडिया प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी पंतप्रधानांनी सिंगापूरच्या सेमीकंडक्टर कंपन्यांना आमंत्रित केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरच्या पंतप्रधानांची भेट

September 05th, 10:22 am

यावेळी झालेल्या चर्चेत दोन्ही नेत्यांनी भारत-सिंगापूर द्विपक्षीय संबंधांच्या प्रगतीचा आढावा घेतला. द्विपक्षीय संबंधांची व्यापकता आणि सखोलता तसेच अफाट क्षमता लक्षात घेत, त्यांनी हे संबंध सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला.यामुळे भारताच्या ऍक्ट ईस्ट धोरणालाही मोठी चालना मिळेल. आर्थिक संबंधांमधील मजबूत प्रगतीचा आढावा घेतल्यावर उभय नेत्यांनी दोन्ही देशांदरम्यान व्यापार आणि गुंतवणुकीचा ओघ आणखी वाढवण्याचे आवाहन केले. भारतीय अर्थव्यवस्थेत सुमारे 160 अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या गुंतवणुकीसह सिंगापूर हा भारतासाठी एक प्रमुख आर्थिक भागीदार असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. ते पुढे म्हणाले की, भारतातील वेगवान आणि शाश्वत विकासामुळे सिंगापूरच्या कंपन्यांसाठी गुंतवणुकीच्या अफाट संधी खुल्या झाल्या आहेत. त्यांनी संरक्षण आणि सुरक्षा, सागरी क्षेत्रातील सजगता , शिक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता , फिनटेक, नवीन तंत्रज्ञान क्षेत्र , विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि ज्ञान भागीदारी या क्षेत्रातील विद्यमान सहकार्याचा देखील आढावा घेतला. उभय नेत्यांनी आर्थिक तसेच दोन्ही देशांमधील जनतेमधील संबंध वृद्धिंगत करण्यासाठी दोन्ही देशांमधील कनेक्टिव्हीटी अधिक बळकट करण्याचे आवाहन केले. ग्रीन कॉरिडॉर प्रकल्पांना गती देण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.

सिंगापूरच्या पंतप्रधानांच्या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

September 05th, 09:00 am

आपण पंतप्रधान पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरची आपली ही पहिलीच भेट आहे. मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा. आपल्या नेतृत्वाखालील 4G च्या आयोजनाने सिंगापूर आणखी वेगाने प्रगती साधेल, असा मला विश्वास आहे.

PM Modi arrives in Singapore

September 04th, 02:00 pm

PM Modi arrived in Singapore. He will hold talks with President Tharman Shanmugaratnam, Prime Minister Lawrence Wong, Senior Minister Lee Hsien Loong and Emeritus Senior Minister Goh Chok Tong.

पंतप्रधानांचा ब्रुनेई दारुस्सलाम आणि सिंगापूर दौरा

September 03rd, 07:30 am

पुढील दोन दिवसांत पंतप्रधान मोदी ब्रुनेई दारुस्सलाम आणि सिंगापूरला भेट देणार आहेत. भारत-ब्रुनेई दारुसलाममध्ये पंतप्रधान मोदी महाराज सुलतान हाजी हसनल बोलकिया यांची भेट घेणार आहेत. सिंगापूरमध्ये ते अध्यक्ष थर्मन षण्मुगरत्नम, पंतप्रधान लॉरेन्स वोंग, वरिष्ठ मंत्री ली सिएन लूंग आणि एमेरिटस वरिष्ठ मंत्री गोह चोक टोंग यांच्याशी चर्चा करतील.

श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये यु पी आय सेवांची सुरूवात करताना पंतप्रधानांच्या संबोधनाचा मजकूर

February 12th, 01:30 pm

सन्माननीय राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे जी, सन्माननीय पंतप्रधान प्रविंद जुगनौथ जी, भारताचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर जयशंकर जी, श्रीलंका, मॉरीशस आणि भारत यांच्या मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नर आणि आज या महत्वपूर्ण कार्यक्रमाशी संबंधित सर्व सहकारी

पंतप्रधानांनी मॉरिशसचे पंतप्रधान आणि श्रीलंकेच्या अध्यक्षांसोबत संयुक्तपणे केले युपीआय सेवांचे उद्‌घाटन

February 12th, 01:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ यांच्यासोबत संयुक्तपणे श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये यूनिफाईड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) सेवांचे आणि मॉरिशसमधील रुपे कार्ड सेवांचे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्‌घाटन केले.

भारताचा संगीत इतिहास हा विविधतेचा संगम, हजारो वर्षांपासून विकसित झालेल्या तालांचा प्रतिध्वनी: पंतप्रधान

November 14th, 09:43 am

सतारबद्दल असलेल्या प्रेमासाठी पंतप्रधानांनी सिंगापूरच्या उपपंतप्रधानांचे केले कौतुक

महाराष्ट्रातील 511 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचा प्रारंभ करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण

October 19th, 05:00 pm

नवरात्रीचा पवित्र उत्सव सुरु आहे. आज नवरात्रीचा पाचवा दिवस असून या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते. प्रत्येक आई तिच्या मुलांना सुख आणि यश लाभो अशी प्रार्थना करते. सुख आणि यशाची प्राप्ति केवळ शिक्षण आणि कौशल्याद्वारेच शक्य आहे. आजच्या शुभ प्रसंगी महाराष्ट्रातील आपल्या मुलामुलींच्या कौशल्य विकासासाठी एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचा शुभारंभ होत आहे. आणि माझ्या समोर जे लाखो युवक बसले आहेत आणि ज्यांनी या कौशल्य विकासाच्या मार्गावर पुढे चालण्याचा संकल्प केला आहे, त्यांना मी अवश्य सांगेन की त्यांच्या जीवनात आजची ही सकाळ मंगल प्रभात बनून आली आहे. महाराष्ट्रात 511 ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांची स्थापना होणार आहे.

पंतप्रधानांच्या हस्ते महाराष्ट्रातील 511 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचा प्रारंभ

October 19th, 04:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 511प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रांचा प्रारंभ केला. ग्रामीण युवकांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्राच्या 34 ग्रामीण जिल्ह्यांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या या केंद्रांमध्ये विविध क्षेत्रांतील कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जाणार आहेत.

सिंगापूरचे माजी पंतप्रधान ली कुआन यू यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून आदरांजली

September 16th, 02:25 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंगापूरचे माजी पंतप्रधान ली कुआन यू यांना 100 व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.

जागतिक जैवइंधन आघाडीची (GBA) स्थापना

September 09th, 10:30 pm

नवी दिल्लीत G20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सिंगापूर, बांगलादेश, इटली, अमेरिका, ब्राझील, अर्जेंटिना, मॉरिशस आणि संयुक्त अरब अमिरातीच्या प्रमुखांनी 9 सप्टेंबर 2023 रोजी जागतिक जैवइंधन आघाडीची स्थापना केली.

The East Asia Summit plays a pivotal role as the primary confidence-building mechanism in Asia: PM Modi

September 07th, 01:28 pm

PM Modi addressed the East Asia Summit in Jakarta, Indonesia. He said the East Asia Summit is a very important platform. It is the only leaders-led mechanism for dialogue and cooperation on strategic matters in the Indo-Pacific region. He added that additionally, it plays a pivotal role as the primary confidence-building mechanism in Asia and the key to its success is ASEAN centrality.

20 वी आसियान-भारत शिखर परिषद आणि 18 व्या पूर्व आशिया शिखर परिषदेत पंतप्रधानांचा सहभाग

September 07th, 11:47 am

आसियान-भारत व्यापक धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यावर आणि त्याच्या भावी वाटचालीसाठी आसियान भागीदारांशी, आसियान-भारत शिखर परिषदेत, पंतप्रधानांनी विस्तृत चर्चा केली. हिंद-प्रशांत क्षेत्रातील आसियानच्या केंद्रस्थानाचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. भारताच्या हिंद-प्रशांत महासागर पुढाकार (IPOI) आणि हिंद-प्रशांत (AOIP) वरील आसियानचा दृष्टीकोन यांच्यातील समन्वयावरही त्यांनी प्रकाश टाकला. आसियान-भारत एफटीएचा (AITIGA) आढावा कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याच्या गरजेवरही त्यांनी भर दिला.

विसाव्या आसियान -भारत शिखर संमेलनाच्या आरंभी पंतप्रधानांनी केलेले भाषण

September 07th, 10:39 am

अशा प्रसंगी भारत– आसियान शिखर संमेलनात सहअध्यक्षपद भूषविणे,ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची पर्वणी आहे

सिंगापूरच्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकल्याबद्दल थर्मन षणमुगरत्नम यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

September 02nd, 10:40 am

सिंगापूरचे राष्ट्रपती म्हणून निवड झाल्याबद्दल थर्मन षण्मुगररत्नम यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.