झारखंडमधील सिंद्री येथे विविध प्रकल्पांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
March 01st, 11:30 am
झारखंडचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन जी, मुख्यमंत्री चंपई सोरेन जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी अर्जुन मुंडा जी, विधानसभेतील विरोधी पक्षनेते , अन्य मान्यवर आणि झारखंडच्या बंधू आणि भगिनींनो, जोहार ! आज झारखंडला 35 हजार कोटी रुपयांहून अधिक योजनांची भेट मिळाली आहे. मी माझ्या शेतकरी बांधवांचे , माझ्या आदिवासी समाजातील लोकांचे आणि झाऱखंडच्या जनतेचे या योजनांसाठी खूप-खूप अभिनंदन करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमधील धनबाद येथे केली सुमारे 35,700 कोटी रुपये खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्र समर्पण
March 01st, 11:04 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज झारखंड मधील धनबाद शहरातल्या सिंद्री येथे 35,700 कोटी रुपये खर्चाच्या बहुविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्र समर्पण केले. आजच्या विकास प्रकल्पांमध्ये खते, रेल्वे, वीज आणि कोळसा या क्षेत्रांचा समावेश आहे. मोदींनी एचयूआरएल प्रारुपाची पाहणी केली आणि सिंद्री सयंत्राच्या कंट्रोल नियंत्रण कक्षाची पाहणी देखील केली.