दिल्लीतील लाल किल्ल्यावर आयोजित, इंडिया आर्ट, आर्किटेक्चर आणि डिझाईन बिएनाले 2023, या भारतीय कला, वास्तूकला आणि रचना या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर

December 08th, 06:00 pm

प्रत्येक राष्ट्राची स्वतःची अशी प्रतिके-खुणा असतात. या खुणा जगाला त्या देशाच्या भूतकाळाची आणि त्याच्या मूल्यांची ओळख करून देतात. आणि, ही प्रतिके घडवण्याचे काम राष्ट्राच्या कला, संस्कृती आणि वास्तू करत असतात. राजधानी दिल्ली अशा अनेक प्रतिकांचे केंद्र आहे, ज्यात आपल्याला भारतीय वास्तुच्या भव्यतेचे दर्शन घडते. त्यामुळे दिल्लीत आयोजित ‘इंडिया आर्ट आर्किटेक्चर अँड डिझाईन बिएनाले’ हा भारतीय कला, वास्तूरचना शास्त्र आणि रचना महोत्सव, अनेक अर्थांनी विशेष आहे. मी इथे उभारलेली, सजवलेली दालने बघत होतो, आणि मी उशीरा आलो त्याबद्दल तुमची माफी देखील मागतो कारण मला यायला उशीर याच कारणामुळे झाला..इथे अशा अनेक गोष्टी पाहण्यासारख्या आणि व्यवस्थित वेळ देऊन समजून घेण्यासारख्या असल्यामुळे त्यात वेळ जाऊन मला उशीर झाला. तरीही मला 2 ते 3 जागा सोडाव्या लागल्या. या दालनांमध्ये रंग आणि सर्जनशीलता आहे. त्यात संस्कृती आहे, तसेच सामाजिक प्रतिबिंब आहे. मी या यशस्वी आरंभाबद्दल, सांस्कृतिक मंत्रालय, त्याचे सर्व अधिकारी, सर्व सहभागी देश आणि तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो. आपल्याकडे असे म्हटले जाते की पुस्तक म्हणजे जग पाहण्याची एक लहानशी खिडकी म्हणून सुरुवात आहे. मी असे मानतो की कला हा मानवी मनातून प्रवास करण्याचा राजमार्ग आहे.

दिल्ली मधील लाल किल्ला येथे पंतप्रधानांच्या हस्ते पहिल्या इंडियन आर्ट, आर्किटेक्चर आणि डिझाईन बिएनाले 2023 चे उद्‌घाटन

December 08th, 05:15 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावर आयोजित पहिल्या इंडियन आर्ट, आर्किटेक्चर आणि डिझाईन बिएनाले 2023 (आयएएडीबी) अर्थात भारतीय कला, स्थापत्य आणि रचना द्वैवार्षिक कार्यक्रम 2023 चे उद्घाटन केले. कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर ‘आत्मनिर्भर भारत डिझाइन सेंटर’ आणि समुन्नती या विद्यार्थी द्वैवार्षिक कार्यक्रमाचे उद्घाटन केले. त्यांनी स्मृती तिकिटही प्रकाशित केले. याप्रसंगी आयोजित प्रदर्शनालाही मोदी यांनी भेट दिली. भारतीय कला, स्थापत्य आणि रचना द्वैवार्षिक कार्यक्रम दिल्लीतील सांस्कृतिक ठिकाणांची ओळख करून देईल.

सिंधुदुर्गातील नौदल दिन सोहळ्याची क्षणचित्रे पंतप्रधानांनी केली सामायिक

December 04th, 08:28 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग येथील नौदल दिन सोहळ्याची क्षणचित्रे सामायिक केली आहेत.

महाराष्ट्रात सिंधुदुर्ग येथे राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण

December 04th, 08:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग येथे राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले. पंतप्रधानांनी पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आणि छायाचित्र प्रदर्शनाला भेट दिली.

महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग इथे नौदल दिन 2023 कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले संबोधन

December 04th, 04:35 pm

महाराष्ट्राचे राज्यपाल श्रीमान रमेश जी, मुख्यमंत्री एकनाथ जी, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी राजनाथ सिंह जी, नारायण राणे जी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, अजीत पवार जी, सीडीएस जनरल अनिल चौहान जी, नौदल प्रमुख एडमिरल आर. हरी कुमार, नौदलाचे सर्व मित्र आणि माझ्या कुटुंबियांनो,

महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग येथे आयोजित नौदल दिन 2023 कार्यक्रमाला पंतप्रधानांची उपस्थिती

December 04th, 04:30 pm

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, मालवण, तारकर्ली किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग हा भव्य किल्ला , वीर शिवाजी महाराजांचे वैभव आणि राजकोट किल्ल्यावरील त्यांच्या नेत्रदीपक पुतळ्याचे लोकार्पण आणि भारतीय नौदलाचा जयघोष आणि 4 डिसेंबर या ऐतिहासिक दिवसामुळे भारतातील प्रत्येक नागरिकाचे मन उत्कटता आणि उत्साहाने भारावून गेले आहे.मोदी यांनी नौदल दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि देशासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या शूरवीरांपुढे नतमस्तक झाले.

पंतप्रधान 4 डिसेंबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर

December 02nd, 04:06 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 डिसेंबर 2023 रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. संध्याकाळी 4.15 च्या सुमारास महाराष्ट्रातील सिंधुदूर्ग इथे ते पोहोचतील आणि राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करतील. त्यानंतर सिंधुदूर्ग येथे 'नौदल दिन 2023' कार्यक्रमाला पंतप्रधान उपस्थित राहतील. पंतप्रधान भारतीय नौदलाची जहाजे, पाणबुड्या, विमाने आणि विशेष दलांची प्रात्यक्षिके सिंधुदुर्गातील तारकर्ली किनाऱ्यावरून पाहतील.