पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री गुरु गोविंद सिंग जी यांना त्यांच्या प्रकाश उत्सवानिमित्त वाहिली आदरांजली.

January 06th, 09:33 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री गुरु गोविंद सिंग जी यांना त्यांच्या प्रकाश उत्सवानिमित्त आदरांजली वाहिली. श्री गुरु गोविंद सिंग जी यांचे विचार आपल्याला प्रगतीशील, समृद्ध आणि दयाळू समाज निर्माण करण्यासाठी प्रेरणा देतील, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

PM Modi's candid interaction with Rashtriya Bal Puraskar winners

December 26th, 09:55 pm

PM Modi interacted with the 17 awardees of Rashtriya Bal Puraskar in New Delhi. During the candid interaction, the PM heard the life stories of the children and encouraged them to strive harder in their lives. He congratulated all the youngsters and wished them the very best for their future endeavours.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांशी साधला संवाद

December 26th, 09:54 pm

पंतप्रधानांनी या मुलाच्या जगण्याविषयी जाणून घेतले आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी कठोर परिश्रम करण्यास त्यांना प्रोत्साहन दिले. पुस्तके लिहिलेल्या एका लहान मुलीला त्यांनी पुस्तकांना कसा प्रतिसाद आहे असे विचारले असता तिने सांगितले की इतर लहान मुलेही आपापली पुस्तके लिहू लागली आहेत. तेव्हा मोदी यांनी इतर लहान मुलांना प्रेरणा दिल्याबद्दल तिचे कौतुक केले.

वीर बाल दिनानिमित्त पंतप्रधानांचे भाषण

December 26th, 12:05 pm

आज आपण सगळे इथं आपला तिसरा वीर बाल दिवस साजरा करण्यासाठी जमलो आहोत. वीर साहिबजादांच्या बलिदानाच्या अमर स्मृतीप्रित्यर्थ तीन वर्षांपूर्वी आमच्या सरकारनं वीर बाल दिवस साजरा करायला सुरुवात केली. आज हा दिवस अख्ख्या देशासाठी, देशातल्या करोडो लोकांसाठी राष्ट्रीय प्रेरणेचा उत्सव ठरला आहे. या दिवसानं भारतातल्या कित्येक मुलांमध्ये आणि युवकांमध्ये अदम्य साहसाची भावना जागृत केली आहे. शौर्य, नवोन्मेष, विज्ञान आणि तंत्रज्ञान, खेळ आणि कला यासारख्या क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या देशातल्या १७ मुलांचा आज सन्मान करण्यात आला. भारतातल्या लहान मुलांमध्ये, युवा पिढीत खूप काही करुन दाखवण्याची क्षमता आहे, हे या सर्वांनी दाखवून दिलं आहे. आजच्या या दिवशी मी आपल्या गुरुजनांना, वीर साहिबजादांना वंदन करुन पुरस्कार मिळालेल्या सर्व मुलांना शुभेच्छा देतो, त्यांच्या कुटुंबियांनाही शुभेच्छा देतो. या सर्वांचं मी संपूर्ण देशाच्या वतीनं अभिनंदन करतो.

नवी दिल्ली येथे आयोजित वीर बाल दिवस कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले सहभागी

December 26th, 12:00 pm

नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आज आयोजित वीर बाल दिवस कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले. तिसऱ्या वीर बाल दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना त्यांनी संबोधित केले. साहिबजादांच्या अतुलनीय शौर्य आणि बलिदानाच्या स्मृतीनिमित्त आपल्या सरकारने वीर बाल दिवस सुरू केल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. आता हा दिवस कोट्यवधी भारतीयांसाठी राष्ट्रीय प्रेरणेचा सण बनला असल्याचे त्यांनी सांगितले. या दिवसाने अनेक मुलांना आणि युवांना दुर्दम्य साहसाची प्रेरणा दिली आहे. मोदी यांनी आज शौर्य, नवनिर्मिती, विज्ञान आणि तंत्रज्ञान, क्रीडा आणि कला या क्षेत्रात वीर बाल पुरस्काराने सन्मानित झालेल्या 17 मुलांचे कौतुक केले. आजचे पुरस्कार विजेते विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्याच्या भारतीय मुले आणि युवांच्या क्षमतेचे प्रतीक आहेत. पंतप्रधानांनी यावेळी गुरूंना आणि वीर साहिबजादांना आदरांजली अर्पण केली आणि पुरस्कार विजेत्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन केले.

श्री गुरु नानक जयंतीनिमित्त,आज पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी दिल्या हार्दिक शुभेच्छा

November 15th, 08:44 am

श्री गुरु नानक जयंतीनिमित्त,आज पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.श्री गुरु नानक देवजी यांची शिकवण आपल्याला करुणा, दयाळूपणा आणि नम्रतेची भावना वृध्दींगत करण्यासाठी प्रेरित करतात, असे त्यांनी नमूद केले आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री गुरू ग्रंथ साहिबच्या प्रकाश पर्वा निमित्त दिल्या शुभेच्छा

September 04th, 03:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री गुरू ग्रंथ साहिबच्या प्रकाश पर्वा निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

शीख नववर्षाच्या पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

March 14th, 12:11 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शीख नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केलेः

श्री गुरु गोविंद सिंहजी यांच्या प्रकाश उत्सवानिमित्त पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली

January 17th, 08:13 am

श्री गुरु गोविंद सिंहजी यांच्या प्रकाश उत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे आणि त्यांच्या धैर्य तसेच करुणेचे स्मरण केले आहे. श्री गुरु गोविंद सिंग जी यांच्याविषयी व्यक्त केलेल्या भावनांची एक चित्रफीतही पंतप्रधानांनी सामायिक केली.

PM Narendra Modi addresses public meetings in Pali & Pilibanga, Rajasthan

November 20th, 12:00 pm

Amidst the ongoing election campaigning in Rajasthan, PM Modi’s rally spree continued as he addressed public meetings in Pali and Pilibanga. Addressing a massive gathering, PM Modi emphasized the nation’s commitment to development and the critical role Rajasthan plays in India’s advancement in the 21st century. The Prime Minister underlined the development vision of the BJP government and condemned the misgovernance of the Congress party in the state.

नानकशाही संमत 555 च्या प्रारंभानिमित्त पंतप्रधानांनी शीख समुदायाला दिल्या शुभेच्छा

March 14th, 09:56 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नानकशाही संमत 555 च्या प्रारंभानिमित्त जगभरातील शीख समुदायाला शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रकाश परब निमित्त पंतप्रधानांनी श्री गुरु गोविंद सिंग यांना केले नमन

December 29th, 10:03 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री गुरु गोविंद सिंगजी यांच्या प्रकाश परबच्या पवित्र प्रसंगी श्री गुरु गोविंद सिंग यांना श्रद्धांजली वाहिली.

नवी दिल्लीत वीर बाल दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण

December 26th, 04:10 pm

आज देश पहिला 'वीर बाल दिवस' साजरा करत आहे. ज्या दिवशी, ज्या बलिदानासाठी पिढ्यानपिढ्या आपण ज्या बलिदानाचे स्मरण करत आलो आहोत, आज एक राष्ट्र म्हणून एकजुटीने त्यांना वंदन करण्याची एक नवीन सुरुवात झाली आहे. शहीद सप्ताह आणि हा वीर बाल दिवस आपल्या शीख परंपरेसाठी नक्कीच भावनांनी भरलेला आहे, मात्र त्याच्याशी आकाशासारख्या चिरंतन प्रेरणा देखील जोडलेल्या आहेत. शौर्य दाखवण्यासाठी पराकाष्ठा करताना वय कमी असले तरी काही फरक पडत नाही, याची आठवण 'वीर बाल दिवस' आपल्याला करून देईल. वीर बाल दिवस' आपल्याला याची आठवण करून देईल की, दहा गुरूंचे योगदान काय आहे, देशाच्या स्वाभिमानासाठी शीख परंपरेचे बलिदान काय आहे! हा 'वीर बाल दिवस' आपल्याला सांगेल की -भारत काय आहे, भारताची अस्मिता काय आहे ! दरवर्षी वीर बाल दिवसाचा हा पुण्य सोहळा आपल्याला आपला भूतकाळ ओळखण्याची आणि भविष्यातील भविष्य घडवण्याची प्रेरणा देईल. भारताच्या तरुण पिढीचे सामर्थ्य काय आहे, भारताच्या तरुण पिढीने भूतकाळात देशाचे कशाप्रकारे संरक्षण केले आहे, आपल्या तरुण पिढीने भारताला मानवतेच्या गडद अंधारातून कसे बाहेर काढले आहे, याचा जयघोष 'वीर बाल दिवस' पुढील अनेक दशके आणि शतके करेल.

दिल्ली येथील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियमवर ‘वीर बाल दिनानिमित्त होत असलेल्या ऐतिहासिक कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी

December 26th, 12:35 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियमवर ‘वीर बाल दिनानिमित्त होत असलेल्या ऐतिहासिक कार्यक्रमात भाग घेतला. या कार्यक्रमादरम्यान, सुमारे तीनशे बाल कीर्तनकारांनी सादर केलेल्या ‘शबद कीर्तन’ या कार्यक्रमाला देखील पंतप्रधान उपस्थित राहिले. या महत्त्वपूर्ण प्रसंगी पंतप्रधानांनी झेंडा दाखवून, दिल्लीतील सुमारे तीन हजार मुलांनी काढलेल्या संचलन फेरीचा (मार्च पास्ट) देखील शुभारंभ केला.

पंतप्रधानांनी, श्री गुरु राम दास जी यांच्या (जयंतीनिमित्त) प्रकाश पूरबच्या पवित्र दिनी केले नमन

October 11th, 09:42 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, श्री गुरु राम दास जी यांच्या (जयंतीनिमित्त) प्रकाश पूरबच्या पवित्र दिनी नमन केले आहे.

पंतप्रधानांची आज त्यांच्या निवासस्थानी शीख प्रतिनिधीमंडळासमवेत भेट

September 19th, 03:28 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या 7 लोककल्याण मार्ग येथील निवासस्थानी शीख प्रतिनिधीमंडळाची भेट घेतली.

श्री गुरू ग्रंथ साहिब जीच्या प्रकाश पूरबच्या पवित्र पर्वानिमित्त पंतप्रधानांकडून शुभेच्छा

August 28th, 12:10 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना विशेषत: शीख समुदायाला श्री गुरु ग्रंथ साहिब जींच्या प्रकाश पूरबच्या पवित्र पर्वानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान निवासस्थानी भेटीला आलेल्या शीख शिष्टमंडळाशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधलेला संवाद

April 29th, 05:31 pm

एनआयडी फाउंडेशनचे आधारस्तंभ आणि चंदीगड विद्यापीठाचे कुलगुरू माझे मित्र श्री सतनाम सिंग संधुजी, एनआयडी फाउंडेशनचे सर्व सदस्य गण आणि सर्व सन्मानीय सहकारी गण! तुमच्या पैकी काही लोकांना या आधी भेटण्याची संधी मला मिळाली आहे. गुरुद्वारामध्ये जाणं, तिथे सेवा करायला वेळ देणं, लंगरमध्ये जेवणं, शीख कुटुंबांच्या घरी राहणं, हा माझ्या आयुष्याचा एक नैसर्गिक भाग राहिला आहे. इथं पंतप्रधान निवासात देखील वेळोवेळी शीख संतांचे पाय लागत राहिले आहेत आणि हे माझं मोठं सौभाग्य आहे. त्यांच्या सान्निध्यात मला वेळ घालवायची संधी मिळत राहिली आहे.

Prime Minister Narendra Modi interacts with Sikh delegation at his residence

April 29th, 05:30 pm

PM Modi hosted a Sikh delegation at 7 Lok Kalyan Marg. Bowing to the great contribution and sacrifices of the Gurus, the PM recalled how Guru Nanak Dev ji awakened the consciousness of the entire nation and brought the nation out of darkness and took it on the path of light.

पंतप्रधान नवी दिल्लीतील आपल्या निवासस्थानी शीख शिष्टमंडळाची घेणार भेट

April 29th, 11:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीतील आपल्या निवासस्थानी शीख शिष्टमंडळाची भेट घेणार आहेत. पंतप्रधान आज संध्याकाळी 5.30 वाजता उपस्थितांना संबोधितही करतील.