For the BJP, the aspirations and pride of tribal communities have always been paramount: PM Modi in Chaibasa

November 04th, 12:00 pm

PM Modi addressed a massive election rally in Chaibasa, Jharkhand. Addressing the gathering, the PM said, This election in Jharkhand is taking place at a time when the entire country is moving forward with a resolution to become developed by 2047. The coming 25 years are very important for both the nation and Jharkhand. Today, there is a resounding call across Jharkhand... ‘Roti, Beti, Maati Ki Pukar, Jharkhand Mein…Bhajpa, NDA Sarkar’.”

PM Modi campaigns in Jharkhand’s Garhwa and Chaibasa

November 04th, 11:30 am

Prime Minister Narendra Modi today addressed massive election rallies in Garhwa and Chaibasa, Jharkhand. Addressing the gathering, the PM said, This election in Jharkhand is taking place at a time when the entire country is moving forward with a resolution to become developed by 2047. The coming 25 years are very important for both the nation and Jharkhand. Today, there is a resounding call across Jharkhand... ‘Roti, Beti, Maati Ki Pukar, Jharkhand Mein…Bhajpa, NDA Sarkar’.”

ओदिशामध्ये भुवनेश्वर येथे विविध विकास कामांच्या पायाभरणी/उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर

September 17th, 12:26 pm

ओदिशाचे राज्यपाल रघुबर दास जी, येथील लोकप्रिय मुख्यमंत्री मोहन मांझी जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी जुआल ओराम जी, धर्मेंद्र प्रधान जी, अन्नपूर्णा देवी जी, ओदिशाचे उपमुख्यमंत्री के. व्ही. सिंहदेव जी, श्रीमती प्रभाती परिडा जी, खासदार, आमदार, देशाच्या कानाकोपऱ्यातून आज आमच्यासोबत उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि ओदिशामधील माझ्या बंधू-भगिनींनो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओदिशामध्ये भुवनेश्वर येथे ‘सुभद्रा’ या सर्वात मोठ्या महिला-केंद्रित योजनेचा केला शुभारंभ

September 17th, 12:24 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओदिशामध्ये भुवनेश्वर येथे ‘सुभद्रा’ या ओदिशा सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ केला. केवळ महिलांसाठीची ही सर्वात मोठी योजना असून, 1 कोटीहून अधिक महिलांना त्याचा लाभ मिळेल अशी अपेक्षा आहे. पंतप्रधानांनी 10 लाखांहून अधिक महिलांच्या बँक खात्यात निधी हस्तांतरित करण्याची सुरुवातही केली. पंतप्रधान मोदी यांनी रु. 2800 कोटीहून अधिक खर्चाच्या रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी केली आणि त्याचे लोकार्पण केले, तसेच रु.1000 कोटींहून अधिक खर्चाच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी केली. पंतप्रधानांनी पीएमएवाय-जी, अर्थात प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत, सुमारे 14 राज्यांमधील जवळजवळ 10 लाख लाभार्थ्यांना मदतीचा पहिला हप्ता जारी केला, देशभरातील पीएमएवाय, अर्थात प्रधानमंत्री आवास योजनेच्या (ग्रामीण आणि शहरी) 26 लाख लाभार्थ्यांच्या गृहप्रवेश सोहळ्यात ते सहभागी झाले, आणि पीएमएवाय (ग्रामीण आणि शहरी) योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांच्या घराच्या चाव्या सुपूर्द केल्या. त्यानंतर त्यांनी पीएमएवाय –जी साठी अतिरिक्त घरांच्या सर्वेक्षणासाठी Awaas+ 2024 ॲप चे उद्घाटन केले आणि प्रधानमंत्री आवास योजना - शहरी (पीएमएवाय – यु ) 2.0 च्या कार्यान्वयनाबाबतची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली.

गरिबाच्या मुलाच्या नेतृत्वाखालील या सरकारने गरिबांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे: पंतप्रधान मोदी कल्याणमध्ये

May 15th, 04:45 pm

पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातील कल्याण येथे जाहीर सभेला संबोधित केले. ते म्हणाले: मी अभिमानाने सांगू शकतो की, देशाचे हित आणि गरिबांचे कल्याण हा आजच्या राजकीय वातावरणाचा केंद्रबिंदू बनला आहे. विरोधकांच्या आघाडीवर टीका करताना ते म्हणाले की, एमव्हीएच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीची सजावट करण्यात आली, पण राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचे निमंत्रण मात्र नाकारण्यात आले.

आम्ही धर्माच्या आधारावर कधीही भेदभाव केला नाही; आमच्या योजना सर्वांच्या फायद्याच्या:पंतप्रधान मोदी दिंडोरी येथे

May 15th, 03:45 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील दिंडोरी येथे एक भव्य सभेस उपस्थित होते. त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना वेगवान विकासाचे आणि वाढीचे आश्वासन दिले. पंतप्रधानांनी सभेत विकसित भारताच्या आपल्या व्हिजनची चर्चा केली.

महाराष्ट्रातील दिंडोरी आणि कल्याण येथील भव्य सभांमध्ये पंतप्रधान मोदींची प्रेरणादायी भाषणे

May 15th, 03:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील दिंडोरी आणि कल्याण येथे घेतलेल्या भव्य सभांमध्ये त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना वेगवान विकासाचे आणि वाढीचे आश्वासन दिले. पंतप्रधानांनी आपल्या विकसित भारताबद्दलच्या आपल्या व्हिजनचा ऊहापोह केला. ते म्हणाले: सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या 100 दिवसांत करावयाची आवश्यक कामे आणि कोणते निर्णय घेतले जावेत यावर आम्ही सातत्याने विचार केलेला आहे.

There's a race of corruption and looting between Congress and JMM in Jharkhand: PM Modi in Singhbhum

May 03rd, 05:30 pm

Before the upcoming Lok Sabha Election 2024, PM Modi attended and addressed a grand public event in Singhbhum, Jharkhand. The PM was deeply moved by the enthusiasm of the crowd and, in return, reiterated the Modi Ki Guarantee for everyone in Jharkhand.

PM Modi addresses an invigorated crowd at a public event in Singhbhum, Jharkhand

May 03rd, 05:15 pm

Before the upcoming Lok Sabha Election 2024, PM Modi attended and addressed a grand public event in Singhbhum, Jharkhand. The PM was deeply moved by the enthusiasm of the crowd and, in return, reiterated the Modi Ki Guarantee for everyone in Jharkhand.

गुजरातमधील राजकोट येथे विविध प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

February 25th, 07:52 pm

आजच्या या कार्यक्रमात देशातील अनेक राज्यांमधून इतर लोकही मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यपाल, आमदार, खासदार, केंद्रीय मंत्री, हे सर्वजण दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. त्या सर्वांचेही मी मनापासून अभिनंदन करतो.

गुजरातमध्ये राजकोट इथे 48,100 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचे पंतप्रधानांनी केले राष्ट्रार्पण आणि पायाभरणी

February 25th, 04:48 pm

या संपूर्ण कार्यक्रमाला संबोधित करताना, पंतप्रधानांनी या कार्यक्रमात दूरदृष्य प्रणाली द्वारे, उपस्थित राज्यांचे माननीय राज्यपाल आणि मुख्यमंत्री, संसद सदस्य आणि विधानसभांचे सदस्य तसेच केंद्रीय मंत्री यांच्या उपस्थितीबद्दल त्यांचे आभार मानले. एकेकाळी सर्व प्रमुख विकास कार्यक्रम एकट्या नवी दिल्लीत पार पडत असत त्या काळाचा उल्लेख करत पंतप्रधानांनी, सध्याच्या सरकारने हा रिवाज बदलून भारत सरकारला देशाच्या कानाकोपऱ्यात नेले, या बाबीवर प्रकाश टाकला. “राजकोटमधील आजचा हा कार्यक्रम, या विश्वासाचा पुरावा आहे”, असे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, नवीन परंपरा पुढे नेत, प्रकल्पांचे राष्ट्रांर्पण आणि पायाभरणी समारंभ आता देशातील अनेक ठिकाणी होत आहेत. जम्मूमधील एका कार्यक्रमातून झालेल्या IIT भिलाई, IIT तिरुपती, IIIT कुर्नूल, IIM बोधगया, IIM जम्मू, IIM विशाखापट्टणम आणि IIS कानपूर या शैक्षणिक संस्थांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाची आठवण करून देत पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज एम्स राजकोट, एम्स रायबरेली, एम्स मंगलागिरी, एम्स भटिंडा आणि एम्स कल्याणी यांचे उद्घाटन असेच होत आहे. विशेषत: जेव्हा आपण या 5 एम्स कडे पाहतो तेव्हा विकसनशील भारतामध्ये वेगाने कामे पूर्ण केली जात आहेत हे लक्षात येते, असे मोदी पुढे म्हणाले.

नवसारी येथील विविध प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन तसेच लोकार्पण करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण

February 22nd, 04:40 pm

गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेल, राज्य सरकारमधील मंत्री, या भागाचे प्रतिनिधित्व करणारे संसदेतील माझे सहकारी तसेच भारतीय जनता पार्टीचे गुजरात प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील, संसद सदस्य तसेच आमदार आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, कसे आहात तुम्ही सगळे?

गुजरातमध्ये नवसारी येथे 47,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांची पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी आणि लोकार्पण

February 22nd, 04:25 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील नवसारी येथे 47,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी केली आणि लोकार्पणही केले. या प्रकल्पांमध्ये वीज निर्मिती, रेल्वे, रस्ते, वस्त्रोद्योग, शिक्षण, पाणीपुरवठा, कनेक्टिव्हिटी आणि शहरी विकास यासारख्या विस्तृत क्षेत्रांचा समावेश आहे.

Respect, development for brothers and sisters of tribal society, both are guaranteed by Modi: PM Modi

February 11th, 01:13 pm

Prime Minister Narendra Modi addressed Jan Jatiya Mahasabha in Jhabua, Madhya Pradesh, where he expressed his gratitude and offered his respects to the people of the region. The event witnessed an overwhelming turnout, indicative of the strong support and enthusiasm of the people towards the government's initiatives and vision for the state, PM Modi expressed happiness.

PM Modi addresses Jan Jatiya Mahasabha in Jhabua, Madhya Pradesh

February 11th, 01:12 pm

Prime Minister Narendra Modi addressed Jan Jatiya Mahasabha in Jhabua, Madhya Pradesh, where he expressed his gratitude and offered his respects to the people of the region. The event witnessed an overwhelming turnout, indicative of the strong support and enthusiasm of the people towards the government's initiatives and vision for the state, PM Modi expressed happiness.

विकसित भारत संकल्प यात्रेत पंतप्रधानांनी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून केलेल्या भाषणाचा मजकूर

January 18th, 12:47 pm

विकासित भारत संकल्प यात्रेला 2 महिने पूर्ण झाले आहेत. या प्रवासात धावणारा विकासाचा रथ हा श्रद्धेचा रथ असून आता लोक त्याला हमीचा रथ देखील म्हणू लागले आहेत. योजनांच्या लाभापासून कुणीही वंचित राहणार नाही, कुणीही लाभ मिळाल्या वाचून राहणार नाही, असा विश्वास आता निर्माण होत आहे. त्यामुळे ज्या गावांमध्ये मोदींच्या हमीची गाडी अद्याप पोहोचलेली नाही, तिथे तिची आता अगदी आतुरतेने प्रतिक्षा होत आहे. आणि म्हणूनच आम्ही यापूर्वी 26 जानेवारीपर्यंत ही यात्रा सुरु ठेवण्याचा विचार केला होता, परंतु आम्हाला एवढा पाठिंबा मिळाला, एवढी मागणी वाढली, प्रत्येक गावातील लोक सांगत आहेत की मोदींची हमी असलेले वाहन आमच्या ठिकाणी यावे. तेव्हा मला हे कळल्यावर मी आमच्या सरकारी अधिकाऱ्यांना सांगितले की 26 जानेवारीपर्यंतच नाही तर आणखी थोडी मुदतवाढ द्या. लोकांना गरज आहे, लोकांची मागणी आहे तर ती आपल्याला पूर्ण करावी लागेल. आणि त्यामुळे कदाचित काही दिवसांनी हे ही निश्चित होईल की मोदींची हमीची गाडी कदाचित फेब्रुवारी महिन्यातही चालवली जाईल.

विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधानांनी साधला संवाद

January 18th, 12:46 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमात देशभरातून विकसित भारत संकल्प यात्रेचे हजारो लाभार्थी सामील झाले. कार्यक्रमात केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार आणि स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधीही सहभागी झाले होते.

पीएम-जनमन योजने अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेच्या एक लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता जारी करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण

January 15th, 12:15 pm

जोहार, राम-राम। सध्या देशात उत्सवाचे वातावरण आहे. उत्तरायण, मकर संक्रांती, पोंगल, बिहू अशा अनेक सणांचा उत्साह सर्वत्र दिसून येत आहे. आजच्या या कार्यक्रमामुळे हा उत्साह अधिकच दिमाखदार आणि चैतन्यमय झाला आहे, आणि तुमच्याशी बोलणे, ही माझ्यासाठी मोठी पर्वणी ठरली आहे. आज एकीकडे अयोध्येत दिवाळी साजरी होत आहे, तर दुसरीकडे माझे एक लाख वंचित आदिवासी बंधू-भगिनी, जे माझ्या कुटुंबाचे सदस्य आहेत, माझे हे आदिवासी कुटुंबीय, अती वंचित आदिवासी कुटुंब, त्यांच्या घरी दिवाळी साजरी होत आहे, ही माझ्यासाठी मोठी आनंदाची गोष्ट आहे. आज त्यांच्या बँक खात्यात पक्क्या घरासाठी पैसे जमा केले जात आहेत. या सर्व कुटुंबांचे मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतो. हे पुण्य कर्म करण्याची संधी मला मिळाली, ही माझ्या जीवनातील अत्यंत आनंदाची गोष्ट आहे.

पंतप्रधानांनी पीएम-जनमन अंतर्गत पंतप्रधान आवास योजना(ग्रामीण)च्या एक लाख लाभार्थ्यांना जारी केला पहिला हप्ता

January 15th, 12:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महा अभियान (PM-JANMAN)अंतर्गत पंतप्रधान आवास योजना(ग्रामीण) (PMAY - G)च्या एक लाख लाभार्थ्यांना आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पहिला हप्ता जारी केला. यावेळी पंतप्रधानांनी पीएम-जनमनच्या लाभार्थ्यांसोबत संवाद देखील साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणाली द्वारे संवाद साधताना केलेले भाषण

January 08th, 01:00 pm

2-3 दिवसांपूर्वीच विकसित भारत संकल्प यात्रेला 50 दिवस पूर्ण झाले.इतक्या अल्प वेळेत या यात्रेत 11 कोटी लोक सहभागी होणे ही अभूतपूर्व गोष्ट आहे.समाजाच्या टोकाशी असलेल्या व्यक्तीपर्यंत सरकार स्वतः पोहोचत आहे, आपल्या योजनांशी त्यांना जोडून घेत आहे. विकसित भारत संकल्प यात्रा केवळ सरकारची नव्हे तर संपूर्ण देशाची यात्रा ठरली आहे, स्वप्नांची यात्रा ठरली आहे, संकल्पांची यात्रा बनली आहे.विश्वासाची यात्रा बनली आहे आणि म्हणूनच मोदी की गॅरेंटी वाली गाडीकडे मोठ्या भावनेने आज देशाचे प्रत्येक क्षेत्र, प्रत्येक कुटुंब,आपल्या उज्वल भविष्याची उमेद म्हणून या गॅरेंटी वाल्या गाडीकडे पाहत आहे. गाव असो किंवा शहर प्रत्येक ठिकाणी या यात्रेबाबत उमेद आहे, उत्साह आहे, विश्वास आहे. मुंबईसारखे महानगर असो किंवा मिझोरम मधले दूरवरचे दुर्गम गाव, कारगिलचे डोंगर असोत किंवा कन्याकुमारीचा समुद्र किनारा,देशाच्या कानाकोपऱ्यात मोदी की गॅरेंटी वाली गाडी पोहोचत आहे.ज्या गरिबांचे जीवन सरकारी योजनांचा लाभ मिळण्याच्या प्रतीक्षेत गेला ते आज अर्थपूर्ण परिवर्तन अनुभवत आहेत. हे सरकारी कर्मचारी,सरकारी अधिकारी,नेता हे लोक गरीबाच्या दरवाज्यात येऊन आपल्याला सरकारी योजनांचा लाभ मिळाला की नाही असे विचारतील अशी कल्पना कोणी केली होती का ? मात्र असे घडत आहे,अतिशय इमानदारीने होत आहे.मोदी की गॅरेंटी वाली गाडीसह सरकारी कार्यालय,जन प्रतिनिधी,देशवासियांजवळ, त्यांच्या गावात-मोहल्ल्यात पोहोचत आहेत.आता ज्या लोकांशी माझा संवाद झाला त्यांच्या चेहऱ्यावरही याचा आनंद दिसत आहे.