महाराष्ट्रातील शिर्डी येथे श्री साईबाबा समाधी मंदिरात दर्शन घेवून पंतप्रधानांनी केली पूजा

October 26th, 05:36 pm

महाराष्ट्रातील शिर्डी येथे श्री साईबाबा समाधी मंदिरात दर्शन घेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पूजा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र आणि गोव्याला देणार भेट

October 25th, 11:21 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 26 ऑक्टोबर, 2023 रोजी महाराष्ट्र आणि गोव्याला भेट देणार आहेत. पंतप्रधान सुमारे एक वाजता अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी मंदिरात पूजा करून दर्शन घेतील. पंतप्रधानांच्या हस्ते मंदिरातील नवीन दर्शन रांग संकुलाचे उदघाटन देखील होणार आहे. सुमारे दोन वाजता पंतप्रधान निळवंडे धरणाचे जल पूजन करून या धरणाच्या डाव्या कालव्याची यंत्रणा राष्ट्राला समर्पित करतील. त्यानंतर सुमारे सव्वा तीन वाजता पंतप्रधान शिर्डी येथे एका सार्वजनिक सभेला उपस्थित राहणार असून आरोग्य, रेल्वे, रस्ते, तेल आणि वायू अशा बहुविध क्षेत्रातील सुमारे 7500 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण, पायाभरणी आणि उदघाटन करणार आहेत.