आचार्य श्री एस. एन. गोयंका यांच्या 100 व्या जन्मशताब्दी वर्षाच्या समारोप सोहळ्यात पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे दिलेला संदेश
February 04th, 03:00 pm
आचार्य श्री एस एन गोयंका जी यांच्या जन्मशताब्दी समारंभाची सुरुवात एक वर्षापूर्वी झाली होती. या एका वर्षात, देशात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करण्यासोबतच, कल्याण मित्र गोयंका जी यांच्या आदर्शांचे देखील स्मरण केले. आज जेव्हा त्यांच्या शताब्दी समारंभाची सांगता होत आहे, त्यावेळी, देश विकसित भारताचे संकल्प प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने देखील वेगाने पुढे जात आहे. या प्रवासात, एस. एन गोयंका जी यांचे विचार आणि समाजाप्रती त्यांचे समर्पण यातून आपल्याला खूप मोठी शिकवण मिळते. गुरुजी, भगवान बुद्धाचा मंत्र म्हणत असत—आचार्य एस एन गोयंका यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वर्षभर चाललेल्या सोहळ्याच्या समारोप समारंभाला पंतप्रधानांनी केले संबोधित
February 04th, 02:30 pm
विपश्यना ध्यानसाधनेचे गुरु, आचार्य एस एन गोयंका यांच्या वर्षभरापूर्वी जन्मशताब्दी सोहळ्याच्या प्रारंभाचे स्मरण करून, पंतप्रधानांनी अधोरेखित केले की राष्ट्राने ‘अमृत महोत्सव’ साजरा केला आणि त्याच वेळी कल्याण मित्र गोयंका यांच्या आदर्शांचेही स्मरण केले. आज जेव्हा या उत्सवांची सांगता होत आहे, तेव्हा देश विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असल्याचे त्यांनी सांगितले. गोयंका गुरुजी अनेकदा उद्धृत करत असलेल्या भगवान बुद्धांच्या मंत्राचा उल्लेख करत पंतप्रधानांनी त्याचा अर्थ स्पष्ट केला आणि ते म्हणाले, “एकत्र ध्यान केल्याने त्याचे प्रभावकारक परिणाम मिळतात. ही एकात्मतेची भावना आणि एकतेची शक्ती हाच विकसित भारताचा मुख्य आधार आहे. वर्षभर याच मंत्राचा प्रचार करण्यासाठी पंतप्रधानांनी सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.