पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रील प्रभूपाद जी यांच्या 150 व्या जयंतीदिनानिमत्त आयोजित कार्यक्रमामध्ये केलेले भाषण
February 08th, 01:00 pm
हरे कृष्ण! हरे कृष्ण! हरे कृष्ण! आज तुम्ही सर्वजण इथे आला आहात, त्यामुळे भारत मंडपम् ची भव्यता आणखी वाढली आहे. या भवनाची उभारणी करताना, त्याच्या मूळाशी असलेला विचार भगवान बसवेश्वर यांच्या अनुभव मंडपम् बरोबर या भारत मंडपम् ची सांगड घातली आहे. अनुभव मंडपम् प्राचीन भारतामध्ये आध्यात्मिक चर्चा-परिसंवाद यांचे केंद्र होते. अनुभव मंडपम् लोक कल्याणाची भावना आणि संकल्प यांचे ऊर्जा केंद्र होते. आज श्रील भक्तिसिद्धान्त सरस्वती गोस्वामी प्रभुपाद जी यांच्या 150 व्या जयंती निमित्त आयोजित या कार्यक्रमामध्येही अशीच ऊर्जा, असेच चैतन्य दिसून येत आहे. आमचा विचारही असाच होता की, हे भवन, भारताचे आधुनिक सामर्थ्य आणि प्राचीन मूल्ये अशा दोन्ही गोष्टींचे केंद्र बनले पाहिजे.अलिकडेच, काही महिन्यांपूर्वी जी -20 शिखर परिषदेच्या माध्यमातून इथूनच नवीन भारताच्या सामर्थ्याचे दर्शन अवघ्या जगाला झाले होते. आणि आज इथेच, ‘वर्ल्ड वैष्णव कन्व्हेंशन’चे आयोजन करण्याची संधी मोठ्या सद्भाग्याने मिळत आहे. आणि इतकेच नाही तर, भारताची जी प्रतिमा आहे... जिथे विकासही आहे आणि वारसाही आहे, अशा दोन्ही गोष्टींचा संगम घडून आला आहे. जिथे आधुनिकतेचे स्वागतही आहे आणि आपल्या ओळखीविषयी अभिमानही आहे.पंतप्रधानांनी श्रील प्रभुपादजी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला केले संबोधित
February 08th, 12:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत प्रगती मैदान येथील भारत मंडपम येथे श्रील प्रभुपादजी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधानांनी यावेळी आचार्य श्रील प्रभुपाद यांच्या पुतळ्याला पुष्पांजली वाहिली आणि त्यांच्या सन्मानार्थ एक स्मरणार्थ टपाल तिकीट तसेच नाणे जारी केले. गौडीया मिशनचे संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांनी वैष्णव पंथाच्या मुलभूत तत्वांचे जतन करण्यात तसेच त्यांचा प्रसार करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली.संत रामानुजाचार्यांनी गरिबांच्या गरजा पूर्ण करण्याला सामाजिक जबाबदारीशी जोडले होते
May 01st, 05:50 pm
पंतप्रधान मोदींनी श्री रामानुजाचार्यांच्या 1000व्या जयंती निमित्त एक टपाल तिकीट जारी केले. पंतप्रधान म्हणाले की रामानुजाचार्यांच्या जीवनाचा मूलमंत्र होता सर्वांना सामावून घेणारा समाज, धर्म आणि तत्वज्ञान. मोदी म्हणाले की त्यांनी नेहमी माणसात देव आणि देवात माणूस बघितला. त्यांनी नेहमी भक्त आणि देवाला समान मानलं. श्री मोदी ह्यांनी, संत रामानुजाचार्यांनी त्यांच्या काळातले रूढ पूर्वग्रह कसे तोडले ह्यावर भर दिलाSocial Media Corner 30 April 2017
April 30th, 07:52 pm
Your daily dose of governance updates from Social Media. Your tweets on governance get featured here daily. Keep reading and sharing!प्रत्येक व्यक्ती महत्वाची आहे: मन की बात कार्यक्रमांत पंतप्रधान मोदी
April 30th, 11:32 am
आजच्या मन की बात कार्यक्रमांत पंतप्रधान मोदी ह्यांनी म्हटलं की लाल दिव्यामुळे देशात व्हीआयपी पद्धत सुरू झाली आणि वाढली. पंतप्रधान म्हणाले की जेव्हा आपण न्यू इंडिया बद्दल बोलतो तेव्हा व्हीआयपी पेक्षा इपीआय जास्त महत्वाचे आहे, इपीआय म्हणजे 'एव्हरी परसन इज इम्पॉर्टन्ट' . पंतप्रधानांनी सुट्ट्यांचा छान वापर करायला आणि नवीन गोष्टी शिकायला, नवीन अनुभव घ्यायला आणि नवनवीन जागी भेट द्यायला सांगितलं. ते उन्हाळ्याबद्दल भीम अँप बद्दल आणि भारताच्या समृद्ध विविधतेबद्दल देखील खूप विस्ताराने बोलले.