पंतप्रधानांनी राम भजने केली सामायिक
January 21st, 09:20 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तीन श्रीराम भजने सामायिक केली आहेत.मॉरिशसच्या नागरिकांनी गायलेली श्री राम भक्तीची भजनं आणि कथा पंतप्रधानांनी केल्या सामायिक
January 20th, 09:27 am
मॉरिशसच्या नागरिकांनी गायलेली श्री राम भक्तीची भजनं आणि कथापश्चिम बंगालच्या नागरिकांमध्ये प्रभू श्री राम यांच्याबद्दल प्रचंड श्रद्धा आहे: पंतप्रधान
January 20th, 09:25 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पश्चिम बंगालच्या नागरिकांमध्ये प्रभू श्री राम यांच्याबद्दल प्रचंड श्रद्धा आहे.रामायणातील भावस्पर्शी शबरी भागावर आधारित मैथिली ठाकूर यांनी गायलेले गाणे पंतप्रधानांनी केले सामायिक
January 20th, 09:22 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मैथिली ठाकूर यांनी रामायणातील भावनिक शबरी भागावर आधारित गायलेले गाणे सामायिक केले आहे.पंतप्रधानांनी गयाना येथील श्री राम भजन केले सामायिक
January 19th, 01:36 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गयाना येथे सादर करण्यात आलेले श्री राम भजन आज सामायिक केले.पंतप्रधानांनी सुरीनाम तसेच त्रिनिदाद आणि टोबॅगो येथील गायकांनी गायलेली भजने केली सामायिक
January 19th, 09:51 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सुरीनाम तसेच त्रिनिदाद आणि टोबॅगो येथील गायकांनी गायलेली भजने सामायिक केली. भजनांमधे रामायणाचा शाश्वत संदेश ओतप्रोत आहे.सुरेश वाडेकर यांनी गायलेले भक्ती गीत पंतप्रधानांनी केले सामायिक
January 19th, 09:44 am
सुरेश वाडेकर आणि आर्या आंबेकर यांनी गायलेले भक्ती गीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सामायिक केले. संपूर्ण देश आज रामभक्तीच्या भावरंगात चिंब भिजलेला असल्याचेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.पंतप्रधानांनी भगवान श्रीरामांचे वर्णन करणारे "अयोध्या नगरी नाचे रामकू पाए" हे ओडिया भाषेतील भक्तिमय भजन केले सामायिक
January 18th, 11:07 am
पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी नमिता अग्रवाल यांच्या स्वरातील सरोज रथ यांनी संगीतबद्ध केलेले भगवान श्रीरामांचे वर्णन करणारे अयोध्या नगरी नाचे रामकू पाए हे ओडिया भाषेतील भक्तिमय भजन सामायिक केले आहे.लता मंगेशकर यांनी गायलेले श्री रामरक्षामधील श्लोक पंतप्रधानांनी केले सामायिक
January 17th, 08:10 am
लता मंगेशकर यांनी माता रामो मातपिता रामचंद्र:या शीर्षकाअंतर्गत गायलेले श्री रामरक्षेतील श्लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केले आहेत.शिवश्री स्कंद प्रसाद यांनी कन्नडमध्ये केलेले सादरीकरण प्रभू श्रीरामांप्रती भक्तिभाव प्रकट करते : पंतप्रधान
January 16th, 09:29 am
गायिका शिवश्री स्कंद प्रसाद यांनी कन्नडमध्ये केलेले सुंदर सादरीकरण प्रभू श्रीरामांप्रती भक्तिभाव प्रकट करते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. गायिका शिवश्री स्कंद प्रसाद यांचा प्रभू श्रीरामांवरील कन्नड भजनाचा व्हिडिओ पंतप्रधान मोदी यांनी सामायिक केला आहे आणि असे प्रयत्न आपला समृद्ध सांस्कृतिक वारसा संवर्धित करण्यात साहाय्य करतात, असे म्हटले आहे.पंतप्रधानांनी सामाईक केले, दिव्य कुमार यांनी गायलेले “हर घर मंदिर हर घर उत्सव” भजन
January 13th, 11:12 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिव्य कुमार यांनी गायलेले, सिद्धार्थ अमृत भावसार यांनी संगीतबद्ध केलेले “हर घर मंदिर हर घर उत्सव” हे भजन सामाईक केले आहे. अनेक शतकांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्या धाममध्ये हा शुभ प्रसंग जवळ आला आहे. या शुभ प्रसंगी प्रभू श्रीरामाच्या जयघोषाचा सूर उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत सर्वत्र घुमत आहे, नरेंद्र मोदी पुढे म्हणाले.उस्मान मीर यांनी गायलेले “श्री रामजी पधारे” हे भक्तीपर भजन पंतप्रधानांनी केले सामायिक
January 10th, 09:47 am
उस्मान मीर यांनी गायलेले आणि ओम दवे व गौरांग पाला यांचे संगीत दिग्दर्शन असलेले “श्री रामजी पधारे” हे भक्तीपर भजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केले आहे.हरिहरन यांनी गायलेले “सबने तुम्हीं पुकारा श्री राम जी” हे भजन पंतप्रधानांनी केले सामायिक
January 09th, 09:18 am
हरिहरन यांनी गायलेले आणि उदय मजुमदार यांनी संगीतबद्ध केलेले “सबने तुम्हीं पुकारा श्री राम जी” हे भजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "अयोध्या में जयकारा गुंजे" हे विकास यांनी गायलेले भक्तीमय भजन सामायिक केले आहे.
January 08th, 10:06 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्या में जयकारा गुंजे हे विकास यांनी गायलेले आणि महेश कुकरेजा यांनी स्वरबद्ध केलेले भक्तिमय भजन सामायिक केले आहे.गीताबेन रबारी यांनी गायलेले भक्तीमय भजन ''श्री राम घर आये'' पंतप्रधानांनी केले सामायिक
January 07th, 09:25 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गीताबेन रबारी यांनी गायलेले “श्री राम घर आये” हे भक्तिमय भजन सामायिक केले आहे. या भजनाला स्वरसाज चढवला आहे मौलिक मेहता यांनी, तर शब्द आहेत सुनीता जोशी (पंड्या) यांचे..स्वस्तिजी यांनी गायलेले भजन अंतःकरणाला भावनेने भरून टाकते : पंतप्रधान
January 06th, 09:59 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'राम आयेंगे' हे स्वस्ति मेहुल यांनी गायलेले भजन सामायिक केले आहे.पंतप्रधानांनी सामाईक केले प्रभू श्रीरामाचे भक्तिमय भजन
January 05th, 01:09 pm
झुबिन नौटियाल यांनी गायलेले, पायल देव यांनी संगीतबद्ध केलेले आणि मनोज मुंताशीर यांनी रचलेले प्रभू श्री रामाचे एक भक्तीमय भजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामाईक केले आहे.अयोध्येतील प्रभू श्री रामाच्या स्वागतप्रित्यर्थ संपूर्ण देशभरातून आनंद व्यक्त: पंतप्रधान
January 04th, 12:09 pm
अयोध्येत प्रभू श्री रामाचे स्वागत करण्याचा आनंद प्रत्येकजण आपल्या भावनांद्वारे विविध प्रकारांनी व्यक्त करत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. संपूर्ण देशात उत्साह संचारला आहे आणि या शुभदिनाच्यनिमित्त सर्वजण राम लल्लाच्या भक्तीत तल्लीन झाले आहेत, असे पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले.श्री राम लल्ला यांच्या स्वागताप्रित्यर्थ स्वाती मिश्रा यांनी सादर केलेले भजन मंत्रमुग्ध करणारे : पंतप्रधान
January 03rd, 08:07 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री राम लल्ला यांच्या स्वागताप्रित्यर्थ स्वाती मिश्रा यांनी गायलेले भक्तीमय भजन सामायिक केले आहे. हे भजन मंत्रमुग्ध करणारे आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.तुमच्या रचना, कविता आणि भजने #ShriRamBhajan या हॅशटॅगसह शेअर करा
December 31st, 02:52 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 डिसेंबर च्या 'मन की बात' मध्ये, अयोध्येतील राम मंदिरामुळे देशात मोठ्या प्रमाणात आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे सांगितले होते. श्री राम आणि अयोध्येला समर्पित नवीन गाणी, भजन आणि कविता यासारख्या विविध मार्गांनी लोक आपली भावना आणि भक्ती व्यक्त करत आहेत. पंतप्रधानांनी नागरिकांना #ShriRamBhajan हा हॅशटॅग वापरून आपले कलात्मक योगदान सोशल मीडियावर शेअर करण्याचे आवाहन केले आहे.