Except for scams and lawlessness, there is nothing in their report cards: PM Modi in Darbhanga

May 04th, 03:45 pm

Prime Minister Narendra Modi addressed a vibrant gathering in Darbhanga, Bihar, where he paid homage to the late Maharaja Kameshwar Singh Ji and praised the sacred land of Mithila and its people.

PM Modi addresses a public meeting in Darbhanga, Bihar

May 04th, 03:30 pm

Prime Minister Narendra Modi addressed a vibrant gathering in Darbhanga, Bihar, where he paid homage to the late Maharaja Kameshwar Singh Ji and praised the sacred land of Mithila and its people.

Ghamandiya Alliance is only interested in destabilizing the future of the youth of Bihar: PM Modi in Jamui

April 04th, 12:01 pm

Ahead of the Lok Sabha elections 2024, PM Modi addressed a public rally in Jamui, Bihar. He said, Jamui's mood is reflective of 'Ab ki Baar 400 Paar' with all the 40 seats in N.D.A.'s favour in Bihar. He expressed his tribute to the contributions of the Late Ramvilas Paswan Ji, who was dedicated to the welfare of Bihar and its development.

Jamui's grand welcome for PM Modi as he addresses a public rally

April 04th, 12:00 pm

Ahead of the Lok Sabha elections 2024, PM Modi addressed a public rally in Jamui, Bihar. He said, Jamui's mood is reflective of 'Ab ki Baar 400 Paar' with all the 40 seats in N.D.A.'s favour in Bihar. He expressed his tribute to the contributions of the Late Ramvilas Paswan Ji, who was dedicated to the welfare of Bihar and its development.

बिहार मधील बेत्तीया येथे विकसित भारत-विकसित बिहार कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

March 06th, 04:00 pm

महर्षि वाल्मिकींची कर्मभूमी, सीता मातेची आश्रयभूमी आणि लवकुशांची ही भूमी, आमचा सर्वांना नमस्कार असो! राज्यपाल श्री राजेंद्र आर्लेकर जी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी नित्यानंद राय जी, उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा जी, सम्राट चौधरी जी, राज्य सरकारमधील मंत्री, ज्येष्ठ नेते, विजय कुमार चौधरी जी, संतोष कुमार सुमन जी, खासदार संजय जयस्वाल जी. , राधा मोहन जी. , सुनील कुमार जी, रमा देवी जी, सतीश चंद्र दुबे जी, इतर सर्व ज्येष्ठ मान्यवर आणि बिहारच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो!

बिहारमधील बेटियाह येथे विकसित भारत विकसित बिहार कार्यक्रमाला पंतप्रधानांनी केले संबोधित

March 06th, 03:15 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील पश्चिम चंपारण जिल्ह्यातील बेटियाह येथे सुमारे 12,800 कोटी रुपयांच्या रेल्वे, रस्ते आणि पेट्रोलियम व नैसर्गिक वायूशी संबंधित अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण केले.

बिहारमधील बेगुसराय येथे विविध प्रकल्पांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाचा मजकूर

March 02nd, 08:06 pm

बिहारचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकरजी, मुख्यमंत्री नितीश कुमारजी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी गिरीराज सिंहजी, हरदीप सिंह पुरीजी, उपमुख्यमंत्री विजय सिन्हाजी, सम्राट चौधरीजी, व्यासपीठावर उपस्थित इतर सर्व मान्यवर आणि बेगूसराय मधून आलेल्या उत्साही माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील बेगुसराय येथे अनेक विकास प्रकल्पांचे केले लोकार्पण आणि पायाभरणी

March 02nd, 04:50 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील बेगुसराय येथे आज देशभरातील सुमारे 1.48 लाख कोटी रुपयांच्या तेल आणि वायू क्षेत्रातील प्रकल्पांची तसेच बिहारमधील 13,400 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले.

बिहारमध्ये औरंगाबाद येथे विविध प्रकल्पांची सुरुवात करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण

March 02nd, 03:00 pm

बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकरजी, मुख्यमंत्री नितीश कुमारजी तसेच येथे बसलेले सर्व ज्येष्ठ नेते, सर्वांची नावे मी घेत नाही. पण जुन्या सर्व सहकाऱ्यांशी आज भेट झाली आहे आणि इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही सर्व मान्यवर येथे आला आहात त्यांचे, जनता जनार्दनाचे मी हार्दिक अभिनंदन करतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील औरंगाबाद येथे सुमारे 21,400 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे केले लोकार्पण आणि पायाभरणी

March 02nd, 02:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील औरंगाबाद येथे 21,400 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण केले. आजच्या विकास प्रकल्पांमध्ये रस्ते, रेल्वे आणि नमामि गंगे या क्षेत्रांचा समावेश आहे. पंतप्रधानांनी यावेळी एका छायाचित्र प्रदर्शनालाही भेट दिली.

श्री कर्पूरी ठाकूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

February 17th, 07:03 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्री कर्पूरी ठाकूर यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली.

भारतरत्न पुरस्काराने सन्मानित कर्पूरी ठाकूर यांच्या कुटुंबीयांची पंतप्रधानांनी घेतली भेट

February 12th, 05:11 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतरत्न पुरस्काराने सन्मानित कर्पूरी ठाकूर यांच्या कुटुंबियांची नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधानांनी दिलेले उत्तर

February 05th, 05:44 pm

मी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचे आभार मानण्यासाठी उभा आहे. जेव्हा आदरणीय राष्ट्रपती संसदेच्या या नवीन इमारतीत आम्हा सर्वांना संबोधित करण्यासाठी आल्या आणि ज्या अभिमानाने आणि आदराने सेंगोल संपूर्ण मिरवणुकीचे नेतृत्व करत होता आणि आपण सर्व त्याच्या पाठी चालत होतो. नवीन सभागृहातील ही नवी परंपरा भारताच्या स्वातंत्र्याच्या त्या पवित्र क्षणाचे प्रतिबिंब बनते तेव्हा लोकशाहीची प्रतिष्ठा अनेक पटींनी वाढते. हा 75वा प्रजासत्ताक दिन, त्यानंतरची संसदेची नवीन इमारत, सेंगोलचे नेतृत्व, हा सारे दृश्य अत्यंत प्रभावी होते. जेव्हा मी तिथे संपूर्ण कार्यक्रमात सहभागी होत होतो. इथून तर आपल्याला तितकी भव्यता दिसत नाही. परंतु, तिथून जेव्हा मी पाहिले की खरेच या नव्या सभागृहाच्या गौरवशाली उपस्थितीत, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे मान्यवर, तेव्हा ते दृश्य आपल्या सर्वांच्या मनावर ठसले, जे आपल्या कायमचे लक्षात राहील. राष्ट्रपतींच्या आभार प्रस्तावावर ज्या 60 हून अधिक सन्माननीय सदस्यांनी आपली मते मांडली. आपले विचार व्यक्त करणाऱ्या आपल्या सर्व सन्माननीय खासदारांचे मी नम्रपणे आभार मानतो. विरोधकांनी घेतलेल्या संकल्पाचे मी विशेष कौतुक करतो. त्यांच्या भाषणातील प्रत्येक शब्दाने माझा आणि देशाचा आत्मविश्वास पक्का केला आहे की त्यांनी दीर्घकाळ तेथे राहण्याचा संकल्प केला आहे.

लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावाला पंतप्रधानांचे उत्तर

February 05th, 05:43 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिले. अभिभाषणासाठी नवीन संसद भवनात राष्ट्रपती आणि त्यांच्यापाठोपाठ उर्वरित संसद सदस्यांचे आगमन झाल्यावर त्यांना अभिमानाने आणि आदरपूर्वक सभागृहात घेऊन जाताना सेंगोल सर्वात पुढे होते असे सांगत पंतप्रधानांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. ही परंपरा सभागृहाची प्रतिष्ठा अनेक पटींनी वाढवते असे पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले. ते म्हणाले की 75 वा प्रजासत्ताक दिन, नवीन संसद भवन आणि सेंगोलचे नेतृत्व हे संपूर्ण दृश्य अतिशय प्रभावी होते. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावावरील चर्चेत आपले विचार आणि कल्पना मांडल्याबद्दल सभागृहातील सदस्यांचे त्यांनी आभार मानले.

नवी दिल्लीत एनसीसी/एनएसएस छात्रसैनिकांशी संवाद साधताना पंतप्रधानांच्या संबोधनातील मजकूर

January 24th, 03:26 pm

तुम्ही नुकतेच येथे जे सांस्कृतिक सादरीकरण केले ते पाहून मला अभिमानास्पद वाटले. राणी लक्ष्मीबाईंचे ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व आणि इतिहासातील घटना तुम्ही अवघ्या काही क्षणांत साकारल्या. आपण सर्वच या घटनांशी परिचित आहोत, परंतु तुम्ही ज्या प्रकारे ते सादर केले ते खरोखर मनोहारी आहे. तुम्ही प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी होणार आहात आणि यावेळी तो दोन कारणांमुळे अधिक खास झाला आहे. हा 75 वा प्रजासत्ताक दिन आहे आणि दुसरे म्हणजे, पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनाचे संचलन देशाच्या स्त्री शक्तीला समर्पित आहे. आज मी देशाच्या विविध भागातून एवढ्या मोठ्या संख्येने मुली येथे येताना पाहत आहे. तुम्ही इथे एकट्या आलेल्या नाहीत, तर तुम्ही सर्वांनी तुमच्या राज्यांचा दरवळ, वेगवेगळ्या चालीरीतींचा अनुभव आणि तुमच्या समाजाची समृद्ध विचारसरणी तुमच्यासोबत आणली आहे. आज तुमची भेट हा एक खास प्रसंग आहे. आज राष्ट्रीय बालिका दिन आहे. आजचा दिवस मुलींच्या धैर्याची, भावनेची आणि कर्तृत्वाची प्रशंसा करण्याचा आहे. समाज आणि देश सुधारण्याची क्षमता मुलींमध्ये असते. इतिहासाच्या वेगवेगळ्या कालखंडात भारताच्या मुलींनी त्यांच्या दृढ हेतूने आणि समर्पणाच्या भावनेने अनेक मोठ्या बदलांचा पाया रचला आहे. काही वेळापूर्वी तुम्ही केलेल्या सादरीकरणातूनही ही भावना प्रतीत होते.

पंतप्रधानांनी एनसीसी छात्रसैनिक आणि एनएसएसच्या स्वयंसेवकांना केले संबोधित

January 24th, 03:25 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय छात्र सेनेचे (एनसीसी) छात्रसैनिक आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) स्वयंसेवकांना संबोधित केले. उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी राणी लक्ष्मीबाईंच्या जीवनाचे चित्रण करणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा अभिमानाने उल्लेख केला . ते म्हणाले की या कार्यक्रमामुळे आज भारताचा इतिहास जिवंत झाला आहे.

श्री कर्पुरी ठाकुर यांना भारतरत्न जाहीर झाल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद

January 23rd, 09:19 pm

कर्पूरी ठाकुर यांच्या जन्मशताब्दीमध्ये त्यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्याच्या निर्णयामुळे देशवासियांच्या मनात अभिमान जागृत होईल. मागासवर्गीयांच्या उद्धारासाठी आणि वंचितांच्या कल्याणाप्रती त्यांची अविचल वचनबद्धता आणि दूरदृष्टीने परिपूर्ण असे त्यांचे नेतृत्व यांनी भारताच्या सामाजिक-राजकीय परिप्रेक्ष्यावर अमीट ठसा उमटवला आहे.