गुजरातमधे तारभ येथे विविध प्रकल्पांच्या उद्घाटन आणि पायाभरणी समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
February 22nd, 02:00 pm
कसे आहात तुम्ही सर्वजण? या गावातील जुन्या साधुंचे दर्शन घडले, जुन्या - जुन्या साथीदारांची भेट घडली. बंधूंनो, वाडीनाथ भेटीने तर रंगत आणली, मी यापूर्वी देखील वाडीनाथला आलो आहे, अनेकदा आलो आहे, मात्र आजचा उत्साह काही आगळाच आहे. जगात माझे कितीही जोशात स्वागत झालेले असो, सन्मान झालेला असो, परंतु जेव्हा हे स्वागत, हा सन्मान जेव्हा आपल्या घरात होतो तेव्हा त्याचा आनंद काही वेगळ्याच स्वरुपाचा असतो. माझ्या गावामधले काही जण अधून-मधून दिसत होते आज, आणि मामाच्या घरी आलो आहे तर त्याचा आनंद देखील खुप अनोखा असतो, असे वातावरण मी पाहिले आहे, त्याच्याच आधारे मी सांगतो आहे की श्रद्धा आणि आस्थेने ओतप्रोत भरलेल्या तुम्हा सर्व भक्त गणांना माझा सादर प्रणाम. योगायोग पहा कसा आहे, आजपासून बरोबर एका महिन्यांपूर्वी, 22 जानेवारीला मी अयोध्येत प्रभु श्रीरामाच्या चरणी लीन होतो. तिथे मला प्रभु रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेच्या ऐतिहासिक आयोजनात सहभागी होण्याचे सौभाग्य प्राप्त झाले. त्यानंतर 14 फेब्रुवारीला, वसंत पंचमीच्या दिवशी अबु धाबीमध्ये, आखाती देशातील पहिल्या हिंदू मंदिराचे लोकार्पण करण्याची संधी मिळाली आणि आत्ताच, दोन तीन दिवसांपूर्वीच मला उत्तर प्रदेशातील संभल येथील कल्की धाम मंदिराची पायाभरणी करण्याची देखील संधी मिळाली. आणि आता आज, मला येथे, तरभ गावात या भव्य, दिव्य मंदिरात प्राणप्रतिष्ठेनंतर पूजा करण्याच्या समारंभात सहभागी होण्याचे सौभाग्य प्राप्त झाले आहे.पंतप्रधानांकडून गुजरातमध्ये तारभ, मेहसाणा येथे 13,500 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण
February 22nd, 01:22 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील तारभ, महेसाणा येथे 13,500 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण केले. या प्रकल्पांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी, रेल्वे, रस्ते, शिक्षण, आरोग्य, दळणवळण, संशोधन आणि पर्यटन अशा अनेक क्षेत्रांचा समावेश आहे.उत्तर प्रदेशातील संभल येथे श्री कल्की धामच्या पायाभरणी समारंभातील पंतप्रधानांचे भाषण
February 19th, 11:00 am
सर्व संतांना विनंती आहे की त्यांनी आपले स्थान ग्रहण करावे. उत्तर प्रदेशचे ऊर्जावान मुख्यमंत्री श्रीमान योगी आदित्यनाथ जी, पूज्य श्री अवधेशानंद गिरी जी, कल्किधामचे प्रमुख आचार्य प्रमोद कृष्णम् जी, पूज्य स्वामी कैलाशानंद ब्रह्मचारी जी, पूज्य सदगुरू श्री रितेश्वर जी, प्रचंड संख्येने आलेले, भारतातील विविध कानाकोपऱ्यातून आलेले पूज्य संतगण, आणि माझ्या प्रिय श्रद्धाळू बंधू आणि भगिनींनो!पंतप्रधानांच्या हस्ते उत्तर प्रदेशातील संभल येथे श्री कल्की धाम मंदिराचा कोनशीला समारंभ
February 19th, 10:49 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात श्री कल्की धाम मंदिराचा कोनशीला समारंभ झाला.पंतप्रधानांनी यावेळी श्री कल्की धाम मंदिराच्या प्रतिकृतीचे अनावरण देखील केले.आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या अध्यक्षतेखालील श्री कल्की धाम निर्माण ट्रस्टतर्फे या मंदिराची उभारणी केली जात आहे. आजच्या कार्यक्रमात अनेक संत, धार्मिक नेते तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 फेब्रुवारीला उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर
February 17th, 08:59 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 फेब्रुवारी 2024 रोजी उत्तर प्रदेशाला भेट देणार आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 फेब्रुवारी रोजी श्री कल्की धामची करणार पायाभरणी
February 01st, 09:10 pm
श्री कल्की धामच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी आमंत्रित केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्री आचार्य प्रमोद कृष्णम यांचे आभार मानले.