हरमोहन सिंह यादव यांच्या 10 व्या पुण्यतिथी निमित्त पंतप्रधानांचे भाषण
July 25th, 04:31 pm
मी स्वर्गीय हरमोहन सिंह यादव यांना त्यांच्या पुण्यतिथी निमित्त आदरपूर्वक नमन करतो, माझी श्रद्धांजली वाहतो. मी सुखरामजी यांचे देखील आभार व्यक्त करतो की त्यांनी या कार्यक्रमासाठी मला इतक्या प्रेमाने आमंत्रित केले. माझी मनापासून इच्छा देखील होती की मी या कार्यक्रमासाठी कानपूरला येऊन आपल्या सर्वांसोबत उपस्थित राहावे. मात्र आज, आपल्या देशाच्या लोकशाहीचा मोठा क्षण देखील आहे. आज आपल्या नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी झाला आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आदिवासी समाजातील महिला राष्ट्रपती देशाचं नेतृत्व करणार आहेत. हे आपल्या लोकशाहीच्या शक्तीचं, आपली सर्वसमावेशक विचारधारा याचं जिवंत उदाहरण आहे. या प्रसंगी आज दिल्लीत अनेक महत्वाचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. घटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी माझं दिल्लीत उपस्थित राहणं अतिशय आवश्यक आहे, गरजेचं देखील आहे. म्हणून मी आपल्याशी दूरदृष्यप्रणाली द्वारे जोडला जातो आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री हरमोहन सिंग यादव यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला केले संबोधित
July 25th, 04:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरमोहन सिंग यादव यांच्या दहाव्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. हरमोहन सिंग यादव हे माजी संसदपटू, विधानसभा सदस्य, विधानपरिषद सदस्य, शौर्य चक्र पुरस्काराने सन्मानित व्यक्ती आणि यादव समाजातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व आणि नेते होते.दिवंगत हरमोहन सिंग यादव यांच्या 10 व्या पुण्यतिथीनिमित्त 25 जुलै रोजी आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार
July 24th, 02:55 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 25 जुलै 2022 रोजी संध्याकाळी 4:30 वाजता दिवंगत हरमोहन सिंग यादव यांच्या 10 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला दूरदृष्यप्रणालीद्वारे संबोधित करतील.