मैसूरमध्ये रेल्वे प्रकल्पाचे तर श्रवणबेळगोळ येथे विकासकामांचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन

February 19th, 03:44 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मैसूर आणि केएसआर बेंगळूरु दरम्यानच्या रेल्वे मार्ग विद्युतीकरणाचे राष्ट्रार्पण केले. मैसूर रेल्वे स्थानकावर झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी मैसूर आणि उदयपूर दरम्यानच्या पॅलेस क्वीन हमसफर एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला.

कर्नाटकमध्ये पंतप्रधानांनी बाहुबली महामस्तकाभिषेक महोत्सवात संबोधित केले

February 19th, 02:45 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले की भारतातील संत आणि द्रष्टे यांनी नेहमीच समाजाची सेवा केली आणि सकारात्मक परिवर्तन आणले. आमच्या समाजाची ताकद हे आहे की आपण नेहमीच काळानुरूप बदल केला आहे आणि नव्या संदर्भाशी चांगले जुळवून घेतले आहे. आयुष्मान भारत योजनाबद्दल बोलताना ते म्हणाले, गरिबांना चांगल्या दर्जाची आणि स्वस्त आरोग्य सेवा देणे हे आमचे कर्तव्य आहे.