डॉ. कलम यांनी भारतातल्या युवावर्गाला प्रेरणा दिली: पंतप्रधान मोदी

July 27th, 12:34 pm

सभेला संबोधित करताना पंतप्रधानांनी माजी राष्ट्रपती डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांना मनःपूर्वक श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले की रामेश्वरमचा साधेपणा, शांतपणा आणि सखोलता कलम यांच्या वागण्यात पूर्णपणे दिसत असे. श्री मोदी यांनी कलम यांचे युववार्गाशी असणाऱ्या नात्याचा उल्लेख करून म्हटले की डॉ. कलाम यांनी भारतातल्या युवावर्गाला प्रेरणा दिली आहे. मला माहिती आहे की आजच्या युवावर्गाला नवीन उंची गाठायची आहे आणि त्यांना रोजगार निर्माता व्हायचे आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामेश्वरममधील पी करुंबू येथील डॉ. ए.पी.जे. अब्दूल कलाम स्मारकाचे उद्‌घाटन

July 27th, 12:29 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रामेश्वरम इथे माजी राष्ट्रपती डॉ. ए पी जे अब्दुल कलाम स्मारकाचे उद्घाटन केले. पंतप्रधानांनी ‘कलाम संदेश वाहिनी’ या प्रदर्शन बसला हिरवा झेंडा दाखवला; ही बस देशातल्या विविध राज्यात प्रवास करेल. त्यांनी नील क्रांती योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरीपत्राचे वाटप केले, नवीन अयोध्या-रामेश्वरम एक्सप्रेस गाडीचा त्यांनी शुभारंभ केला आणि ‘हरित रामेश्वरम प्रकल्पाची’ रूपरेषा प्रकाशित केली.