महाराष्ट्रातील शिर्डी येथे श्री साईबाबा समाधी मंदिरात दर्शन घेवून पंतप्रधानांनी केली पूजा

October 26th, 05:36 pm

महाराष्ट्रातील शिर्डी येथे श्री साईबाबा समाधी मंदिरात दर्शन घेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पूजा केली.

पंतप्रधानांनी महाराष्ट्रात शिर्डी येथे निळवंडे धरणाचे केले जलपूजन

October 26th, 05:36 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रात शिर्डी येथे निळवंडे धरणाचे जलपूजन केले. पंतप्रधानांनी या धरणाला देखील प्रत्यक्ष भेट दिली आणि कालव्याचे पाणी सोडले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र आणि गोव्याला देणार भेट

October 25th, 11:21 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 26 ऑक्टोबर, 2023 रोजी महाराष्ट्र आणि गोव्याला भेट देणार आहेत. पंतप्रधान सुमारे एक वाजता अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी मंदिरात पूजा करून दर्शन घेतील. पंतप्रधानांच्या हस्ते मंदिरातील नवीन दर्शन रांग संकुलाचे उदघाटन देखील होणार आहे. सुमारे दोन वाजता पंतप्रधान निळवंडे धरणाचे जल पूजन करून या धरणाच्या डाव्या कालव्याची यंत्रणा राष्ट्राला समर्पित करतील. त्यानंतर सुमारे सव्वा तीन वाजता पंतप्रधान शिर्डी येथे एका सार्वजनिक सभेला उपस्थित राहणार असून आरोग्य, रेल्वे, रस्ते, तेल आणि वायू अशा बहुविध क्षेत्रातील सुमारे 7500 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण, पायाभरणी आणि उदघाटन करणार आहेत.

पंतप्रधान 11 डिसेंबर रोजी महाराष्ट्र आणि गोव्याच्या दौऱ्यावर

December 09th, 07:39 pm

पंतप्रधान सकाळी 9.30 वाजता नागपूर रेल्वे स्थानकावर पोहोचतील, तिथे ते वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. सकाळी सुमारे 10 वाजता, पंतप्रधान फ्रीडम पार्क मेट्रो स्थानकापासून खापरी मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोमधून प्रवास करतील ,तिथे ते 'नागपूर मेट्रो टप्पा I' राष्ट्राला समर्पित करणार आहेत .या कार्यक्रमादरम्यान ते ‘नागपूर मेट्रो टप्पा -II’ ची पायाभरणीही करतील. सकाळी 10:45 वाजता पंतप्रधान नागपूर आणि शिर्डीला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करणार आहेत आणि महामार्गाचा दौरा करतील. सकाळी 11.15 वाजता पंतप्रधानांच्या हस्ते एम्स नागपूर चे राष्ट्रार्पण होणार आहे.

श्री साईबाबा समाधीच्या शताब्दीपूर्ती समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

October 19th, 12:49 pm

व्यासपीठावर उपस्थित राज्यपाल श्री विद्यासागर रावजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे जी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी, सुभाष भामरे जी, साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष सुरेश हावरेजी, महाराष्ट्रातील सर्व मंत्री, संसदेतील माझे सहकारी, राज्य विधानसभेतील आमदार आणि आज इथे मोठ्या संख्येने जमलेल्या माझ्या बंधू–भगिनींनो, तुम्हा सगळ्यांना, संपूर्ण महाराष्ट्राला, पूर्ण देशाला देशातील तमाम जनतेला विजयादशमीच्या अनेक अनेक शुभेच्छा !

पंतप्रधानांची श्री साई बाबा शताब्दी महोत्सवाच्या समारोपानिमित्त शिर्डीला भेट, सभेला संबोधन

October 19th, 12:45 pm

एका जन सभेत त्यांनी साईबाबा संस्थान ट्रस्टच्या विविध विकासकामांच्या पायाभरणीच्या फलकांचे अनावरण केले. श्री साईबाबा समाधीशताब्दी वर्षानिमित्त एका चांदीच्या नाण्याचेही अनावरण यावेळी त्यांच्या हस्ते करण्यात आले.

PM offers prayers at Shri Saibaba's Samadhi Temple in Shirdi

October 19th, 11:30 am

PM Narendra Modi offered prayers at Shri Saibaba's Samadhi Temple in Shirdi, Maharashtra.