पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रीसच्या पंतप्रधानांशी साधला संवाद
November 02nd, 08:22 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुरध्वनी द्वारे ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस यांच्याशी संवाद साधला.गुजरातमधील लोथल इथल्या राष्ट्रीय सागरी वारसा संकुल (एनएमएचसी) विकासाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
October 09th, 03:56 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुजरातमधील लोथल येथे राष्ट्रीय सागरी वारसा संकुल (एनएमएचसी) विकसित करण्यास मान्यता देण्यात आली. हा प्रकल्प दोन टप्प्यात पूर्ण होणार आहे.सर्व प्रकारच्या हवामानासाठी तयार तसेच क्लायमेट -स्मार्ट भारताच्या निर्मितीसाठी पुढील दोन वर्षांसाठी 2,000 कोटी रुपये खर्चासह 'मिशन मौसम'ला केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मंजुरी
September 11th, 08:19 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने येत्या दोन वर्षांमध्ये 2,000 कोटी रुपये खर्चासह ‘मिशन मौसम’ ला मंजूरी दिली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रीसच्या पंतप्रधानांच्या भारत भेटीदरम्यान माध्यमांना दिलेले निवेदन
February 21st, 01:30 pm
पंतप्रधान मित्सो-ताकिस आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे भारतात स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे. गेल्या वर्षीच्या माझ्या ग्रीस भेटीनंतरचा त्यांचा भारत दौरा दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी मजबूत होत असल्याचे निदर्शक आहे. सोळा वर्षांच्या प्रदीर्घ कालावधी नंतर ग्रीसच्या पंतप्रधानांनी भारताला दिलेली भेट, हा एक ऐतिहासिक प्रसंग आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी 16-17 जानेवारी रोजी आंध्र प्रदेश आणि केरळच्या दौऱ्यावर
January 14th, 09:36 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 16-17 जानेवारी 2024 रोजी आंध्रप्रदेश आणि केरळ या राज्यांना भेट देणार आहेत.पंतप्रधान 2 आणि 3 जानेवारी 2024 रोजी तामिळनाडू, लक्षद्वीप आणि केरळला भेट देणार
December 31st, 12:56 pm
2 जानेवारी 2024 रोजी, सकाळी 10:30 वाजता, पंतप्रधान तिरुचिरापल्ली, तामिळनाडू येथे पोहोचतील. तिरुचिरापल्ली येथील भारतीदासन विद्यापीठाच्या 38 व्या दीक्षांत समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत. पंतप्रधान दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास तिरुचिरापल्ली येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात विमान वाहतूक, रेल्वे, रस्ते, तेल आणि वायू, नौवहन तसेच उच्च शिक्षण क्षेत्राशी संबंधित 19,850 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन तसेच लोकार्पण करतील. दुपारी 3.15 च्या सुमारास पंतप्रधान लक्षद्वीप मधील अगत्ती येथे पोहोचतील. तिथे ते एका सार्वजनिक कार्यक्रमाला संबोधित करतील. 3 जानेवारी, 2024 रोजी, दुपारी 12 वाजता, पंतप्रधान लक्षद्वीपमधील कवरत्ती येथे पोहोचतील. लक्षद्वीपशी येथील कार्यक्रमात ते दूरसंचार, पेयजल, सौर ऊर्जा आणि आरोग्य यासारख्या इतर क्षेत्रांशी संबंधित अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करतील.जागतिक भारतीय सागरी परिषद 2023 मध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 17th, 11:10 am
तिसऱ्या जागतिक भारतीय सागरी परिषद 2023 मध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. यापूर्वी 2021 मध्ये जेव्हा आपण भेटलो होतो, तेव्हा कोविड महामारीच्या अनिश्चिततेमुळे संपूर्ण जग त्रस्त झाले होते. कुणालाही माहीत नव्हते की कोरोना नंतरचे जग कसे असेल. मात्र आज एक नवीन जागतिक व्यवस्था आकार घेत आहे आणि बदलत्या जागतिक व्यवस्थेत संपूर्ण जग भारताकडे नव्या आशेने पाहत आहे. आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या जगात भारताची अर्थव्यवस्था सातत्याने मजबूत होत आहे. आता तो दिवस दूर नाही जेव्हा भारत जगातील अव्वल तीन अर्थव्यवस्थांपैकी एक होईल. आपण सर्वजण जाणतो की जगातील बहुतांश व्यापार सागरी मार्गाने होतो. कोरोना पश्चात काळात आज जगालाही विश्वासार्ह आणि लवचिक पुरवठा साखळीची गरज आहे. म्हणूनच यंदाची जागतिक भारतीय सागरी परिषद अतिशय महत्वपूर्ण आहे.जागतिक भारतीय सागरी परिषद 2023 चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
October 17th, 10:44 am
तिसऱ्या जागतिक भारतीय सागरी परिषद 2023 चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आज मुंबईत झाले. भारतीय सागरी नील अर्थव्यवस्थेची ब्लू प्रिंट असलेल्या 'अमृत काल व्हिजन 2047' चे अनावरणही त्यांनी केले. या भविष्यवेधी योजनेच्या अनुषंगाने, भारतीय सागरी नील अर्थव्यवस्थेसाठी 'अमृत काल व्हिजन 2047' शी संबंधित 23,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण पंतप्रधानांनी केले. देशाच्या सागरी क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी ही शिखर परिषद एक उत्कृष्ट व्यासपीठ आहे.भारत आता वाणिज्य तसेच लॉजिस्टिक्स क्षेत्रातील मोठे केंद्र म्हणून विकसित होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे: पंतप्रधान
May 01st, 03:43 pm
केंद्रीय बंदरे, नौवहन तसेच जलमार्ग मंत्रालयाने ट्विट संदेशात म्हटले आहे की जागतिक बँकेच्या एलपीआय 2023 या अहवालातील माहितीनुसार, इतर अनेक देशांपेक्षा भारतातील बंदरांनी कमी वेळेत अधिक चांगल्या पद्धतीने कार्य पूर्ण केले असून त्यांची कार्यक्षमता तसेच उत्पादकता यांना अधिक चालना मिळाली आहे.कोची इथल्या देशातील पहिल्या वॉटर मेट्रोची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
April 26th, 02:51 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोची इथल्या देशातील पहिल्या वॉटर मेट्रोची प्रशंसा केली आहे.तुतीकोरीन बंदरातल्या वृक्षारोपण उपक्रमाची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
April 23rd, 10:24 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुतीकोरीन बंदरातल्या वृक्षारोपण उपक्रमाचं कौतुक केले आहे.वर्ष 2022 मध्ये बंदरे, नौकानयन आणि जलमार्ग मंत्रालयाने तुतीकोरीन बंदरात दहा हजार रोपटी लावली होती ज्यांचे आता वृक्षात रूपांतरण झाले आहे, जे येणाऱ्या पिढ्यांसाठी उपयुक्त सिद्ध होईल.सागरी विश्वात भारताच्या प्रगतीत योगदान दिलेल्या सर्वांचे राष्ट्रीय सागरी दिनानिमित्त पंतप्रधानांनी केले स्मरण
April 05th, 02:28 pm
केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले की :देशातील प्रमुख बंदरांनी नवे विक्रम प्रस्थापित केल्याबद्दल पंतप्रधानांनी केली प्रशंसा
April 04th, 10:24 am
केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत प्रमुख बंदरांनी आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये गेल्या वर्षीच्या उलाढालीच्या तुलनेत 10.4%ची वाढ नोंदवत मालवाहतुकीच्या पूर्वनिर्धारित उद्दिष्टांची पूर्तता करून नवे विक्रम नोंदवत केलेल्या कामगिरीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे.बंदरांशी संबंधित विकास आणि व्यवसाय सुलभतेसाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेताना पाहून आनंद झाला: पंतप्रधान
April 02nd, 10:34 am
सागर सेतू या राष्ट्रीय लॉजिस्टिक सागरी पोर्टलच्या मोबाईल अॅपबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डेन्मार्कच्या पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक
May 03rd, 06:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिकसेन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली.ईस्टर्न इकॉनॉमिक फोरम 2021 मध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधानांनी केलेले भाषण
September 03rd, 10:33 am
ईस्टर्न इकॉनॉमिक फोरमला संबोधित करताना मला आनंद होत आहे आणि या सन्मानासाठी मी अध्यक्ष पुतीन यांचे आभार मानतो.पंतप्रधानांचे व्लादिवोस्तोक येथे आयोजित 6व्या पूर्व आर्थिक मंच 2021 शिखर परिषदेत आभासी माध्यमातून केलेले भाषण
September 03rd, 10:32 am
व्लादिवोस्तोक येथे 3 सप्टेंबर 2021 रोजी आयोजित 6 व्या पूर्व आर्थिक मंचाच्या (ईईएफ) शिखर परिषदेच्या पूर्ण सत्राला पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले. यापूर्वी पंतप्रधान 2019 मध्ये 5 व्या पूर्व आर्थिक मंचाच्या बैठकीत मुख्य अतिथी म्हणून सहभागी झाले होते आणि या परिषदेत सहभागी होणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान होते.मंत्रालय आणि सीपीएसई यांनी काढलेल्या जागतिक निविदांमध्ये भारतीय नौवहन कंपन्यांना अनुदान सहाय्य देऊन भारतात व्यापारी जहाजांच्या ध्वजांकनास प्रोत्साहन देण्याच्या योजनेला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
July 14th, 08:27 pm
आत्मनिर्भर भारतचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने भारतीय नौवहन कंपन्यांना सरकारी माल आयात करण्यासाठी मंत्रालय व सीपीएसई यांनी काढलेल्या जागतिक निविदांमध्ये अनुदान म्हणून पाच वर्षांत 1624 कोटी रुपये देण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे. याचे तपशील पुढीलप्रमाणे-मेरीटाईम इंडिया समिट 2021 चे पंतप्रधानांनी केले उद्घाटन
March 02nd, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भारतीय सागरी परिषद (मेरीटाइम इंडिया समिट) 2021 ’ चे उद्घाटन केले. डेन्मार्कचे परिवहन मंत्री बेनी एंगलेब्रेक्ट, गुजरात आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री धर्मेद्र प्रधान आणि मनसुख मांडवीय यावेळी उपस्थित होते. जगाने, जागतिक उद्योगाने भारतात यावे आणि भारताच्या विकासात सहभागी व्हावे असे निमंत्रण या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. सागरी क्षेत्रात विकसित होण्यासाठी आणि जगातील अग्रणी ब्लू इकॉनॉमी अर्थात सागरी क्षेत्रातली महत्वाची अर्थव्यवस्था म्हणून विकसित होण्याबाबत भारत फारच गंभीर आहे. पायाभूत सुविधांच्या उन्नतीसाठी, सुधारणांना चालना देत आत्मनिर्भर भारताची दृष्टी दृढ करत लक्ष्य साकार करण्याचे भारताचे ध्येय आहे, असे ते म्हणाले.मेरीटाईम इंडिया समिट 2021 चे पंतप्रधानांनी केले उद्घाटन
March 02nd, 10:59 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भारतीय सागरी परिषद (मेरीटाइम इंडिया समिट) 2021 ’ चे उद्घाटन केले. डेन्मार्कचे परिवहन मंत्री बेनी एंगलेब्रेक्ट, गुजरात आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री धर्मेद्र प्रधान आणि मनसुख मांडवीय यावेळी उपस्थित होते. जगाने, जागतिक उद्योगाने भारतात यावे आणि भारताच्या विकासात सहभागी व्हावे असे निमंत्रण या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. सागरी क्षेत्रात विकसित होण्यासाठी आणि जगातील अग्रणी ब्लू इकॉनॉमी अर्थात सागरी क्षेत्रातली महत्वाची अर्थव्यवस्था म्हणून विकसित होण्याबाबत भारत फारच गंभीर आहे. पायाभूत सुविधांच्या उन्नतीसाठी, सुधारणांना चालना देत आत्मनिर्भर भारताची दृष्टी दृढ करत लक्ष्य साकार करण्याचे भारताचे ध्येय आहे, असे ते म्हणाले.