मोदी सरकार शैक्षणिक क्षेत्रात अशा प्रकारे परिवर्तन घडवत आहे
September 07th, 12:03 pm
प्राथमिक, उच्च आणि वैद्यकीय शिक्षणावर लक्ष केंद्रित करून शैक्षणिक क्षेत्रात जलदगतीने बदल घडवून आणण्यावर मोदी सरकारचा भर राहिला आहे. मोदी सरकारने 2014 पासूनच नवीन IIT, IIM, IIIT, NIT and NID संस्थांच्या स्थापनेची घोषणा केली आहे. 2014 पासून दरवर्षी प्रत्येकी एक नवीन IIT आणि IIM स्थापन करण्यात येत आहे.शिक्षक पर्व परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधानांनी केलेले भाषण
September 07th, 10:31 am
शिक्षक पर्व या महत्त्वाच्या कार्यक्रमात माझ्यासोबत सहभागी झालेले केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारीश्री धर्मेंद्र प्रधान,श्रीमती अन्नपूर्णा देवी ,डॉ. सुभास सरकार, डॉ. राजकुमार रंजन सिंह, देशाच्या विविध राज्यातील माननीय शिक्षकवर्ग, राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा आराखडा तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष डॉ. कस्तुरीरंगन, त्यांच्या टीममधील सर्व मान्यवर सन्माननीय सदस्य, संपूर्ण देशभरातून आपल्यासोबत उपस्थित असलेले सर्व विद्वान प्राचार्यवर्ग, शिक्षकवर्ग आणि प्रिय विद्यार्थ्यांनो,पंतप्रधानांनी शिक्षक पर्व परिषदेच्या उद्घाटन समारंभास केले संबोधित
September 07th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षक पर्व परिषदेच्या उद्घाटन समारंभास आभासी माध्यमातून (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) संबोधित केले. भारतीय सांकेतिक भाषा शब्दकोष (श्रवण दोष असलेल्यांसाठी ऑडिओ आणि मजकूर अंतर्भूत असलेली सांकेतिक भाषा व्हिडिओ, वैश्विक शिक्षण रचनेला अनुरूप), बोलणारी पुस्तके (दृष्टिहीनांसाठी ऑडिओ बुक्स), सीबीएसईच्या शालेय गुणपत्ता हमी आणि मूल्यांकन आराखडा, NISHTHA - निपुण भारत (NIPUN Bharat) आणि विद्यांजली पोर्टल साठी शिक्षकांचा प्रशिक्षण कार्यक्रम (शालेय विकासासाठी शिक्षण स्वयंसेवक / देणगीदार/व्यावसायिक सामाजिक जबाबदारीतून योगदान देणाऱ्यांच्या सोयीसाठी) आदी उपक्रमांचेही पंतप्रधानांनी उद्घाटन केले.पंतप्रधान 7 सप्टेंबर रोजी शिक्षक पर्वच्या उद्घाटन समारंभाला संबोधित करणार
September 05th, 02:32 pm
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी 7 सप्टेंबर, 2021 रोजी सकाळी 10.30 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून शिक्षक पर्वच्या उद्घाटन कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान ते शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रमुख उपक्रमांचाही प्रारंभ करतील. भारतीय सांकेतिक भाषा शब्दकोश (श्रवणदोष असलेल्यांसाठी ध्वनी आणि मजकूर अंतर्भूत असलेली सांकेतिक भाषा चित्रफीत ,शिकण्याच्या सार्वत्रिक रचनेच्या अनुरूप), बोलणारी पुस्तके (दृष्टिहीनांसाठी ध्वनी पुस्तके), सीबीएसईचा शालेय गुणवत्ता हमी आणि मूल्यांकन आराखडा ,निपुण भारत आणि विद्यांजली पोर्टलसाठी निष्ठा (NISHTHA) शिक्षकांचा प्रशिक्षण कार्यक्रम (शालेय विकासासाठी शिक्षण स्वयंसेवक/ देणगीदार/ सामाजिक उत्तरदायित्व योगदान देणाऱ्यांच्या सोयीसाठी) आदींचे पंतप्रधान उद्घाटन करतील. गुणवत्ता आणि शाश्वत शाळा: भारतातील शाळांमधील शिक्षण ही 'शिक्षक पर्व -2021' ची संकल्पना आहे. सर्व स्तरांवर केवळ शिक्षणाच्या सातत्यासह देशभरातील शाळांमध्ये गुणवत्ता, सर्वसमावेशक पद्धती आणि शाश्वत सुधारणा सुनिश्चित करण्यासाठी नाविन्यपूर्ण पद्धतींना हा शिक्षण पर्व उत्सव प्रोत्साहन देईल . या कार्यक्रमाला केंद्रीय शिक्षण मंत्री आणि केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री देखील उपस्थित राहतील.एनईपी 2020 अंतर्गत “21 व्या शतकातील शालेय शिक्षण”या विषयावरील परिषदेत पंतप्रधानांचे भाषण
September 11th, 11:01 am
मंत्रिमंडळातील माझे सहकारी, रमेश पोखरियाल निशंक जी, देशाचे शिक्षणमंत्री संजय धोत्रे जी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसुदा तयार करणार्या समितीचे अध्यक्ष डॉ. कस्तुरी रंगन जी, त्यांच्या चमुचे सन्माननीय सदस्य, या विशेष परिषदेत भाग घेणारे सर्व राज्यातील विद्वान, मुख्याध्यापक, शिक्षक, बंधू आणि भगिनींनो, आज आपण सर्व जण आपल्या देशाचे भविष्य घडवणाऱ्या क्षणाचा एक भाग होत आहोत. नवीन युगाच्या निर्मितीची बीज असणारा हा क्षण आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 21 व्या शतकाच्या भारताला एक नवीन दिशा देणार आहे.पंतप्रधानांचे एनईपी 2020 अंतर्गत “21 व्या शतकातील शालेय शिक्षण” या विषयावरील परिषदेत संबोधन
September 11th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एनईपी 2020 अंतर्गत “21 व्या शतकातील शालेय शिक्षण” या विषयावरील परिषदेला व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबोधित केले.