संयुक्त अरब अमिराती आणि कतार इथे रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांनी केलेले निवेदन

February 13th, 10:46 am

मी 13-14 फेब्रुवारी रोजी संयुक्त अरब अमिराती आणि 14-15 फेब्रुवारी रोजी कतारच्या अधिकृत दौऱ्यावर जात आहे. हा माझा 2014 नंतरचा संयुक्त अरब अमिरातीचा सातवा आणि कतारचा दुसरा दौरा असेल.

जागतिक हवामान बदल कृती परिषदेला उपस्थित राहण्यासाठी दुबई ला जाण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवेदन

November 30th, 05:44 pm

माझे बंधू दुबईचे राष्ट्राध्यक्ष आणि अबू धाबीचे शासक महामहिम शेख मोहम्मद बिन झाएद अल नह्यान यांच्या निमंत्रणावरून मी १ डिसेंबर रोजी होणाऱ्या कॉप २८ जागतिक हवामान बदल कृती परिषदेला उपस्थित राहण्यासाठी दुबईला जात आहे. हवामान बदल क्षेत्रात भारताचा निकटचा भागीदार असलेल्या दुबईच्या अध्यक्षतेखाली ही अतिशय महत्वाची परिषद होत असल्याबद्दल मला अतिशय आनंद होत आहे.