पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अबुधाबीच्या युवराजांचे स्वागत
September 09th, 08:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत अबुधाबीचे युवराज शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांचे स्वागत केले. उभय नेत्यांमध्ये विविध विषयांवर फलदायी चर्चा झाली.करारांची यादी : अबू धाबीचे युवराज शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांची भारताला भेट
September 09th, 07:03 pm
एमिरेट्स न्यूक्लियर एनर्जी कंपनी (ENEC) आणि न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) यांच्यात बरकाह अणु उर्जा सयंत्र कार्यान्वयन आणि देखभाल या क्षेत्रातील सामंजस्य करारअबु धाबीचे युवराज शेख खलिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांचा भारत दौरा (सप्टेंबर 9-10, 2024)
September 09th, 07:03 pm
अबू धाबीचे युवराज शेख खलिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून 9-10 सप्टेंबर 2024 या कालावधीत भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आले आहेत.युवराज म्हणून त्यांचा हा पहिलाच अधिकृत भारत दौरा आहे. काल त्यांचे नवी दिल्ली येथे आगमन झाल्यावर वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी त्यांचे स्वागत केले आणि त्यांना समारंभपूर्वक मानवंदना देण्यात आली. त्यांच्यासोबत मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि मोठे व्यापारी शिष्टमंडळ आहे.एक्स्पो 2020 दुबई इथे भारतीय दालनातल्या उपस्थितांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले संबोधन
October 01st, 08:55 pm
एक्स्पो 2020 दुबई इथल्या भारतीय दालनात स्वागत. हे ऐतिहासिक प्रदर्शन आहे. मध्य पूर्व, आफ्रिका आणि दक्षिण आशिया क्षेत्रात होणारे हे पहिले प्रदर्शन आहे. मोठ्या दालनापैकी एका दालनासह भारत यामध्ये सहभागी होत आहे. संयुक्त अरब अमिरात आणि दुबई समवेत असलेले प्रदीर्घ आणि ऐतिहासिक संबंध हे प्रदर्शन अधिक दीर्घ करेल असा मला विश्वास आहे. संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष आणि अबुधाबीचे शासक महामहीम शेख खलीफा बिन झायेद बिन अल नाह्यान यांना भारत सरकार आणि भारतीय जनतेच्या वतीने शुभेच्छा देऊन मी सुरुवात करतो.दुबई एक्स्पो 2020 प्रदर्शनात भारतीय पॅव्हेलियनमध्ये पंतप्रधानांनी दिलेला संदेश
October 01st, 08:54 pm
दुबई एक्स्पो 2020 प्रदर्शनात भारतीय पव्हेलियनला दिलेल्या संदेशात या प्रदर्शनाला ऐतिहासिक असे संबोधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, “मध्य पूर्व, आफ्रिका आणि दक्षिण आशियाई प्रदेशात प्रथमच हे प्रदर्शन भरत आहे. संयुक्त अरब अमिरात आणि दुबईशी असलेले आमचे दृढ आणि ऐतिहासिक नातेसंबंध अधिक चांगल्या पद्धतीने जपण्यासाठी हे प्रदर्शन दीर्घकाळ मदत करेल.” पंतप्रधानांनी संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्रपती आणि अबुधाबीचे राज्यकर्ते महामहीम शेख खलिफा बिन झायेद बिन अल् नह्यान तसेच संयुक्त अरब अमिरातीचे पंतप्रधान आणि उपराष्ट्रपती व दुबईचे राज्यकर्ते शेख मोहम्मद बिन रशिद अल् मक्तोम यांचे अभिनंदन केले. “आपल्या धोरणात्मक भागीदारीबाबत प्रगती करण्यात दोन्ही देशांना जे यश मिळाले आहे त्यासाठी राजपुत्र महामहीम शेख मोहम्मद बिन झायेद अल् नह्यान यांनी महत्त्वाचा हातभार लावला आहे, दोन्ही देशांची प्रगती आणि समृद्धी साधण्यासाठी आपण असेच एकत्रितपणे काम करत राहू अशी अशा मी व्यक्त करतो,” असे गौरवोद्गार काढत पंतप्रधानांनी राजपुत्र महोदयांना शुभेच्छा दिल्या.