बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या भारत भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले प्रसार माध्यम निवेदन.

June 22nd, 01:00 pm

मी पंतप्रधान शेख हसीना जी आणि त्यांच्या प्रतिनिधी मंडळाचे हार्दिक स्वागत करत आहे. तसे पाहिले तर, गेल्या सुमारे एका वर्षाच्या काळात आम्ही दहा वेळा भेटलो आहोत. पण आजची भेट विशेष आहे. कारण आमच्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात पंतप्रधान शेख हसीना जी आपल्या पहिल्या अतिथी आहेत.

Heads of States attend swearing-in ceremony of the Prime Minister and Council of Ministers

June 09th, 11:50 pm

The swearing-in ceremony of Prime Minister Shri Narendra Modi and the Council of Ministers took place in Rashtrapati Bhavan on 09 June 2024. Leaders from India’s neighbourhood and the Indian Ocean region participated in the ceremony as honoured guests.

पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी विविध नेत्यांची भारतभेट

June 08th, 12:24 pm

2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा 9 जून 2024 रोजी शपथविधी होणार आहे. यावेळी भारताच्या शेजारील आणि हिंद महासागर प्रदेशातील देशांच्या नेत्यांना सन्माननीय अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंगे, मालदीव्जचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद मोईज्जू, सेशेल्सचे उपाध्यक्ष अहमद अफीफ, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद कुमार जगन्नाथ, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कुमार दहल प्रचंडा आणि भूतानचे पंतप्रधान त्शेरिंग तोगबे यांनी या शपथविधीचे निमंत्रण स्वीकारले आहे.

बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान मोदी यांचे केले अभिनंदन

June 05th, 08:04 pm

देशात नुकत्याच पार पडलेल्या 18 व्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) ला मिळालेल्या विजयाबद्दल बांग्लादेश प्रजासत्ताकाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान मोदी यांना अभिनंदनपर दूरध्वनी करून बातचीत केली.

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे सलग चौथ्यांदा विजयी झाल्याबद्दल पंतप्रधानांनी केले अभिनंदन

January 08th, 07:54 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी संवाद साधला आणि संसदीय निवडणुकीत सलग चौथ्यांदा ऐतिहासिक विजय मिळवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

Our connectivity initiatives emerged as a lifeline during the COVID Pandemic: PM Modi

November 01st, 11:00 am

PM Modi and President Sheikh Hasina of Bangladesh jointly inaugurated three projects in Bangladesh. We have prioritized the strengthening of India-Bangladesh Relations by enabling robust connectivity and creating a Smart Bangladesh, PM Modi said.

भारताचे पंतप्रधान आणि बांगलादेशचे पंतप्रधान 1 नोव्हेंबर रोजी तीन विकास प्रकल्पांचे संयुक्तपणे उद्घाटन करणार

October 31st, 05:02 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या हस्ते संयुक्तपणे उद्या 1 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून भारतातर्फे सहाय्यीकृत तीन विकास प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहे. अखौरा-आगरताळा सीमापार रेल्वे जोडणी,खुलना-मोंगला बंदर रेल्वे मार्ग; आणि मैत्री महा औष्णिक ऊर्जा प्रकल्पाचे युनिट-2 हे ते तीन प्रकल्प आहेत.

पंतप्रधानांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची घेतली भेट

September 08th, 07:53 pm

राजकीय, सुरक्षा, आर्थिक, कनेक्टिव्हिटी आणि लोकांमधील परस्पर संबंधांसह द्विपक्षीय सहकार्यातील प्रगतीचे त्यांनी केले सकारात्मक मूल्यांकन .

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी नवी दिल्ली येथील आपल्या निवासस्थानी घेणार तीन द्विपक्षीय बैठका- मॉरिशसचे पंतप्रधान, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसोबत या तीन बैठकांमध्ये होणार चर्चा

September 08th, 01:40 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका ट्वीटर संदेशात माहिती दिली आहे की ते आज संध्याकाळी नवी दिल्ली येथे आपल्या निवासस्थानी तीन द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. यामध्ये मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याबरोबरच्या बैठकीचा समावेश असेल.

भारत-बांगलादेश मैत्री पाइपलाइनचे भारत आणि बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या हस्ते संयुक्तरित्या करणार आभासीपद्धतीने उद्घाटन

March 16th, 06:55 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना 18 मार्च 2023 रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी पाच वाजता दूरदृश्य प्रणाली द्वारे भारत-बांगलादेश मैत्री पाइपलाइनचे उद्घाटन करतील.

India - Bangladesh Joint Statement during the State Visit of Prime Minister of Bangladesh to India

September 07th, 03:04 pm

PM Sheikh Hasina of Bangladesh, paid a State Visit to India at the invitation of PM Modi. The two Prime Ministers held discussions on the entire gamut of bilateral cooperation, including political and security cooperation, defence, border management, trade and connectivity, water resources, power and energy, development cooperation, cultural and people-to-people links.

बांगलादेशच्या पंतप्रधानांची भारत भेट

September 06th, 02:54 pm

बांगलादेशच्या पंतप्रधानांची भारत भेट

बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांसमोर केलेले निवेदन

September 06th, 01:11 pm

सर्वप्रथम, मी पंतप्रधान शेख हसीना जी आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे हार्दिक स्वागत करतो. गेल्या वर्षी आपण बांगलादेशच्या स्वातंत्र्याचा पन्नासावा वर्धापनदिन, आपल्या राजनैतिक संबंधांचा सुवर्ण महोत्सव आणि वंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांची जन्मशताब्दी साजरी केली. गेल्या वर्षी 06 डिसेंबर रोजी आम्ही मिळून पहिला 'मैत्री दिवस' जगभरात साजरा केला. आज आपल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या काळात पंतप्रधान शेख हसीना जी यांचा दौरा होत आहे आणि मला विश्वास आहे की पुढील 25 वर्षांच्या अमृत काळात भारत-बांगलादेश दरम्यानचे स्नेहबंध नवीन उंची गाठतील.

पंतप्रधान मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधानांची संयुक्त पत्रकार परिषद

September 06th, 01:10 pm

नवी दिल्लीत बांगलादेशच्या पंतप्रधानांसह घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करताना, पंतप्रधान मोदी म्हणाले, बांगलादेश हा भारताचा सर्वात मोठा विकासाचा भागीदार आणि या भागातील आमचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. उभय देशांतील लोकांमधील परस्पर सहकार्यामध्ये सातत्याने सुधारणा होत आहे. कुशीयारा नदीच्या पाणीवाटपासंदर्भातील महत्त्वाच्या करारावरही दोन्ही देशांमध्ये स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

बांग्लादेशच्या पंतप्रधानांचे सुरक्षा सल्लागार मेजर जनरल (निवृत्त) तारिक अहमद सिद्दिक यांनी पंतप्रधानांची घेतली सदिच्छा भेट

March 07th, 09:12 pm

बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे सुरक्षा सल्लागार मेजर जनरल (निवृत्त) तारिक अहमद सिद्दिक यांनी आज पंतप्रधान मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. पंतप्रधानांनी या भेटीदरम्यान मार्च 2021 मधील आपल्या बांग्लादेश भेटीच्या आठवणींना उजाळा दिला, तसेच पंतप्रधान शेख हसीना यांच्याप्रती सदिच्छा व्यक्त केली.

भारत-बांगलादेश मैत्रीची 50 वर्षांपूर्वी मुहूर्तमेढ रोवली गेली त्याचे आम्ही संयुक्तपणे स्मरण करत हा दिवस साजरा करतो: पंतप्रधान

December 06th, 11:48 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की भारत-बांगलादेश मैत्रीची 50 वर्षांपूर्वी मुहूर्तमेढ रोवली गेली, त्याचे आम्ही संयुक्तपणे स्मरण करतो आणि हा दिवस साजरा करतो.

पंतप्रधानांनी बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांच्या कबरीला भेट देऊन श्रद्धांजली अर्पण केली

March 27th, 01:16 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या बांग्लादेशच्या दोन दिवसीय दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी तुंगीपाडा येथे बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांच्या कबरीला भेट देऊन श्रद्धांजली अर्पण केली. कोणत्याही राष्ट्रप्रमुखांनी किंवा राज्यप्रमुखांनी किंवा शासनप्रमुखांनी बंगबंधूंच्या या समाधीस्थळाच्या वास्तूला भेट देणे हे प्रथमच घडले आहे, ही अशी पहिलीची भेट नोंदविली गेली आहे. ऐतिहासिक घटनेचे स्मरण म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बकुळीच्या झाडाचे रोपे याठिकाणी लावले. यावेळी त्यांच्याबरोबर बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना त्यांच्या भगिनी शेख रेहाना यांच्यासह उपस्थित होत्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांग्लादेश भेटीदरम्यान भारत आणि बांग्लादेशाने जारी केलेले संयुक्त निवेदन

March 27th, 09:18 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांग्लादेश भेटीदरम्यान भारत आणि बांग्लादेशाने जारी केलेले संयुक्त निवेदन

बांग्लादेशाच्या राष्ट्रीय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

March 26th, 04:26 pm

PM Modi took part in the National Day celebrations of Bangladesh in Dhaka. He awarded Gandhi Peace Prize 2020 posthumously to Bangabandhu Sheikh Mujibur Rahman. PM Modi emphasized that both nations must progress together for prosperity of the region and and asserted that they must remain united to counter threats like terrorism.

बांग्लादेशच्या राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमास पंतप्रधानांची उपस्थित

March 26th, 04:24 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या दोन दिवसीय बांग्लादेश दौऱ्यादरम्यान, बांग्लादेशच्या स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते . बांग्लादेशचे राष्ट्रपती महामहीम महंमद अब्दुल हामीद, पंतप्रधान महामहीम शेख हसीना, शेख मुजिब्बुर रहमान यांच्या कनिष्ठ कन्या शेख रेहाना, मुजीब बोर्शो उत्सवासाठीचे राष्ट्रीय अंमलबजावणी समितीचे मुख्य समन्वयक डॉ. कमाल अब्दुल नासीर चौधरी आणि अन्य मान्यवरांसह यावेळी मोडी यांच्या समवेत उपस्थित होते. तेजगांव येथे नॅशनल परेड स्क्वेअर येथे हा कार्यक्रम झाला. बांग्लादेशचे राष्ट्रपिता बंगबंधू शेख मुजिबुर रहमान यांच्या जन्मशताब्दीवर्ष सोहळ्याची सुरुवात यावेळी करण्यात आले.