उत्तराखंडमध्ये डेहराडून येथे विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
December 04th, 12:35 pm
उत्तराखंड का, सभी दाणा सयाणौ, दीदी-भूलियौं, चच्ची-बोडियों और भै-बैणो। आप सबु थैं, म्यारू प्रणाम ! मिथै भरोसा छ, कि आप लोग कुशल मंगल होला ! मी आप लोगों थे सेवा लगौण छू, आप स्वीकार करा !पंतप्रधानांच्या हस्ते देहरादूनमध्ये सुमारे 18,000 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी
December 04th, 12:34 pm
या प्रदेशातील भूस्खलनाची दीर्घकालीन समस्या सोडवून प्रवास सुरक्षित करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलेल्या सात प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधानांनी केले. राष्ट्रीय महामार्ग -58 वर ब्रह्मपुरी ते कोडियाला आणि देवप्रयाग ते श्रीकोट रस्ता रुंदीकरण प्रकल्प , यमुना नदीवर बांधलेला 120 मेगावॅट व्यासी जलविद्युत प्रकल्प, देहरादून येथील हिमालयीन सांस्कृतिक केंद्र आणि देहरादूनमधील अत्याधुनिक सुगंधी प्रयोगशाळा केंद्र यांचे उदघाटनही पंतप्रधानांनी केले.पंतप्रधान 4 डिसेंबर रोजी देहरादूनमध्ये सुमारे 18,000 कोटी रुपयांच्या बहुविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील
December 01st, 12:06 pm
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी 4 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 1 वाजता देहरादूनला भेट देतील आणि सुमारे 18,000 कोटी रुपयांच्या बहुविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. रस्ते पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या प्रकल्पांवर या भेटीचा एक महत्त्वाचा भर असेल, ज्यामुळे प्रवास सुरळीत आणि सुरक्षित होईल आणि या प्रदेशात पर्यटन देखील वाढेल. एके काळी दुर्गम समजल्या जाणाऱ्या भागात संपर्क व्यवस्था (कनेक्टिव्हिटी) वाढवण्याच्या पंतप्रधानांच्या दूरदृष्टीच्या अनुषंगाने हे प्रकल्प उभारले जात आहेत.