पंतप्रधान 30 डिसेंबर रोजी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर

December 29th, 12:35 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 डिसेंबर 2022 रोजी पश्चिम बंगालला भेट देतील. सकाळी 11:15 वाजता पंतप्रधान हावडा रेल्वे स्थानकावर पोहोचतील. तिथे हावडा ते न्यू जलपाईगुडीला जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला ते हिरवा झेंडा दाखवतील. कोलकाता मेट्रोच्या पर्पल लाईनच्या जोका-तरताला मार्गाचे उद्घाटनही करतील आणि विविध रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी करुन ते राष्ट्राला समर्पित करतील. पंतप्रधान, दुपारी 12 वाजता, आयएनएस नेताजी सुभाष येथे पोहोचतील. तिथे ते नेताजी सुभाष यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करतील नंतर डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी – राष्ट्रीय जल आणि स्वच्छता संस्थेचे (डीएसपीएम – एनआयडब्लूएएस) उद्घाटन करतील. राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियाना अंतर्गत ते पश्चिम बंगालमधील सांडपाणी वाहून नेणाऱ्या अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणी करुन ते राष्ट्राला समर्पित करतील. दुपारी 12:25 च्या सुमारास पंतप्रधान राष्ट्रीय गंगा परिषदेच्या दुसऱ्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतील.

बिहारमध्ये अनेक विकास प्रकल्पांचे उद्‌घाटन करताना प्रधानमंत्री यांनी केलेले भाषण

September 15th, 12:01 pm

मित्रांनो, आज ज्या चार योजनांचे उद्‌घाटन होत आहे, त्यात पाटणा शहरातील बेऊर आणि करमलीचक मध्ये ट्रीटमेंट प्लांट , शिवाय AMRUT योजनेअंतर्गत छपरामधील जल प्रकल्प यांचा समावेश आहे. याशिवाय मुंगेर आणि जमालपुरमधील पाणी समस्येला दूर करू शकणारी जलपूर्ती योजना आणि मुजफ्फरपूरमध्ये नमामि गंगे अंतर्गत नदीकिनारा विकास योजना याचासु्द्धा आज शिलान्यास झाला आहे. शहरातील गरीब वर्ग, शहरात राहणारा मध्यमवर्ग या सर्व मित्र वर्गाचं जीवन सुकर करणाऱ्या या सुविधा मिळाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन.

पंतप्रधानांनी बिहारमध्ये ‘नमामि गंगे’ योजना आणि ‘अमृत’ योजनेंतर्गत विविध प्रकल्पांचे उद्‌घाटन केले

September 15th, 12:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये 'नमामि गंगे' योजना आणि 'अमृत' योजनेंतर्गत विविध प्रकल्पांचे उद्‌घाटन केले. आज उद्‌घाटन झालेल्या चार योजनांमध्ये पाटणा शहरातील बेऊर आणि करम-लेचक येथील सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प तसेच सिवान आणि छपरा येथील 'अमृत'' योजनेंतर्गत पाण्याशी संबंधित प्रकल्पांचा समावेश आहे. त्याशिवाय मुंगेर व जमालपूर येथील पाणीपुरवठा प्रकल्प व मुजफ्फरपूरमधील नमामि गंगे अंतर्गत रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट योजनांसाठी आज पायाभरणी करण्यात आली.

सोलापूर येथे विविध विकास प्रकल्पांच्या पायाभरणी प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

January 09th, 11:35 am

मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव, येथील तडफदार आणि लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी नितीन गडकरी, संसदेतील माझे अनेक सहकारी, महाराष्ट्राचे मंत्री आणि आमदार गण, आणि इथे मोठ्या संख्येने उपस्थित माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,

Prime Minister Modi launches multiple development projects in Solapur, Maharashtra

January 09th, 11:31 am

Addressing a public meeting in Solapur, after launching multiple development projects, PM Modi referring to the 10% bill for reservation of economically weaker general section, said that it was historic that the bill was passed in the Lok Sabha yesterday. The PM said that the passage of the bill highlighted the NDA government's commitment towards 'Sabka Saath, Sabka Vikas'.

बिहारमधील मोतीहारी येथे चंपारण्य सत्याग्रहाच्या शतक महोत्सवाच्या सांगता समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण

April 10th, 01:32 pm

चंपारण्यच्या पवित्र धरतीवर देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले स्वच्छग्रही बंधू-भगिनी, सर्व स्नेही, सर्व मान्यवरांना मी प्रणाम करतो. सर्वाना माहित आहे की, चंपारण्याच्या याच पवित्र भूमीवरून बापूंनी सत्याग्रह आंदोलनाला सुरुवात केली. इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्ती मिळावी यासाठी अहिंसक शस्त्रात्रे सत्याग्रहाच्या रूपात आपल्याला मिळाले. सत्याग्रहाला शंभर वर्षे पूर्ण झाली. ‘सत्याग्रह ते स्वच्छाग्रह’ आजच्या काळाची गरज होती.

पंतप्रधानांचे राष्ट्रीय स्वच्छाग्रही परिषदेला संबोधन

April 10th, 01:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोतिहारी येथे राष्ट्रीय स्वच्छाग्रही परिषदेला संबोधित केले. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली चंपारण्यात सुरू केलेल्या सत्याग्रह कार्यक्रमाच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

बिहारमधील मोकामा येथे ‘नमामी गंगे ‘ आणि राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांतर्गत, प्रकल्पाच्या कोनशिला समारंभाच्या वेळी पंतप्रधानांचे संबोधन

October 14th, 02:17 pm

अपने सब मोकामावासी के प्रणाम। भगवान परशुराम की पावन धरती पर अपने सबके सादर प्रणाम। हमें मोकामा में आ के धन्य हो गे लियो।

पंतप्रधानांच्या हस्ते पायाभूत प्रकल्पांचे भूमिपूजन, मोकामा इथे जनसभेला केले संबोधित

October 14th, 02:14 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधल्या मोकामा इथे, ‘नमामि गंगे’ उपक्रमाअंतर्गत, चार सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पांचे त्याचबरोबर चार राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन केले. या प्रकल्पांचा अंदाजित खर्च 3700 कोटी रुपये आहे.

पंतप्रधान मोदी उद्या बिहारला भेट देणार आहेत.

October 13th, 04:29 pm

14 ऑक्टोबर 2017 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारला भेट देतील.