पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 सप्टेंबर रोजी करणार सेमीकॉन इंडिया 2024 चे उद्घाटन
September 09th, 08:08 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10:30 वाजता, उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा मधील इंडिया एक्स्पो मार्ट येथे सेमीकॉन इंडिया 2024 चे उद्घाटन करतील.यावेळी ते उपस्थितांना संबोधित देखील करणार आहेत.पंतप्रधानांनी एईएम सिंगापूरला दिली भेट
September 05th, 12:31 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्या समवेत सिंगापूरमधील सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी एईएम ला भेट दिली. यावेळी त्यांना जागतिक सेमीकंडक्टर मूल्य साखळीतील एईएम ची भूमिका, तिचे कार्य आणि भारतासाठीच्या योजना यांबाबत माहिती देण्यात आली. सिंगापूर सेमीकंडक्टर उद्योग संघटनेनें सिंगापूरमधील सेमीकंडक्टर परिसंस्थेचा विकास आणि भारताबरोबर सहकार्याच्या संधी याविषयी थोडक्यात माहिती दिली. या क्षेत्रातील सिंगापूरमधील अन्य विविध कंपन्यांचे प्रतिनिधीही यावेळी उपस्थित होते. ग्रेटर नोएडा येथे 11-13 सप्टेंबर 2024 रोजी होणाऱ्या सेमिकॉन इंडिया प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी पंतप्रधानांनी सिंगापूरच्या सेमीकंडक्टर कंपन्यांना आमंत्रित केले.गुजरातमधील गांधीनगर येथील सेमीकॉन इंडिया परिषद 2023 मधील पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर.
July 28th, 10:31 am
या परिषदेत मला अनेक दीर्घ परिचित चेहरे दिसत आहेत. काही लोक असेही आहेत ज्यांना मी आज प्रथमच भेटत आहे. ज्याप्रमाणे वेळोवळी सॉफ्टवेअर अपडेट करणे आवश्यक असते, तसाच हा कार्यक्रम आहे. सेमीकॉन इंडिया च्या माध्यमातून उद्योगांबरोबरच तज्ञ आणि धोरणकर्त्यांबरोबरचे माझे संबंध नेहमी अपडेट होत राहतात. आणि मला वाटते की आपल्या संबंधांचे तादात्मीकरण करण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. सेमीकॉन इंडिया मध्ये देश विदेशातल्या अनेक कंपन्या आल्या आहेत, आपले स्टार्टप्स देखील आले आहेत. मी आपणा सर्वांचे सेमीकॉन इंडिया मध्ये मनःपूर्वक स्वागत करतो. मी आत्ताच हे प्रदर्शन पाहिले. या क्षेत्रात किती प्रगती झाली आहे, कशाप्रकारे नव्या ऊर्जेसह नवे लोक, नव्या कंपन्या, नवी उत्पादने. मला खूपच थोडा वेळ मिळाला, पण माझा अनुभव खूपच भारावून टाकणार होता. मी सगळ्यांना आग्रह करू इच्छितो, गुजरातच्या युवा पिढीला विशेष आवाहन करतो की, हे प्रदर्शन आणखीन काही दिवस चालणार आहे, तेव्हा अवश्य या, जगामध्ये या नव्या तंत्रज्ञानाने काय ताकद निर्माण केली आहे ते चांगल्या प्रकारे समजून उमजून घ्या.पंतप्रधानांनी गुजरातमधील गांधीनगर येथे सेमीकॉनइंडिया 2023 चे केले उद्घाटन
July 28th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील गांधीनगर येथील महात्मा मंदिर येथे सेमीकॉनइंडिया 2023 परिषदेचे उद्घाटन केले. ‘भारताच्या सेमीकंडक्टर परिसंस्थेला चालना देणे ' ही या परिषदेची मुख्य संकल्पना आहे. ही संकल्पना, सेमीकंडक्टर डिझाइन, उत्पादन आणि तंत्रज्ञान विकासात भारताला जागतिक केंद्र बनवण्याच्या उद्देशाने देशाची सेमीकंडक्टर रणनीती आणि धोरण यांची दर्शक आहे.India means business: PM Modi at Semi-con India Conference
April 29th, 11:01 am
Prime Minister Narendra Modi inaugurated Semi-con India Conference. PM Modi said, It is our collective aim to establish India as one of the key partners in global semiconductor supply chains. We want to work in this direction based on the principle of Hi-tech, high quality and high reliability.PM inaugurates the Semicon India Conference 2022
April 29th, 11:00 am
Prime Minister Narendra Modi inaugurated Semi-con India Conference. PM Modi said, It is our collective aim to establish India as one of the key partners in global semiconductor supply chains. We want to work in this direction based on the principle of Hi-tech, high quality and high reliability.