तीन परम महासंगणक आणि उच्च-कार्यक्षमता युक्त संगणकीय प्रणाली यांचे लोकार्पण करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण

September 26th, 05:15 pm

आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जगात भारतासाठी एका फार मोठ्या कामगिरीचा दिवस आहे. एकविसाव्या शतकातील भारत कशा पद्धतीने विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच संशोधनाला प्राधान्य देत आगेकूच करत आहे याचे प्रतिबिंब आजच्या दिवसात दिसते आहे. आजचा भारत, संभाव्यतेच्या अमर्याद आकाशात नवनव्या संधी घडवतो आहे. आपल्या वैज्ञानिकांनी आणि अभियंत्यांनी तीन ‘परम रुद्र महासंगणक’ तयार केले आहेत. हे तीन महासंगणक देशात दिल्ली, पुणे आणि कोलकाता या शहरांमध्ये बसवण्यात आले आहेत. आजच्या दिवशीच देशासाठी अर्का आणि अरुणिक या दोन उच्च-कार्यक्षमतायुक्त संगणकीय प्रणालींचे देखील उद्घाटन करण्यात आले आहे. या प्रसंगी मी देशातील वैज्ञानिक समुदाय, अभियंते आणि सर्व देशवासियांचे खूप खूप अभिनंदन करतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे तीन परम रुद्र महासंगणकांचे केले लोकार्पण

September 26th, 05:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे सुमारे 130 कोटी रुपयांच्या तीन परम रुद्र महासंगणकांचे लोकार्पण केले. राष्ट्रीय महासंगणक अभियान अंतर्गत स्वदेशी पद्धतीने विकसित केलेले हे महासंगणक पुणे, दिल्ली आणि कोलकाता येथे वैज्ञानिक संशोधनासाठी तैनात करण्यात आले आहेत. हवामान आणि हवामान संशोधनासाठी तयार केलेल्या उच्च कार्यक्षमतेच्या कॉम्प्यूटिंग प्रणालीचे उद्घाटनही पंतप्रधानांनी केले.

उत्तर प्रदेशात ग्रेटर नोएडा येथे सेमीकॉन इंडिया 2024 मध्ये आघाडीच्या सेमीकंडक्टर कंपन्यांच्या सीईओंनी भारताची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची केली प्रशंसा

September 11th, 04:28 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील इंडिया एक्स्पो मार्ट येथे सेमीकॉन इंडिया 2024 चे उद्घाटन केले. सेमीकॉन इंडिया 2024 चे 11 ते 13 सप्टेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले असून ‘सेमीकंडक्टरच्या भविष्याला आकार देणे ’ अशी यंदाची संकल्पना आहे. आहे. तीन दिवसीय परिषद भारताची सेमीकंडक्टर रणनीती आणि धोरण प्रदर्शित करते, ज्यामागे भारताला सेमीकंडक्टरचे जागतिक केंद्र बनवण्याची कल्पना आहे. जगभरातील आघाडीच्या सेमीकंडक्टर कंपन्या या परिषदेत सहभागी होत आहेत . ही परिषद जागतिक नेते, कंपन्या आणि सेमीकंडक्टर उद्योगातील तज्ञांना एकत्र आणेल. या परिषदेत 250 हून अधिक प्रदर्शक आणि 150 वक्ते सहभागी होत आहेत.

ग्रेटर नोएडा, उत्तर प्रदेश येथे सेमीकॉन इंडिया 2024 कार्यक्रमात झालेले पंतप्रधानांचे भाषण

September 11th, 12:00 pm

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री-योगी आदित्यनाथ जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी-अश्विनी वैष्णव आणि जितीन प्रसाद, जागतिक सेमीकंडक्टर उद्योगाशी संबंधित सर्व दिग्गज, शिक्षण-संशोधन आणि नवोन्मेष क्षेत्रातील सर्व भागीदार, इतर मान्यवर पाहुणे, स्त्री-पुरुष आणि सज्जनहो, सर्वांना नमस्कार!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे सेमीकॉन इंडिया 2024 चे उद्घाटन

September 11th, 11:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील इंडिया एक्स्पो मार्ट येथे सेमीकॉन इंडिया 2024 चे उद्घाटन केले. यानिमित्त आयोजित प्रदर्शनालाही मोदी यांनी भेट दिली. 11 ते 13 सप्टेंबर दरम्यान आयोजित या तीन दिवसीय परिषदेत भारताची सेमीकंडक्टर रणनीती आणि धोरण प्रदर्शित केले जाणार आहे ज्यामध्ये भारताला सेमीकंडक्टरचे जागतिक केंद्र बनवण्याची कल्पना आहे.