Our government has taken unprecedented steps for women empowerment in the last 10 years: PM in Panipat, Haryana
December 09th, 05:54 pm
PM Modi launched the ‘Bima Sakhi Yojana’ of Life Insurance Corporation, in line with his commitment to women empowerment and financial inclusion, in Panipat, Haryana. The Prime Minister stressed that it was imperative to ensure ample opportunities and remove every obstacle in their way to empower women. He added that when women were empowered, new doors of opportunities opened for the country.Prime Minister Shri Narendra Modi launches LIC’s Bima Sakhi Yojana
December 09th, 04:30 pm
PM Modi launched the ‘Bima Sakhi Yojana’ of Life Insurance Corporation, in line with his commitment to women empowerment and financial inclusion, in Panipat, Haryana. The Prime Minister stressed that it was imperative to ensure ample opportunities and remove every obstacle in their way to empower women. He added that when women were empowered, new doors of opportunities opened for the country.आयसीए जागतिक सहकारी परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
November 25th, 03:30 pm
भूतानचे पंतप्रधान आणि माझे धाकटे बंधू, फिजीचे उपपंतप्रधान, भारताचे सहकार मंत्री अमित शाह, आंतरराष्ट्रीय सहकार आघाडीचे अध्यक्ष, संयुक्त राष्ट्राचे सर्व प्रतिनिधी, जगभरातून आलेले सहकार विश्वाशी संबंधित सर्व मित्र, भगिनी आणि सद्गृहस्थ हो!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आयसीए जागतिक सहकार परिषदेचे उद्घाटन
November 25th, 03:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे ICA ग्लोबल कोऑपरेटिव्ह कॉन्फरन्स 2024 चे उद्घाटन केले. या कार्यक्रमात संबोधित करताना मोदी यांनी भूतानचे पंतप्रधान महामहिम दाशो शेरिंग तोबगे, फिजीचे उपपंतप्रधान महामहिम मानोआ कामिकामिका, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भारतातील संयुक्त राष्ट्रांचे निवासी समन्वयक शोम्बी शार्प, आंतरराष्ट्रीय सहकारी संस्थेचे अध्यक्ष अलायन्स मिस्टर एरियल ग्वार्को, परदेशातील विविध मान्यवर आणि आयसीए जागतिक सहकार परिषदेतील महिला आणि पुरुषांचे स्वागत केले. मोदी म्हणाले की, हे स्वागत केवळ त्यांच्या एकट्याकडून नव्हे तर हजारो शेतकरी, पशुपालक, मच्छीमार, 8 लाखांहून अधिक सहकारी संस्था, बचत गटांशी संबंधित 10 कोटी महिला आणि सहकारात तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात गुंतलेल्या युवा वर्गाकडून केले जात आहे.भारतीय समुदायाने वेगवेगळ्या देशांमध्ये आपला ठसा उमटवला आहे: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
November 24th, 11:30 am
मन की बात च्या 116 व्या भागात, पंतप्रधान मोदींनी NCC छात्रांचा विकास आणि आपत्ती निवारणाच्या कार्यातील त्यांची भूमिका यावर प्रकाश टाकत NCC दिनाचे महत्व विशद केले. विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी तरुणांचे सक्षमीकरण होण्याची गरज त्यांनी स्पष्ट करण्यासोबतच विकसित भारत यंग लीडर्स डायलॉगची चर्चा केली. ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करण्यास मदत करणाऱ्या तरुणांच्या प्रेरणादायी कथा आणि एक पेड माँ के नाम मोहिमेचे यशही त्यांनी शेअर केले.The Mahayuti government is striving for the empowerment of every section of the society: PM to BJP Karyakartas, Maharashtra
November 16th, 11:48 am
As part of the ‘Mera Booth Sabse Mazboot’ program, Prime Minister Narendra Modi has directly interacted with BJP karyakartas in Maharashtra via the NaMo App. He said, “The people of Maharashtra are highly impressed with the two-and-a-half years of the Mahayuti government's tenure. Everywhere I have been, I have witnessed this affection. The people of Maharashtra want this government to continue for the next five years.”PM Modi interacts with BJP Karyakartas from Maharashtra via NaMo App
November 16th, 11:30 am
As part of the ‘Mera Booth Sabse Mazboot’ program, Prime Minister Narendra Modi has directly interacted with BJP karyakartas in Maharashtra via the NaMo App. He said, “The people of Maharashtra are highly impressed with the two-and-a-half years of the Mahayuti government's tenure. Everywhere I have been, I have witnessed this affection. The people of Maharashtra want this government to continue for the next five years.”हिंदुस्तान टाईम्स लीडरशिप परिषद 2024 मध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
November 16th, 10:15 am
100 वर्षांपूर्वी पूज्य बापूंनी हिंदुस्तान टाईम्सचे उद्घाटन केले होते ... ते गुजराती भाषक होते आणि 100 वर्षांनतर दुसऱ्या गुजराती व्यक्तीला आपण बोलावले आहे. या ऐतिहासिक प्रवासासाठी हिंदुस्तान टाईम्स आणि 100 वर्षांच्या या प्रवासात जे-जे लोक सहभागी आहेत, ज्यांनी-ज्यांनी संघर्ष केला, संकटे झेलत टिकून राहिले .. ते सर्व अभिनंदनाला पात्र आहेत. 100 वर्षांचा प्रवास फार प्रदीर्घ असतो.यासाठी आपण सर्व अभिनंदनाला पात्र आहात, भविष्यासाठीही माझ्याकडून आपणा सर्वाना खूप-खूप शुभेच्छा. आता मी आलो तेव्हा या कुटुंबातल्या लोकांना भेटता तर आलेच त्याचबरोबर 100 वर्षांचा हा प्रवास दर्शवणारे एक उत्तम प्रदर्शनही पाहण्याची संधी मला मिळाली. आपल्याकडे थोडा वेळ असेल तर या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्या असे मी आपल्याला सुचवेन. हे केवळ एक प्रदर्शन नव्हे तर हा एक अनुभव आहे. 100 वर्षांचा इतिहासच आपण पाहतो आहोत असे वाटले. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हाचे आणि संविधान लागू झाले त्या दिवसाचे वृत्तपत्र मी पाहिले. एकाहून एक थोर, दिग्गजांचे लेख हिंदुस्तान टाईम्समध्ये असत.मार्टिन ल्युथर किंग,नेताजी सुभाष बाबू,डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी, अटल बिहारी वाजपेयी, डॉक्टर एम एस स्वामिनाथन. या सर्वांच्या लेखांनी आपल्या वर्तमानपत्राची कीर्ती वृद्धिंगत केली.खरोखरच एक प्रदीर्घ प्रवास करून आपण इथे पोहोचलो आहोत. स्वातंत्र्यासाठीच्या लढ्यापासून ते स्वातंत्र्यानंतरच्या आशा- आकांक्षांच्या हिंदोळ्यावरून आपण आगेकूच केली आहे. हा प्रवास अभूतपूर्व आणि अद्भुतही आहे. ऑक्टोबर 1947 मध्ये काश्मीर भारतात विलीन झाल्यानंतर प्रत्येक देशवासीयाचा त्यावेळचा उत्साह मला आपल्या वृत्तपत्राच्या बातमीतून जाणवला.त्याचवेळी ठाम निर्णयाअभावी 7 दशकांपर्यंत काश्मीर हिंसाचारात कसे होरपळत राहिले हेसुद्धा जाणवले. आज आपल्या वर्तमानपत्रात जम्मू-काश्मीर मध्ये झालेल्या विक्रमी मतदानाच्या बातम्या छापल्या जातात हा विरोधाभास आहे. एका आणखी दिवसाचे वर्तमानपत्र,प्रत्येकाचे तिथे लक्ष जाईल. त्यामध्ये एकीकडे आसामला अशांत क्षेत्र म्हणून जाहीर केल्याची बातमी होती तर दुसरीकडे अटल जी यांच्याकडून भाजपचा पाया घातल्याची बातमी होती.आज आसाममध्ये स्थायी शांतता स्थापन करण्यामध्ये भाजपा मोठी भूमिका बजावत आहे हा किती सुखद योगायोग आहे.कालच बोडो भागातल्या लोकांसमवेत एका शानदार कार्यक्रमाला मी उपस्थित होतो आणि दिल्लीमधल्या माध्यमांनी या मोठ्या घटनेकडे दुर्लक्ष केले याचे मला आश्चर्य वाटते.5 दशकांनंतर बॉम्ब, बंदूक आणि पिस्तुल यांचा त्याग करत, हिंसेचा मार्ग नाकारून दिल्लीच्या हृदयस्थानी बोडोचे युवक सांस्कृतिक उत्सव साजरा करत आहेत ही इतिहासातली मोठी घटना आहे याचा त्यांना अंदाज नाही. मी काळ तिथे होतो. मनापासून मला ते जाणवत होते. बोडो शांतता करारामुळे या लोकांच्या जीवनात परिवर्तन घडले आहे. प्रदर्शनादरम्यान मुंबईवरच्या 26/11 च्या हल्ल्यावरच्या वृत्तांकडे माझे लक्ष गेले.शेजारी देशाच्या दहशतवादी कारवायांमुळे आपली जनता स्वतःच्याच घरात आणि शहरात असुरक्षित होती असा तो काळ होता. मात्र आता परिस्थिती बदलली आहे, आता ते दहशतवादीच त्यांच्या घरात सुरक्षित नाहीत.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली इथे आयोजित हिंदुस्तान टाइम्स लीडरशिप समिट 2024 ला केले संबोधित
November 16th, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथे हिंदुस्थान टाइम्स नेतृत्व शिखर परिषद 2024 ला (Hindustan Times Leadership Summit 2024) संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 100 वर्षांपूर्वी महात्मा गांधी यांच्या हस्ते हिंदुस्थान टाईम्सच्या प्रवासाची सुरूवात झाली असल्याची घटना आपल्या संबोधनात नमूद केली आणि हिंदुस्थान टाईम्सच्या 100 वर्षांच्या ऐतिहासिक प्रवासाबद्दल आणि प्रारंभापासून या संस्थेशी संबंधित असलेल्या सर्व व्यक्तींचे अभिनंदनही केले. यावेळी पंतप्रधानांनी या सर्वांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. यावेळी पंतप्रधानांनी आयोजनस्थळी उभारलेल्या हिंदुस्थान टाईम्सच्या प्रदर्शनालाही भेट दिली. या प्रदर्शनाला भेट देणे हा समृद्ध करणारा अनुभव असल्याची भावना व्यक्त करत, सर्व प्रतिनिधींनी या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहनही त्यांनी केले. भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि राज्यघटना लागू झाली तेव्हाची जुनी वर्तमानपत्रं आपण पाहिली असल्याचा अनुभवही त्यांनी उपस्थितांसोबत सामाईक केला. मार्टिन ल्युथर किंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, अटलबिहारी वाजपेयी, डॉ. एम. एस. स्वामीनाथन अशा अनेक दिग्गजांनी हिंदुस्थान टाईम्ससाठी लेख लिहिले असल्याचाही त्यांनी उल्लेख केला. हिंदुस्थान टाईम्सचा प्रवास प्रचंड प्रदीर्घ आहे, हा प्रवास स्वातंत्र्यलढ्याचा साक्षीदार आहे, आणि त्याचवेळी स्वातंत्र्योत्तर काळात आशेच्या दिशेने वाटचाल करणारा हा प्रदीर्घ प्रवास अभूतपूर्व आणि आश्चर्यकारक आहे असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. 1947 सालच्या ऑक्टोबर महिन्यात आपणही इतर नागरिकांप्रमाणेच काश्मीर भारतात विलीन झाल्याची बातमी वाचली होती, आणि ही बातमी वाचून आपला इतरांप्रमाणे प्रचंड उत्साह वाटला होता हा अनुभवही पंतप्रधानांनी उपस्थितांसोबत सामाईक केला. मात्र अनिर्णयकी वृत्तीमुळे काश्मीर सात दशके हिंसाचाराच्या विळख्यात सापडले असल्याची जाणिवही आपल्याला त्या क्षणाने करून दिली होती असेही त्यांनी सांगितले. पण आजच्या स्थितीत जम्मू - काश्मीरमधील निवडणुकीत विक्रमी प्रमाणात मतदान झाल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध होत आहेत, आणि ही आनंदाची बाब आहे असे ते म्हणाले. एकदा एका वर्तमानपत्रात एका बाजूला आसामला अशांत क्षेत्र घोषित केल्याची बातमी छापलेली होती, तर दुसऱ्या बाजुला अटलजींनी भारतीय जनता पक्षाची पायाभरणी केल्याची बातमी छापलेली बातमी आपण पाहिल्याचा अनुभवही पंतप्रधानांनी यावेळी उपस्थितांसोबत सामायिक केला. याच अनुभवाचा संदर्भ देत आज भाजपा आसाममध्ये कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यात महत्वाची भूमिका बजावत आहे आणि हा मनाला शांती देणारा योगायोग आहे असे ते म्हणाले.To protect Jharkhand's identity, a BJP government is necessary: PM Modi in Gumla
November 10th, 04:21 pm
Kickstarting his rally of the day in Gumla, Jharkhand, PM Modi said, Under Atal Ji's leadership, the BJP government created the states of Jharkhand and Chhattisgarh and established a separate ministry for the tribal community. Since you gave me the opportunity to serve in 2014, many historic milestones have been achieved. Our government declared Birsa Munda's birth anniversary as Janjatiya Gaurav Diwas, and this year marks his 150th birth anniversary. Starting November 15, we will celebrate the next year as Janjatiya Gaurav Varsh nationwide.PM Modi captivates crowds with impactful speeches in Jharkhand’s Bokaro & Gumla
November 10th, 01:00 pm
Jharkhand’s campaign heats up as PM Modi’s back-to-back rallies boost enthusiasm across the state. Ahead of the first phase of Jharkhand’s assembly elections, PM Modi today addressed two mega rallies in Bokaro and Gumla. He said that there is only one echo among the people of the state that: ‘Roti, Beti, Maati ki pukar, Jharkhand mein BJP-NDA Sarkar,’ and people want BJP-led NDA to come to power in the assembly polls.”It is our commitment that the youth of the country should get maximum employment: PM Modi at Rozgar Mela
October 29th, 11:00 am
PM Modi addressed the Rozgar Mela and distributed more than 51,000 appointment letters to newly appointed youth in Government departments and organizations. Citing the Pradhan Mantri Internship Yojana, PM Modi said provisions are made for paid internships in the top 500 companies of India, where every intern would be given Rs 5,000 per month for one year. He added the Government’s target is to ensure one crore youth get internship opportunities in the next 5 years.PM Narendra Modi addresses Rozgar Mela
October 29th, 10:30 am
PM Modi addressed the Rozgar Mela and distributed more than 51,000 appointment letters to newly appointed youth in Government departments and organizations. Citing the Pradhan Mantri Internship Yojana, PM Modi said provisions are made for paid internships in the top 500 companies of India, where every intern would be given Rs 5,000 per month for one year. He added the Government’s target is to ensure one crore youth get internship opportunities in the next 5 years.'मन की बात'चे श्रोते हेच या कार्यक्रमाचे खरे आधारस्तंभ: पंतप्रधान मोदी
September 29th, 11:30 am
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा एकदा एकत्र येण्याची संधी मिळाली आहे. आजचा हा भाग मला भावूक करणारा आहे, अनेक जुन्या आठवणी माझ्याभोवती रुंजी घालत आहेत याचं कारण असं की आपल्या या ‘मन की बात’ च्या प्रवासाला आता 10 वर्षे पूर्ण होत आहेत.दहा वर्षांपूर्वी 3 ऑक्टोबर रोजी, विजयादशमीच्या दिवशी ‘मन की बात’ कार्यक्रमाची सुरुवात झाली होती. आणि पवित्र योगायोग असा की या वर्षी 3 ऑक्टोबर रोजी ‘मन की बात’ ला 10 वर्षे पूर्ण होतील तेव्हा नवरात्रीचा पहिला दिवस असेल. ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या वाटचालीत असे अनेक प्रसंग आले आहेत ज्यांना मी कधीच विसरू शकत नाही. ‘मन की बात’ कार्यक्रमाचे कोट्यवधी श्रोते, आपल्या या प्रवासातील असे सहकारी आहेत ज्यांचा सहयोग मला निरंतर लाभत राहिला आहे. देशाच्या काना-कोपऱ्यातून त्यांनी मला माहिती उपलब्ध करून दिली. ‘मन की बात’चे श्रोतेच या कार्यक्रमाचे खरे सूत्रधार आहेत. सहसा असं मानलं जातं की जोपर्यंत एखाद्या कार्यक्रमात चटपटीत बाबींची चर्चा नसेल किंवा काही नकारात्मक बाबी समाविष्ट नसतील तर अशा कार्यक्रमाकडे श्रोते फारसे लक्ष देत नाहीत. पण ‘मन की बात’ या कार्यक्रमाने हे सिध्द करून दाखवले आहे की देशातील लोकांना सकारात्मक माहितीची किती ओढ आहे. सकारात्मक विचार, प्रेरणात्मक उदाहरणे, धैर्य वाढवणाऱ्या कहाण्या लोकांना फारच आवडतात. ‘चकोर’ नावाच्या पक्षाबद्दल असं म्हटलं जातं की तो पक्षी फक्त आकाशातून पडणारे पावसाचे थेंबच पितो. ‘मन की बात’ या कार्यक्रमात आपण पाहिलं की लोक देखील तशाच प्रकारे, चकोर पक्ष्याप्रमाणेच देशाची कामगिरी इतरांच्या सामुहिक यशोगाथा अत्यंत अभिमानाने ऐकतात. ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या 10 वर्षांच्या वाटचालीने एक अशी श्रुंखला तयार केली आहे ज्याच्या प्रत्येक भागात नव्या कहाण्या, नव्या सफलतेच्या गाथा आणि नवी व्यक्तिमत्वे यांची ओळख होते.आपल्या समाजात सामुदायिकतेच्या भावनेने जे जे कार्य केलं जात आहे त्या कार्याचा ‘मन की बात’ मध्ये गौरव केला जातो. जेव्हा मी ‘मन की बात’ कार्यक्रमासाठी आलेली लोकांची पत्रे वाचतो तेव्हा माझं मन देखील अभिमानाने फुलून येतं. आपल्या देशात कितीतरी प्रतिभावंत आहेत आणि त्यांच्यामध्ये देश आणि समाजाची सेवा करण्याची उत्कट इच्छा आहे. असे लोक निःस्वार्थ भावनेनं सेवा करण्यात स्वतःचं संपूर्ण जीवन समर्पित करतात. अशा लोकांचं कार्य जाणून घेतल्यानंतर माझ्यात देखील उर्जेचा संचार होतो. ‘मन की बात’ ची ही संपूर्ण प्रक्रिया माझ्यासाठी एखाद्या मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेण्याप्रमाणे आहे. ‘मन की बात’ मधील प्रत्येक विषय, प्रत्येक घटना आणि प्रत्येक पत्राची मी आठवण काढतो तेव्हा असं वाटतं की माझ्यासाठी देवाचं रूप असलेली ही सर्वसामान्य जनता, तिचं जणूकाही दर्शन मी घेत आहे.मुंबईतील ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
August 30th, 12:00 pm
भारतीय रिझर्व्ह बँक गव्हर्नर श्री शक्तिकांत दास जी, नियामक मंडळ सदस्य ख्रिस गोपालकृष्णनजी, वित्त उद्योगातील नेते, फिनटेक आणि स्टार्ट-अप जगतातील माझे सहकारी, इतर सर्व मान्यवर, भगिनी आणि सज्जनहो!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात मुंबई येथे ग्लोबल फिनटेक फेस्ट (जीएफएफ) 2024 ला केले संबोधित
August 30th, 11:15 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रात मुंबई येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ग्लोबल फिनटेक फेस्ट (जीएफएफ) 2024 ला संबोधित केले. यावेळी आयोजित प्रदर्शनाला देखील पंतप्रधानांनी भेट दिली. पेमेंट्स कौन्सिल ऑफ इंडिया, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि फिनटेक कन्व्हर्जन्स कौन्सिल यांनी संयुक्तपणे ग्लोबल फिनटेक फेस्ट चे आयोजन केले आहे. फिनटेकमधील भारताची प्रगती प्रदर्शित करणे आणि या क्षेत्रातील प्रमुख हितधारकांना एकत्र आणणे हे याचे उद्दिष्ट आहे.PM Modi's conversation with Lakhpati Didis in Jalgaon, Maharashtra
August 26th, 01:46 pm
PM Modi had an enriching interaction with Lakhpati Didis in Jalgaon, Maharashtra. The women, who are associated with various self-help groups shared their life journeys and how the Lakhpati Didi initiative is transforming their lives.महाराष्ट्रातल्या जळगाव येथे लखपती दीदी संमेलनात पंतप्रधानांनी केलेले भाषण
August 25th, 01:00 pm
महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन जी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी आणि देशाचे कृषीमंत्री, ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान जी, इथले स्थानिक भूमीपुत्र आणि मंत्रिमंडळातील माझे सहकारी प्रतापराव जाधव, केंद्र सरकार मधील आमचे मंत्री चंद्रशेखर जी, इथल्या स्थानिक भूमिपुत्र भगिनी रक्षा खडसे जी, उपमुख्यमंत्री अजित पवार जी, देवेंद्र फडणवीस जी महाराष्ट्र सरकार मधले मंत्री, खासदार आणि आमदार तसेच एवढ्या मोठ्या संख्येने आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या आमच्या माता भगिनी. लांब लांब पर्यंत जिथपर्यंत माझी दृष्टी पोहोचत आहे असं वाटतंय की मातांचा महासागर इथे निर्माण झाला आहे. हे दृश्य माझ्या मनाला अतीव समाधान देत आहेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात जळगाव येथे लखपती दीदी संमेलनाला केले संबोधित
August 25th, 12:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात जळगाव येथे लखपती दीदी संमेलनात सहभागी झाले. विद्यमान सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात अलीकडेच लखपती बनलेल्या 11 लाख नवीन लखपती दीदींना त्यांनी प्रमाणपत्रे प्रदान केली तसेच त्यांचा सत्कारही केला. पंतप्रधानांनी देशभरातील लखपती दीदींशी संवादही साधला. मोदी यांनी 2,500 कोटी रुपयांचा फिरता निधी जारी केला, ज्याचा 4.3 लाख बचत गटांच्या सुमारे 48 लाख सदस्यांना फायदा होणार आहे. त्यांनी 5,000 कोटी रुपयांचे बँक कर्ज देखील वितरित केले ज्याचा 2.35 लाख बचत गटांच्या 25.8 लाख सदस्यांना फायदा होणार आहे. लखपती दीदी योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत एक कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्यात आले असून सरकारने तीन कोटी लखपती दीदी बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.अंतराळ क्षेत्रातील सुधारणांचा देशातील तरुणांना फायदा: मन की बात दरम्यान पंतप्रधान मोदी
August 25th, 11:30 am
मित्रांनो, देशातील युवावर्गाला अंतराळ क्षेत्रातील सुधारणांमुळे देखील खूप फायदा झाला आहे, त्यामुळे मी असा विचार केला की आज 'मन की बात' मध्ये अंतराळ क्षेत्राशी संबंधित माझ्या काही तरुण मित्रांशी का बोलू नये! माझ्यासोबत बोलण्यासाठी स्पेस टेक स्टार्ट अप- गॅलेक्स आय चा चमू सहभागी होत आहे. हा स्टार्ट-अप- नवं उद्योग, आयआयटी-मद्रासच्या माजी विद्यार्थ्यांनी सुरू केला होता. ही सर्व तरुण मंडळी- सुयश, डेनिल, रक्षित, किशन आणि प्रणित, आज दूरध्वनीवरून आपल्यासोबत आहेत. चला, या तरुणांचे अनुभव जाणून घेऊया.