
पंतप्रधानांनी सर शिवसागर रामगुलाम आणि सर अनिरुद्ध जगन्नाथ यांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून वाहिली श्रद्धांजली
March 11th, 03:04 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मॉरिशसच्या पॅम्पलमाऊसेस येथील सर शिवसागर रामगुलाम वनस्पती उद्यानामध्ये सर शिवसागर रामगुलाम आणि सर अनिरुद्ध जगन्नाथ यांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. या प्रसंगी, मॉरिशसचे पंतप्रधान महामहिम नवीनचंद्र रामगुलाम देखील उपस्थित होते.