"सामूहिक प्रयत्नांमुळे स्वच्छता आणि आर्थिक विवेकशीलतेला चालना देत शाश्वत परिणाम साध्य करता येऊ शकतात" - पंतप्रधान

November 10th, 01:07 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'विशेष अभियान 4.0' या सर्वात मोठ्या अभियानाची आज प्रशंसा केली. या उपक्रमाद्वारे, केवळ जुन्या टाकाऊ वस्तूंच्या विक्रीतून 2021 पासून देशाच्या तिजोरीमध्ये 2,364 कोटींचा महसूल जमा झाला आहे. मोदी यांनी नमूद केले की, सामूहिक प्रयत्नांमुळे शाश्वत परिणाम साध्य होऊ शकतात, यामुळे स्वच्छता आणि आर्थिक विवेकशीलतेलाही चालना मिळते.

गुजरात मधील गुंतवणूकदारांच्या शिखर परिषदेत पंतप्रधानांचे भाषण

August 13th, 11:01 am

केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री नितीन गडकरी जी, गुजरातचे मुख्यमंत्री श्री विजय रुपाणी जी, वाहन उद्योगाशी निगडित सर्व हितसंबंधधारक, वाहनांचे मूळ (अस्सल) सुटे भाग उत्पादकांच्या संघटनाचे प्रतिनिधी, धातू आणि भंगार उद्योगाशी निगडीत सर्व सदस्य, बंधू भगिनींनो!

गुजरातमधील गुंतवणूकदारांच्या शिखर परिषदेत पंतप्रधानांचे भाषण

August 13th, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये गुंतवणूकदार शिखर परिषदेला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले. स्वैच्छिक वाहन-गतिमान आधुनिकीकरण कार्यक्रम किंवा वाहन भंगारात काढण्याविषयीच्या धोरणाअंतर्गत वाहन भंगारात काढण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्याच्या दृष्टीने, गुंतवणुकीला आमंत्रित करण्यासाठी ही शिखर परिषद आयोजित केली आहे. या परिषदेत एकात्मिक स्क्रॅपिंग केंद्राच्या विकासासाठी अलंग येथील जहाज तोडण्याच्या उद्योगाने सादर केलेल्या प्रस्तावावर आणि समन्वयावर देखील विचारविनिमय केला जाईल. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आणि गुजरातचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते.

जुनी वाहने भंगारात काढण्यासाठी आज सुरु करण्यात आलेले धोरण हा भारताच्या विकासाच्या वाटचालीतला महत्वाचा टप्पा – पंतप्रधान

August 13th, 10:22 am

वाहने भंगारात काढण्यासाठी आज सुरु करण्यात आलेले धोरण म्हणजे भारताच्या विकासाच्या वाटचालीतला महत्वाचा टप्पा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

गुजरात मध्ये 13 ऑगस्ट रोजी असलेल्या गुंतवणूकदार परिषदेला पंतप्रधान करणार संबोधित

August 11th, 09:35 pm

गुजरात मध्ये 13 ऑगस्ट 2021 रोजी गुंतवणूकदार परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 11 वाजता दूरदृष्टीच्या प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत.