भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेनंतर जारी करण्यात आलेले संयुक्त निवेदन

July 09th, 09:54 pm

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियन महासंघाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याकडून 22व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी दिलेल्या निमंत्रणावरून 8-9 जुलै 2024 रोजी रशियन महासंघाला अधिकृत भेट दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एससीओ शिखर परिषदेतील संबोधन

July 04th, 01:29 pm

शांघाय सहकारी संघटना (एससीओ) शिखर परिषदेमध्ये प्रत्यक्ष उपस्थित असलेले परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी हे भाषण वाचून दाखवले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एससीओ शिखर परिषदेतील संबोधन

July 04th, 01:25 pm

2017 साली कझाकस्तानच्या अध्यक्षपदाच्या काळात मिळालेले एससीओ चे सदस्यत्व भारतासाठी गौरवास्पद आहे. तेव्हापासून आपण एससीओ मधील अध्यक्षपदाचे एक अखंड आवर्तन पूर्ण केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी कझाकस्तानचे राष्ट्राध्यक्ष कॅसिम-जोमार्ट तोकायेव यांनी दूरध्वनीवरून साधला संवाद

June 25th, 06:21 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कझाकस्तानचे राष्ट्राध्यक्ष कॅसिम-जोमार्ट तोकायेव यांच्यात आज दूरध्वनी संभाषण झाले.

23व्या एस सी ओ शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा इंग्रजी अनुवाद

July 04th, 12:30 pm

आज या तेविसाव्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत, तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. संपूर्ण आशिया खंडात गेल्या दोन दशकांमध्ये शांतता, समृद्धी आणि विकासासाठी एस सी ओ एक महत्वपूर्ण व्यासपीठ म्हणून उदयाला आले आहे. भारत आणि या प्रदेशातील हजारो वर्षांपासूनचे सांस्कृतिक बंध आणि लोकांचे लोकांशी असलेले संबंध हे आपल्या एकत्रित वारशाचे जिवंत उदाहरण आहे. आम्ही हे क्षेत्र एक विस्तारित शेजार म्हणून नव्हे तर एक विस्तारित कुटुंब म्हणून पाहतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा

December 16th, 03:51 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.

शांघाय सहकार्य संघटना परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुर्कीचे अध्यक्ष रिसेप तय्यीप एर्दोगेन यांच्याशी झाली बैठक

September 16th, 11:41 pm

शांघाय सहकार्य संघटना परिषदेच्या निमित्ताने उझबेकीस्तानात समरकंद इथे काल 16 सप्टेंबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तुर्कीचे अध्यक्ष रिसेप तय्यीप एर्दोगेन यांची भेट झाली.

शांघाय सहकार्य संघटना (एससीओ) शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधानांची इराणच्या राष्ट्रपतींसोबत भेट

September 16th, 11:06 pm

उझबेकिस्तानातील समरकंद इथे एससीओच्या राष्ट्रप्रमुखांच्या 22 व्या बैठकीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रायसी यांनी भेट घेतली. राष्ट्रपती रायसी यांनी 2021मधे पदभार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या बरोबरची ही पहिली भेट होती.

पंतप्रधानांनी उझबेकिस्तानमध्ये समरकंद येथे रशियन महासंघाच्या अध्यक्षांची घेतली भेट

September 16th, 08:42 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) 22 व्या बैठकीच्या निमित्ताने आज रशियन फेडरेशनचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची उझबेकिस्तानमध्ये समरकंद येथे भेट घेतली.

पंतप्रधान आणि उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष यांच्यात द्विपक्षीय बैठक

September 16th, 08:34 pm

शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ ) सदस्य देशांच्या प्रमुखांच्या 22 व्या बैठकीच्या निमित्ताने, उझबेकिस्तानच्या समरकंद येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उझबेकिस्तान प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष शवकत मिर्जिओयेव यांची भेट घेतली.

शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

September 16th, 01:30 pm

आज, जेव्हा संपूर्ण जग महामारीनंतर ,आर्थिकदृष्ट्या पूर्वपदावर येण्यासाठीच्या आव्हानांना तोंड देत असताना ,शांघाय सहकार्य संघटनेची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. ,शांघाय सहकार्य संघटनेतील सदस्य देश जागतिक सकल देशांतर्गत उत्पादनात सुमारे 30 टक्के योगदान देतात आणि जगातील 40 टक्के लोकसंख्या शांघाय सहकार्य संघटनेतील सदस्य देशांमध्ये राहते. भारत शांघाय सहकार्य संघटनेतील सदस्य देशांमधील अधिक सहकार्य आणि परस्पर विश्वासाचे समर्थन करतो. महामारी आणि युक्रेनमधील संकटामुळे जागतिक पुरवठा साखळीमध्ये अनेक अडथळे आले. त्यामुळे संपूर्ण जगाला अभूतपूर्व ऊर्जा आणि अन्न संकटाचा सामना करावा लागत आहे.शांघाय सहकार्य संघटनेने आमच्या प्रदेशात विश्वासार्ह, लवचिक आणि वैविध्यपूर्ण पुरवठा साखळी विकसित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी उत्तम संपर्क सुविधा आवश्यक आहेत , त्याचप्रमाणे आपण सर्वांनी एकमेकांना माल वाहतुकीसंदर्भातील पूर्ण अधिकार देणेही महत्त्वाचे आहे.

एससीओ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधानांचे समरकंद येथे आगमन

September 15th, 10:01 pm

उझबेकिस्तानचे राष्ट्रपती महामहीम शौकत मिर्झीयोयेव्ह यांनी दिलेल्या आमंत्रणावरून, एससीओ अर्थात शांघाय सहकार्य संघटनेतील सदस्य देशांच्या राष्ट्राध्यक्ष मंडळाच्या 22 व्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काल उझबेकिस्तानमधील समरकंद येथे आगमन झाले.

उझबेकिस्तानच्या दौऱ्यापूर्वी पंतप्रधानांचे निवेदन

September 15th, 02:15 pm

उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शवकत मिरझीयोयेव यांच्या निमंत्रणावरून मी, शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) सदस्य राष्ट्रांच्या प्रमुखांच्या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी समरकंदला भेट देणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी शांघाय सहकार्य संघटनेच्या राष्ट्र प्रमुखांच्या 21 व्या बैठकीत दूरदृश्य प्रणाली द्वारे झाले सहभागी

September 17th, 05:21 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी शांघाय सहकार्य संघटनेच्या राष्ट्र प्रमुखांच्या 21 व्या बैठकीत दूरदृश्य प्रणाली द्वारे आणि अफगाणीस्तानसंदर्भातल्या एससीओ- सीएसटीओ संयुक्त सत्रात व्हिडीओ संदेशाद्वारे सहभागी झाले.

अफगाणिस्तानवरील एससीओ-सीएसटीओ जनसंपर्क शिखर परिषदेमधील पंतप्रधानांचे भाषण

September 17th, 05:01 pm

अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर शांघाय सहकार्य संघटना आणि सामूहिक सुरक्षा करार संघटना यांच्यात विशेष बैठक आयोजित केल्याबद्दल मी अध्यक्ष रहमोन यांचे आभार मानतो.

शांघाय सहकार्य संघटनेच्या राष्ट्राध्यक्षांच्या परिषदेच्या 21 व्या शिखर संमेलनातले पंतप्रधानांचे संबोधन

September 17th, 12:22 pm

सर्वप्रथम मी राष्ट्रपती रहमोन यांना एससीओ परिषदेच्या यशस्वी अध्यक्षतेसाठी शुभेच्छा देतो. ताजिक प्रेसिडेंसीने आव्हानपूर्ण जागतिक आणि क्षेत्रीय वातावरणात या संघटनेचं कौशल्याने संचालन केलं आहे. ताजिकिस्तानच्या स्वातंत्र्याच्या 30 व्या वर्षानिमित्ताने, मी संपूर्ण भारतातर्फे सर्व ताजिक बंधू भगीनी आणि राष्ट्रपती रहमोन यांना खूप खूप शुभेच्छा देतो.

21st Meeting of SCO Council of Heads of State in Dushanbe, Tajikistan

September 15th, 01:00 pm

PM Narendra Modi will address the plenary session of the Summit via video-link on 17th September 2021. This is the first SCO Summit being held in a hybrid format and the fourth Summit that India will participate as a full-fledged member of SCO.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात दूरध्वनीवरून संवाद

August 24th, 08:39 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.

शांघाय सहकार्य संघटना (एससीओ) शिखर परिषद 2020 मध्ये पंतप्रधानांचे निवेदन

November 10th, 03:39 pm

सर्वात प्रथम, मी एससीओच्या कुशल नेतृत्वासाठी आणि कोविड-19 महामारीच्या उद्रेकाचे आव्हान असतानाही या बैठकीचे आयोजन केल्याबद्दल राष्ट्रपती पुतिन यांचे अभिनंदन करू इच्छितो. अशी अवघड परिस्थिती असतानाही आपण या एससीओच्या अंतर्गत सहकार्य आणि एकात्मतेचा एक व्यापक आणि प्रगतिशील कार्यक्रम पुढे नेत आहोत, याचा मला आनंद आहे.

शांघाय सहकार्य संघटना (एससीओ) मंडळातल्या देशांच्या सरकारप्रमुखांची 20 वी शिखर परिषद

November 10th, 03:30 pm

शांघाय सहकार्य संघटना (एससीओ) मंडळातल्या देशांच्या सरकारप्रमुखांच्या 20 व्या शिखर परिषदेचे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आज (10 नोव्हेंबर,2020) आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी रशियाचे राष्ट्रप्रमुख व्लादिमिर पुतिन होते. भारतीय प्रतिनिधी मंडळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेतृत्व केले. एससीओच्या इतर सदस्य देशांचे प्रतिनिधित्व त्यांच्या राष्ट्रपतींनी केले. भारत आणि पाकिस्तानचे नेतृत्व उभय देशांच्या पंतप्रधानांनी केले. या परिषदेला एससीओ सचिवालयाचे महासचिव, एससीओ क्षेत्रीय दहशतवादविरोधी संरचनेचे कार्यकारी संचालक, अफगाणिस्तान, बेलारूस, इराण, मंगोलिया या चार देशांचे निरीक्षक उपस्थित होते.