शांघाय सहकार्य संघटनेच्या 2022 शिखर परिषदेत पहिली एससीओ पर्यटन आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून वाराणसीचे झाले नामांकन

September 16th, 11:50 pm

उझबेकिस्तानात समरकंद इथे 16 सप्टेंबर 2022 रोजी शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) राष्ट्र प्रमुखांच्या 22 व्या बैठकीत वाराणसी शहराचे 2022-2023 या कालावधीकरीता पहिली-वहिली एससीओ पर्यटन आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून नामांकन करण्यात आले आहे. या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते.

शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

September 16th, 01:30 pm

आज, जेव्हा संपूर्ण जग महामारीनंतर ,आर्थिकदृष्ट्या पूर्वपदावर येण्यासाठीच्या आव्हानांना तोंड देत असताना ,शांघाय सहकार्य संघटनेची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. ,शांघाय सहकार्य संघटनेतील सदस्य देश जागतिक सकल देशांतर्गत उत्पादनात सुमारे 30 टक्के योगदान देतात आणि जगातील 40 टक्के लोकसंख्या शांघाय सहकार्य संघटनेतील सदस्य देशांमध्ये राहते. भारत शांघाय सहकार्य संघटनेतील सदस्य देशांमधील अधिक सहकार्य आणि परस्पर विश्वासाचे समर्थन करतो. महामारी आणि युक्रेनमधील संकटामुळे जागतिक पुरवठा साखळीमध्ये अनेक अडथळे आले. त्यामुळे संपूर्ण जगाला अभूतपूर्व ऊर्जा आणि अन्न संकटाचा सामना करावा लागत आहे.शांघाय सहकार्य संघटनेने आमच्या प्रदेशात विश्वासार्ह, लवचिक आणि वैविध्यपूर्ण पुरवठा साखळी विकसित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी उत्तम संपर्क सुविधा आवश्यक आहेत , त्याचप्रमाणे आपण सर्वांनी एकमेकांना माल वाहतुकीसंदर्भातील पूर्ण अधिकार देणेही महत्त्वाचे आहे.

पंतप्रधान आणि रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी परस्परांना दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा

January 07th, 06:11 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी 2019 या वर्षासाठी दूरध्वनीवरुन परस्परांना शुभेच्छा दिल्या. रशियात आज साजऱ्या होत असलेल्या नाताळनिमित्त, पंतप्रधानांनी पुतीन यांना आणि रशियाच्या जनतेलाही शुभेच्छा दिल्या.

भारत आणि रशिया यांच्यात अनौपचारिक संवाद

May 21st, 10:10 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्यात रशियामध्ये सोची येथे 21 मे 2018 रोजी पहिला अनौपचारिक संवाद झाला. या भेटीच्या निमित्ताने दोन्ही नेत्यांना परस्परांशी मैत्रीचे बंध दृढ करण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक मुद्यांबाबतच्या मतांची देवाण घेवाण करण्याची संधी प्राप्त झाली.

पंतप्रधान मोदी यांची रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याबरोबर भेट

May 21st, 04:40 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रशियाच्या सोची येथे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी चर्चा केली.