PM Modi meets with the President of Argentina
November 20th, 08:09 pm
PM Modi met Argentine President Javier Milei at the G20 Summit in Rio. They discussed governance, celebrated the growth of the India-Argentina Strategic Partnership, and highlighted expanding cooperation in trade, critical minerals, defence, energy, and technology. It marked their first bilateral meeting.Italy-India Joint Strategic Action Plan 2025-2029
November 19th, 09:25 am
Aware of the unparalleled potential of the India Italy Strategic partnership, Prime Minister of India Shri Narendra Modi and Prime Minister of Italy Ms. Giorgia Meloni during their meeting at the G20 Summit in Rio de JaneiroPM Modi meets with Prime Minister of Portugal
November 19th, 06:08 am
PM Modi and Portugal's Prime Minister Luís Montenegro met at the G20 Summit in Rio. They discussed strengthening bilateral ties in trade, defense, science, tourism, and culture. They emphasized cooperation in IT, digital tech, renewable energy, and startups. The leaders also reviewed regional and global issues, including India-EU relations, and agreed to celebrate the 50th anniversary of India-Portugal diplomatic relations in 2025. Both committed to staying in regular contact.फलनिष्पत्ती यादी : जर्मनीच्या चान्सेलर यांची 7 व्या आंतरसरकारी सल्लामसलतीसाठी भारत भेट
October 25th, 07:47 pm
Max-Planck-Gesellschaft ईव्ही (एमपीजी) आणि टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टीआयएफआर) राष्ट्रीय जैव विज्ञान केंद्र (एनसीबीएस) दरम्यान सामंजस्य करारकौटिल्य अर्थशास्त्र परिषद 2024 च्या तिसऱ्या वर्षीच्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 04th, 07:45 pm
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, आर्थिक विकास संस्थेचे अध्यक्ष एन.के. सिंग, या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देशभरातून तसेच परदेशातून आलेले इतर मान्यवर, आणि उपस्थित सभ्य स्त्री-पुरुषहो,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे तिसऱ्या कौटिल्य आर्थिक परिषदेला केले संबोधित
October 04th, 07:44 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे आयोजित तिसऱ्या कौटिल्य आर्थिक परिषदेच्या कार्यक्रमाला संबोधित केले. केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या भागीदारीसह आर्थिक विकास संस्थेने आयोजित केलेल्या या कौटिल्य आर्थिक परिषदेत, इतर अनेक मुद्द्यांसह, हरित स्थित्यंतराला वित्तपुरवठा, भूआर्थिक विखंडन आणि वृद्धीसाठीचे परिणाम यांसारख्या संकल्पनांवर आणि लवचिकता कायम राखण्यासाठी धोरणात्मक कृतीची तत्वे, यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.तीन परम महासंगणक आणि उच्च-कार्यक्षमता युक्त संगणकीय प्रणाली यांचे लोकार्पण करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
September 26th, 05:15 pm
आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जगात भारतासाठी एका फार मोठ्या कामगिरीचा दिवस आहे. एकविसाव्या शतकातील भारत कशा पद्धतीने विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच संशोधनाला प्राधान्य देत आगेकूच करत आहे याचे प्रतिबिंब आजच्या दिवसात दिसते आहे. आजचा भारत, संभाव्यतेच्या अमर्याद आकाशात नवनव्या संधी घडवतो आहे. आपल्या वैज्ञानिकांनी आणि अभियंत्यांनी तीन ‘परम रुद्र महासंगणक’ तयार केले आहेत. हे तीन महासंगणक देशात दिल्ली, पुणे आणि कोलकाता या शहरांमध्ये बसवण्यात आले आहेत. आजच्या दिवशीच देशासाठी अर्का आणि अरुणिक या दोन उच्च-कार्यक्षमतायुक्त संगणकीय प्रणालींचे देखील उद्घाटन करण्यात आले आहे. या प्रसंगी मी देशातील वैज्ञानिक समुदाय, अभियंते आणि सर्व देशवासियांचे खूप खूप अभिनंदन करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे तीन परम रुद्र महासंगणकांचे केले लोकार्पण
September 26th, 05:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे सुमारे 130 कोटी रुपयांच्या तीन परम रुद्र महासंगणकांचे लोकार्पण केले. राष्ट्रीय महासंगणक अभियान अंतर्गत स्वदेशी पद्धतीने विकसित केलेले हे महासंगणक पुणे, दिल्ली आणि कोलकाता येथे वैज्ञानिक संशोधनासाठी तैनात करण्यात आले आहेत. हवामान आणि हवामान संशोधनासाठी तयार केलेल्या उच्च कार्यक्षमतेच्या कॉम्प्यूटिंग प्रणालीचे उद्घाटनही पंतप्रधानांनी केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनुसंधान राष्ट्रीय संशोधन संस्थेच्या नियामक मंडळाच्या पहिल्या बैठकीचे भूषवले अध्यक्षस्थान
September 10th, 04:43 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी अनुसंधान राष्ट्रीय संशोधन संस्थेच्या नियामक मंडळाची पहिली बैठक 7, लोककल्याण मार्ग या त्यांच्या निवासस्थानी झाली. भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राविषयी तसेच संशोधन आणि विकास कार्यक्रमांची पुनर्रचना करण्यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रियात व्हिएन्ना इथे भारतीय समुदायाला केलेले संबोधन
July 10th, 11:00 pm
सुरवात करू मी ? ऑस्ट्रियाचे सन्माननीय अर्थव्यवस्था विभाग आणि श्रम मंत्री, भारतीय समुदायाचा माझा सर्व मित्रवर्ग,शुभचिंतक आपणा सर्वाना नमस्कार.पंतप्रधानांनी ऑस्ट्रिया येथील भारतीय समुदायाला संबोधित केले
July 10th, 10:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ व्हिएन्ना येथे भारतीय समुदायाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधित केले.व्हिएन्ना येथे आगमन झाल्यानंतर तेथील समुदायाने विशेष स्नेहाने आणि आपुलकीने पंतप्रधानांचे स्वागत केले.ऑस्ट्रियाचे श्रम आणि अर्थव्यवस्था विभागाचे मंत्री मार्टिन कोचर देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. संपूर्ण ऑस्ट्रियातील विविध ठिकाणचे भारतीय या कार्यक्रमात सहभागी झाले होते.2030 पर्यंतच्या कालावधीसाठी रशिया-भारत आर्थिक सहकार्याच्या धोरणात्मक क्षेत्रांच्या विकासाबाबत दोन्ही नेत्यांचे संयुक्त निवेदन
July 09th, 09:49 pm
रशिया आणि भारत यांच्यात मॉस्को येथे 8-9 जुलै 2024 रोजी पार पडलेल्या 22 व्या वार्षिक द्विपक्षीय शिखर परिषदेनंतर, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्विपक्षीय व्यावहारिक सहकार्याच्या विद्यमान मुद्द्यांवर आणि रशिया-भारत विशेष आणि विशेषाधिकार धोरणात्मक भागीदारीच्या विकासाबाबत विचारांचे आदानप्रदान केले.VDNKh येथील रोसाटॉम पॅव्हेलियनला पंतप्रधानांनी दिली भेट
July 09th, 04:18 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासमवेत आज मॉस्को येथील ऑल रशियन प्रदर्शन केंद्र, VDNKhला भेट दिली.राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या शुभेच्छा.
February 28th, 08:36 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी वैज्ञानिक स्वभाव, नवोन्मेष आणि तंत्रज्ञान या विषयावर त्यांचे विचार मांडणारी एक चित्रफीत देखील सामायिक केली आहे.गायत्री परिवार अश्वमेध यज्ञ कार्यक्रमात पंतप्रधानांनी दिलेला व्हिडिओ संदेश
February 25th, 09:10 am
गायत्री परिवाराचे कोणतेही आयोजन इतके पवित्र असते की त्यामध्ये सहभागी व्हायला मिळणे ही देखील खरोखरच खूप मोठी भाग्याची गोष्ट असते. आज देव संस्कृती विद्यापीठाद्वारे आयोजित अश्वमेध यज्ञाचा एक भाग बनायला मिळत असल्याबद्दल मला अतिशय आनंद होत आहे. जेव्हा मला गायत्री परिवाराकडून या अश्वमेध यज्ञात सहभागी होण्यासाठी निमंत्रण मिळाले होते, तेव्हा, वेळेच्या अभावाबरोबरच माझ्यासमोर एक दुविधा देखील होती. व्हिडिओच्या माध्यमातून देखील या कार्यक्रमात सहभागी होण्यात एक समस्या ही होती की सामान्य माणूस अश्वमेध यज्ञाचा संबंध सत्तेच्या विस्ताराशी जोडून पाहतो. सध्या निवडणुकीच्या दिवसात तर हे स्वाभाविकच आहे की अश्वमेध यज्ञाचे इतर काही अर्थ देखील काढले गेले असते. पण नंतर मग मी पाहिले की हा अश्वमेध यज्ञ, आचार्य श्रीराम शर्मा यांच्या भावनांचा पुरस्कार करत आहे. अश्वमेध यज्ञाचा नवा अर्थ प्रस्थापित करत आहे, तशा माझ्या सर्व दुविधा दूर झाल्या.गायत्री परिवाराने आयोजित केलेल्या अश्वमेध यज्ञाला पंतप्रधानांनी व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून केले संबोधित
February 25th, 08:40 am
गायत्री परिवाराने आयोजित केलेल्या अश्वमेध यज्ञाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले. पंतप्रधानांनी ‘अश्वमेध यज्ञा’शी जोडले जाण्याबाबत आपल्या संबोधनाची सुरुवात करताना द्विधा मनस्थितीचा उल्लेख केला कारण आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्याचा चुकीचा अर्थ लावला जाऊ शकतो असे ते म्हणाले. मात्र जेव्हा आपण आचार्य श्री राम शर्मा यांच्या भावना जपण्यासाठी अश्वमेध यज्ञ पाहिला आणि त्यातला अभिप्रेत अर्थ जाणून घेतला, तेव्हा आपल्या शंका दूर झाल्या.असे त्यांनी सांगितले.बोइंग इंडिया अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान केंद्राचे उद्घाटन आणि बोईंग सुकन्या कार्यक्रमाच्या शुभारंभाच्या वेळी पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 19th, 03:15 pm
बेंगळुरूमध्ये परदेशातील सर्व आदरणीय पाहुण्यांचे हार्दिक स्वागत. बेंगळुरू हे आकांक्षांना नवकल्पना आणि यशाची जोड देते आणि भारताच्या तांत्रिक क्षमतेला जागतिक मागणीशी संलग्न करते. ही ओळख अधिक मजबूत करण्यासाठी बेंगळुरूमध्ये बोईंगच्या नवीन जागतिक तंत्रज्ञान संकुलाचे उद्घाटन करण्यात आले. विशेष म्हणजे, हे संकुल अमेरिकेबाहेर बोईंग कंपनीची सर्वात मोठी सुविधा आहे, जे केवळ भारतालाच नव्हे तर जागतिक विमान वाहतूक बाजारालाही नवीन ऊर्जा देईल. पण मित्रांनो, या सुविधेचे महत्त्व इतकेच मर्यादित नाही. या सुविधेचे महत्त्व जागतिक तांत्रिक प्रगती, संशोधन, नवोन्मेष, संरचना आणि मागणी यांच्या पूर्ततेत भारताच्या वचनबद्धतेशी निगडित आहे. ते 'मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड' या आमच्या संकल्पाला बळ देते. शिवाय, या संकुलाची उभारणी ही भारताच्या प्रतिभेवर जगाचा विश्वास अधोरेखित करते. आजचा सोहोळा हा एक दिवस भारत या सुविधेत 'भविष्यातील विमान' डिझाइन करेल या विश्वासाचा आहे. म्हणून, मी संपूर्ण बोईंग व्यवस्थापन आणि सर्व हितधारकांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो; आणि तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा.पंतप्रधानांच्या हस्ते कर्नाटकातील बंगळुरू येथे नवीन अत्याधुनिक बोईंग इंडिया अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान केंद्र संकुलाचे उद्घाटन
January 19th, 02:52 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटकातील बंगळुरू येथे नवीन अत्याधुनिक बोईंग इंडिया अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान केंद्र संकुलाचे उद्घाटन केले. 1,600 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह बांधण्यात आलेले हे 43 एकर क्षेत्राचे संकुल बोइंगची अमेरिकेबाहेरची अशी सर्वात मोठी गुंतवणूक आहे. पंतप्रधानांनी बोईंग सुकन्या कार्यक्रमाचा देखील प्रारंभ केला ज्याचा उद्देश देशातील वाढत्या विमान वाहतूक क्षेत्रात भारतातील जास्तीत जास्त मुलींच्या प्रवेशाला पाठबळ देणे हा आहे.तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे पायाभरणी आणि विकास कामांचे उद्घाटन करतानाचे पंतप्रधानांचे भाषण
January 02nd, 12:30 pm
तामीळनाडूचे राज्यपाल श्री. आर. एन. रवीजी, मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिनजी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, ज्योतिरादित्य सिंधिया जी आणि या मातीतील माझे सहकारी, एल. मुरुगन जी, तामीळनाडू सरकारमधील मंत्री, खासदार आणि आमदार, आणि तामीळनाडूतील माझ्या कुटुंबियांनो!पंतप्रधानांच्या हस्ते तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे 20,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी
January 02nd, 12:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे 20,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी केली. विकास प्रकल्पांमध्ये तामिळनाडूमधील रेल्वे, रस्ते, तेल आणि वायू आणि जहाजबांधणी क्षेत्रांचा समावेश आहे.