
हरयाणातील यमुनानगर येथे विकास प्रकल्पांच्या उद्घाटन/शिलान्यासप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण
April 14th, 12:00 pm
हरयाणाचे लोकप्रिय मुख्यमंत्री नायब सिंग सैनी जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी मनोहर लाल जी, राव इंद्रजीत सिंग जी, कृष्णपाल जी, हरयाणा सरकारचे मंत्रीमंडळ, खासदार आणि आमदारगण आणि माझ्या प्रिय भाऊ आणि बहिणींनो, हरयाणातील माझ्या भावंडांना मोदींचा राम-राम!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हरियाणात यमुना नगर येथे विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी
April 14th, 11:54 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरियाणात यमुनानगर येथे विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले तसेच त्यांच्या हस्ते या प्रकल्पांचा कोनशीला समारंभ झाला. हरियाणाच्या जनतेला शुभेच्छा देऊन त्यांनी हरियाणाच्या पवित्र भूमीला आदरांजली वाहिली आणि ही भूमी माता सरस्वतीचे उत्पत्तिस्थान, मंत्रादेवीचे निवासस्थान, पंचमुखी हनुमानाची आणि पवित्र कपालमोचन साहिब यांची भूमी असल्याचा आवर्जून उल्लेख केला. “हरियाणा म्हणजे संस्कृती, भक्ती आणि समर्पण यांचा संगम आहे,” ते म्हणाले.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची दूरदृष्टी आणि प्रेरणा भारताच्या विकासात्मक वाटचालीला मार्गदर्शक ठरत आहे हे अधोरेखित करत पंतप्रधानांनी सर्व नागरिकांना बाबासाहेबांच्या 135 व्या जयंतीदिनाच्या शुभेच्छा देखील दिल्या.
अनुसूचित जाति/अनुसूचित जमातीच्या खासदारांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधानांची घेतली भेट
August 09th, 01:58 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अनुसूचित जाती/ अनुसूचित जमातीच्या खासदारांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती समुदायांच्या कल्याणासाठी आणि सक्षमीकरणाप्रति सरकारच्या वचनबद्धतेचा आणि संकल्पाचा पुनरुच्चार केला.