पंतप्रधानांनी सिकर, राजस्थान येथे विविध प्रकल्पांच्या उद्घाटन/पायाभरणी प्रसंगी केलेले भाषण
July 27th, 12:00 pm
राजस्थानचे राज्यपाल श्रीमान कलराज मिश्र जी, केंद्रीय मंत्री श्री नरेंद्र सिंहजी तोमर, अन्य सर्व मंत्री, संसदेतील माझे सहकारी, आमदार आणि अन्य सर्व मान्यवर, तसेच आज या कार्यक्रमात देशातील लाखो ठिकाणांहून कोट्यवधी शेतकरी आपल्या सोबत जोडले गेले आहेत. मी राजस्थानच्या भूमीतून देशातील त्या कोट्यवधी शेतकऱ्यांनाही नमन करतो. राजस्थानातील माझे प्रिय बंधू-भगीनीही आज या महत्वपूर्ण कार्यक्रमाची शोभा वाढवत आहेत.राजस्थानमध्ये सिकर येथे पंतप्रधानांकडून विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण
July 27th, 11:15 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानमध्ये सिकर येथे विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले. आज लोकार्पण झालेल्या प्रकल्पांमध्ये 1.25 लाखांपेक्षा जास्त पीएम किसान समृद्धी केंद्रे(पीएमकेएसके), सल्फरचा थर दिलेल्या युरिया गोल्ड या युरियाच्या नव्या खत उत्पादनाचे उद्घाटन, 1600 कृषी उत्पादन संघटनांच्या ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ओएनडीसी) वर ऑनबोर्डिंग, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी(पीएम-किसान) अंतर्गत 8.5 कोटी लाभार्थ्यांना 17,000 कोटी रुपयांच्या 14व्या हप्त्याचे वितरण, चितोडगड, धोलपूर, सिरोही, सिकर आणि श्री गंगानगर येथे 5 नव्या वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन, बरन, बुंदी, करौली, झुनझुनु, सवाई माधोपूर. जैसलमेर आणि टांक या 7 ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयांची पायाभरणी, उदयपूर, बंसवारा, परतापगढ आणि डुंगरपूर या जिल्ह्यांमध्ये 6 एकलव्य आदर्श निवासी शाळांचे उद्घाटन आणि तिवरी, जोधपूर येथे केंद्रीय विद्यालयाचे उद्धाटन यांचा समावेश होता.17 व्या भारतीय सहकार काँग्रेसच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले संबोधन
July 01st, 11:05 am
मंत्रिमंडळातले माझे सहकारी अमित शाह, राष्ट्रीय सहकारी संघटनेचे अध्यक्ष दिलीप संघांनी, डॉक्टर चंद्रपाल सिंह यादव, देशाच्या कानाकोपऱ्यातून जोडले गेलेले सहकारी संस्थांचे सर्व सदस्य, आपल्या शेतकरी बंधू-भगिनी, इतर मान्यवर आणि बंधू-भगिनींनो, सतराव्या भारतीय सहकार महासंमेलनाच्या आपणा सर्वाना खूप-खूप शुभेच्छा. या संमेलनात मी आपणा सर्वांचे स्वागत करतो, आपले अभिनंदन करतो.नवी दिल्लीत 17 व्या भारतीय सहकारी परिषदेत (काँग्रेस) पंतप्रधानांनी केले मार्गदर्शन
July 01st, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त नवी दिल्ली येथे प्रगती मैदानवर 17 व्या भारतीय सहकारी परिषदेत मार्गदर्शन केले. 'अमृत काळ- चैतन्यमय भारतासाठी सहकार्याद्वारे समृद्धी' ही या परिषदेची मुख्य संकल्पना आहे. सहकारी विपणनासाठी ई-कॉमर्स संकेतस्थळाच्या वेबसाइटचे ई-पोर्टल तसेच सहकारी विस्तार आणि सल्लागार सेवा पोर्टलचे यावेळी अनावरण करण्यात आले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे ईशा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ‘माती वाचवा’ कार्यक्रमामध्ये केलेले भाषण
June 05th, 02:47 pm
आपल्या सर्वांना, संपूर्ण विश्वाला विश्व पर्यावरण दिनाच्या खूप खूप शुभेच्छा! सद्गुरू आणि ईशा प्रतिष्ठान आज अभिनंदनास पात्र आहे. मार्चमध्ये त्यांच्या संस्थेने ‘माती वाचवा’ मोहीम सुरू केली होती. 27 देशांचा प्रवास करून त्यांची ही यात्रा आज 75 व्या दिवशी इथे पोहोचली आहे. आज ज्यावेळी देश आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे, या अमृतकाळामध्ये नवीन संकल्प घेत आहे, त्यावेळी अशा प्रकारे लोकांनी सुरू केलेल्या मोहिमेला खूप महत्व आहे.PM Addresses 'Save Soil' Programme Organised by Isha Foundation
June 05th, 11:00 am
PM Modi addressed 'Save Soil' programme organised by Isha Foundation. He said that to save the soil, we have focused on five main aspects. First- How to make the soil chemical free. Second- How to save the organisms that live in the soil. Third- How to maintain soil moisture. Fourth- How to remove the damage that is happening to the soil due to less groundwater. Fifth, how to stop the continuous erosion of soil due to the reduction of forests.पंतप्रधान 5 जूनला होणाऱ्या माती वाचवा चळवळीवरील कार्यक्रमास उपस्थित रहाणार
June 04th, 09:37 am
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी विज्ञान भवन येथे येत्या 5 जून रोजी सकाळी 11 वा. होणाऱ्या माती वाचवा चळवळीवरील (सेव्ह सॉईल) कार्यक्रमास उपस्थित रहाणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित जनसमुदायास पंतप्रधान संबोधितही करणार आहेत.