DMK founded on 'Divide, Divide and Divide' and seeks to destroy 'Sanatan': PM Modi in Vellore
April 10th, 02:50 pm
Ahead of the Lok Sabha elections, Prime Minister Narendra Modi was accorded a warm welcome by the vibrant people of Vellore as he addressed a public meeting in Tamil Nadu. He said, I bow down to the history, mythology, and bravery of Vellore. He added, Vellore created a pivotal revolution against the British, and presently, its robust support for the N.D.A. showcases the spirit of 'Fir ek Baar Modi Sarkar'.Massive crowd support in Vellore & Mettupalayam as PM Modi addresses two public meetings in Tamil Nadu
April 10th, 10:30 am
Ahead of the Lok Sabha elections, Prime Minister Narendra Modi was accorded a warm welcome by the massive crowd support in Vellore and Mettupalayam as he addressed two public meetings in Tamil Nadu. He said, I bow down to the history, mythology, and bravery of Vellore. He added, Vellore created a pivotal revolution against the British, and presently, its robust support for the N.D.A. showcases the spirit of 'Fir ek Baar Modi Sarkar'.नवी दिल्लीत पोंगल उत्सवादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
January 14th, 12:00 pm
पोंगलच्या पवित्र दिनी, तामिळनाडूच्या प्रत्येक घरात पोंगलच्या धारेचा प्रवाह असतो. माझी अशी इच्छा आहे, की आपल्या आयुष्यात देखील सुख समृद्धी आणि समाधानाच्या धारेचा हा प्रवाह असाच निरंतर वाहत राहो. कालच देशभरात लोहडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. काही ठिकाणी आज मकर संक्रांती उत्तरायण साजरे केले जात आहे, तर काही ठिकाणी, ते कदाचित उद्या साजरे केले जाईल. माघ बिहू देखील, आता येणारच आहे. मी या सर्व सण-उत्सवांसाठी सर्व देशबांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो, माझ्या शुभकामना त्यांच्या सोबत आहेत.पंतप्रधानांनी नवी दिल्लीत पोंगल उत्सवात घेतला सहभाग
January 14th, 11:30 am
पंतप्रधानांनी पोंगल निमित्त शुभेच्छा दिल्या आणि या प्रसंगी संबोधित करताना ते म्हणाले की तामिळनाडूमध्ये प्रत्येक घरात या उत्सवाचा उत्साह दिसून येत आहे. सर्व नागरिकांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि समाधानाचा प्रवाह सतत वाहत राहो, अशा शुभेच्छा मोदी यांनी दिल्या. काल साजरा झालेला लोहरी उत्सव, आज साजरा होत असलेले मकर उत्तरायण, उद्या साजरी होणारी मकर संक्रांती आणि लवकरच होणारी माघ बिहूची सुरुवात याचाही त्यांनी उल्लेख केला. सध्या देशभर सुरू असलेल्या उत्सवाच्या कालावधीसाठी मोदी यांनी सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या.'मन की बात'च्या बाबतीत लोकांनी जे प्रेम दाखवले ते अभूतपूर्व: पंतप्रधान मोदी
May 28th, 11:30 am
‘मन की बात’ कार्यक्रमात पुन्हा एकदा, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. ‘मन की बात’चा हा भाग म्हणजे या कार्यक्रमाच्या द्विशतकाचा प्रारंभ आहे. गेल्या महिन्यात आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा शतक महोत्सव साजरा केला आहे. तुम्हा सर्वांचा सहभाग, हेच या कार्यक्रमाचे सर्वात मोठे सामर्थ्य आहे. शंभराव्या भागाच्या प्रसारणाच्या वेळेला, एक प्रकारे संपूर्ण देश एका धाग्यात बांधला गेला होता. आपले स्वच्छता कर्मचारी बंधू-भगिनी असोत किंवा विविध क्षेत्रातील नामवंत, ‘मन की बात’ने सर्वांना एकत्र आणण्याचे काम केले आहे. तुम्ही सर्वांनीच या कार्यक्रमाप्रती जी आत्मीयता आणि जिव्हाळा व्यक्त केला आहे, तो केवळ अभूतपूर्व आहे, भावुक करणारा आहे. जेव्हा ‘मन की बात’चे प्रसारण सुरु होते तेव्हा जगाच्या विविध भागांमध्ये असणाऱ्या देशांमध्ये, विविध टाईम झोन मध्ये, काही ठिकाणी संध्याकाळ होत होती, तर काही ठिकाणी रात्र उलटून गेली होती, असे असूनही, तिथल्या लोकांनी 100 वा भाग ऐकण्यासाठी वेळ काढला. आपल्यापासून हजारो मैल दूर असलेल्या न्यूझीलंड देशातला एक व्हिडीओ मी पाहिला, तिथल्या शंभर वर्ष वयाच्या एक मातोश्री आपल्याला आशीर्वाद देत होत्या. 'मन की बात’ कार्यक्रमाबद्दल देश विदेशातील लोकांनी त्यांची मते मांडली आहेत.अनेक जणांनी या कार्यक्रमाचे संरचनात्मक विश्लेषण देखील केले आहे. ‘मन की बात' या कार्यक्रमात केवळ देश आणि देशवासीयांचे कर्तुत्व यांचीच चर्चा होते, याचे लोकांनी कौतुक केले आहे. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना या पाठींब्यासाठी आदरसहित धन्यवाद देतो.काशी येथे गंगा-पुष्करालु उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
April 29th, 07:46 pm
नमस्कार! तुम्हा सर्वांना गंगा-पुष्करालु उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही सर्व काशीमध्ये आला आहात, म्हणून वैयक्तिक स्वरुपात तुम्ही माझे देखील अतिथी आहात आणि ज्या प्रकारे आपल्याकडे सांगितले जाते की अतिथी हा देवासमान असतो. मी जबाबदाऱ्यांमुळे भलेही तुमच्या स्वागतासाठी तिथे उपस्थित राहू शकलो नसलो तरीमनाने मी तुमच्यामध्येच असल्याची जाणीव मला होत आहे. मी या आयोजनाबद्दल काशी-तेलगु समिती आणि संसदेतील माझे सहकारी जी व्ही ए एल नरसिंह राव यांना शुभेच्छा देत आहे. काशीच्या या घाटावर हा गंगा-पुष्करालु उत्सव म्हणजे गंगा आणि गोदावरीचा जणू संगमच आहे. भारताच्या प्राचीन सभ्यता, संस्कृती आणि परंपरांच्या संगमाचा हा उत्सव आहे. तुम्हाला आठवत असेल काही महिन्यांपूर्वीच येथे काशीच्या भूमीवर काशी-तामिळ संगमम् या कार्यक्रमाचे देखील आयोजन झाले होते. तसेच अगदी काही दिवसांपूर्वी मला सौराष्ट्र-तामिळ संगमम कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी मी म्हणालो होतो की स्वातंत्र्याचा हा अमृतकाळ देशाच्या विविधतांचा, विविध प्रवाहांचा संगमकाळ आहे, जो भारताला अनंत भविष्यापर्यंत ऊर्जावान ठेवेल.उत्तर प्रदेशात काशी येथे गंगा पुष्करालु उत्सवामध्ये पंतप्रधानांनी केले मार्गदर्शन
April 29th, 07:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील काशी येथे आयोजित गंगा पुष्करालु उत्सवामध्ये व्हिडिओ संदेशाद्वारे मार्गदर्शन केले. गंगा पुष्करालु उत्सवाच्या निमित्ताने शुभेच्छा देत पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली आणि प्रत्येकाचे मनःपूर्वक स्वागत केले. या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व जण त्यांचे स्वतःचे अतिथी आहेत आणि भारतीय संस्कृतीमध्ये अतिथींना देवाप्रमाणे मानले जाते, असे त्यांनी सांगितले. “मी या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नसलो तरीही मनाने मी तुमच्यासोबतच आहेl”, पंतप्रधान म्हणाले. या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी काशी-तेलगु समिती आणि खासदार जीव्हीएल नरसिंह राव यांचे अभिनंदन केले. काशीच्या घाटांवर आयोजित केलेला गंगा-पुष्करालु उत्सव जणू काही गंगा आणि गोदावरीचा संगमच आहे असे अधोरेखित करत पंतप्रधान म्हणाले की भारताच्या प्राचीन सभ्यता, संस्कृती आणि परंपरांच्या संगमाचा हा उत्सव आहे. यावेळी त्यांनी काही महिन्यांपूर्वी या ठिकाणी आयोजित झालेल्या काशी-तामिळ संगममची आठवण करून दिली आणि काही दिवसांपूर्वी सौराष्ट्र-तामिळ संगमममध्ये सहभाग घेतला होता त्याचा देखील उल्लेख केला, ज्यामध्ये त्यांनी स्वातंत्र्याचा अमृतकाळ म्हणजे भारताच्या विविधता आणि संस्कृती यांचा संगम असल्याचे सांगितले होते.सौराष्ट्र - तमिळ संगमम् कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
April 26th, 02:30 pm
सौराष्ट्र तमिळ् संगमम्, निगळ्-चियिल्, पंगेर्-क वन्दिरुक्कुम्, तमिळग सोन्दन्गळ् अनैवरैयुम्, वरुग वरुग एन वरवेरकिरेन्। उन्गळ् अनैवरैयुम्, गुजरात मण्णिल्, इंड्रु, संदित्तदिल् पेरु मगिळ्ची।पंतप्रधानांनी सौराष्ट्र तमिळ संगममच्या समारोप समारंभाला केले संबोधित
April 26th, 10:30 am
पाहुण्यांचे स्वागत करणे हा एक विशेष अनुभव आहे परंतु दशकांनंतर घरी परतण्याचा अनुभव आणि आनंद अतुलनीय आहे. सौराष्ट्रातील लोकांनी तमिळनाडूतील मित्रांसाठी लाल गालिचा अंथरला आहे, ते ही त्याच उत्साहाने राज्याला भेट देत आहेत याकडे मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधानांनी लक्ष वेधले.पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 एप्रिलला सौराष्ट्र तामिळ संगममच्या सांगता समारंभाला करणार संबोधित
April 25th, 08:00 pm
“एक भारत, श्रेष्ठ भारत” या तत्वाला प्रोत्साहन देण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टीनुसार हा उपक्रम राबवला जात आहे. देशाच्या विविध भागांतील लोकांमध्ये असलेले प्राचीन अनुबंध शोधून काढण्याचा प्रयत्न या उपक्रमांच्या माध्यमातून होत आहे. याच दृष्टिकोनातून यापूर्वी काशी तमिळ संगमचे आयोजन करण्यात आले होते. सौराष्ट्र तमिळ संगमम, गुजरात आणि तामिळनाडूमधील समान संस्कृती आणि वारसा साजरा केला जात आहे.पंतप्रधानांनी सौराष्ट्र तमिळ संगममची ध्वनीचित्रफीत केली सामायिक
April 18th, 10:35 am
पंतप्रधानांनी, सौराष्ट्र तमिळ संगममधील सांस्कृतिक कार्यक्रमांची ध्वनीचित्रफीत सामायिक केली आहे.सौराष्ट्र तमिळ संगमममधील सहभागींना पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
April 17th, 10:23 am
सौराष्ट्र तमिळ संगमममधील सहभागींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.सौराष्ट्र तमिळ संगमने अतिशय सकारात्मक वातावरण निर्माण केले आहे : पंतप्रधान
April 15th, 10:09 am
सौराष्ट्र तमिळ संगमसाठी मदुराईहून पहिली तुकडी घेऊन जाण्यासाठी मदुराईहून विशेष रेल्वे गाडी रवाना केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे.सौराष्ट्र संगम गुजरात आणि तामिळनाडू दरम्यान शतकांपासून असलेले जुने बंध दृढ करत आहे: पंतप्रधान
March 26th, 10:49 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, तामिळनाडू आणि सौराष्ट्र संगम (एसटी संगम) गुजरात आणि तामिळनाडू दरम्यानचे शतकांपासूनचे बंध अधिक मजबूत करत आहे.