भारत आणि सौदी अरेबिया यांच्यात गुंतवणूकविषयक उच्च स्तरीय कृती दलाच्या पहिल्या बैठकीचे आयोजन
July 28th, 11:37 pm
भारत-सौदी अरेबियाच्या गुंतवणूकविषयक उच्चस्तरीय कृती दलाची पहिली बैठक, पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ.पी.के. मिश्रा आणि सौदी अरेबियाचे ऊर्जा मंत्री प्रिन्स अब्दुल अजीझ बिन सलमान बिन अब्दुल अजीझ अल सौद यांच्या सहअध्यक्षतेखाली आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झाली.संविधान आणि लोकशाही व्यवस्थेवर पुनश्च आपला अढळ विश्वास दाखवल्याबद्दल देशवासीयांचे आभार: पंतप्रधान मोदी मन की बात मध्ये
June 30th, 11:00 am
मित्रांनो, फेब्रुवारीपासून आतापर्यंत जेव्हा महिन्याचा शेवटचा रविवार यायचा, तेव्हा मला तुमच्या सोबतच्या या संवादाची उणीव जाणवायची. पण या कालावधीमध्ये देखील तुम्ही मला लाखो पत्र पाठवलीत हे पाहून मला खूप छान वाटले. 'मन की बात' हा रेडिओ कार्यक्रम जरी काही महिने प्रसारित झाला नसला तरीदेखील, 'मन की बात' ची भावना ही इतकी सखोल आहे की देशात, समाजात, दररोज होणाऱ्या कामांमध्ये, निस्वार्थ भावनेने केलेली कामे, समाजावर सकारात्मक परिणाम घडवणाऱ्या कामांमध्ये ती निरंतर दिसून आली. निवडणुकीच्या बातम्यांदरम्यान, अशा हृदयस्पर्शी बातम्यांनी नक्कीच तुमचे लक्ष वेधून घेतले असले.जम्मू आणि काश्मीरमध्ये श्रीनगर येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
June 21st, 06:31 am
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मला योग आणि साधनेची भूमी असलेल्या काश्मीरला भेट देण्याचे सौभाग्य लाभले आहे. काश्मीर आणि श्रीनगरमधले हे वातावरण, ही ऊर्जा आणि अनुभूती, योगसाधनेतून जी शक्ती आपल्याला मिळते, ती श्रीनगरमध्ये जाणवते आहे. योग दिनानिमित्त मी आज काश्मीरच्या या भूमीवरून देशातील सर्व लोकांना आणि जगाच्या कानाकोपऱ्यातील योगसाधना करणाऱ्या सर्वांना योग दिनानिमित्त शुभेच्छा देतो.आंतरराष्ट्रीय योग दिन -2024 निमित्त, जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर येथे पंतप्रधानांनी उपस्थितांना केले संबोधित
June 21st, 06:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर इथे 10 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या समारंभाचे नेतृत्व केले आणि योग सत्रात सहभाग घेतला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचे युवराज आणि पंतप्रधान यांच्याशी दूरध्वनीवरून केली चर्चा
December 26th, 08:06 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचे युवराज आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुलअजीज अल सौद यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.140 कोटी जनता अनेक बदल घडवून आणत आहे: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
November 26th, 11:30 am
‘मन की बात’ मध्ये आपले स्वागत आहे. आज 26 नोव्हेंबर. हा दिवस आपण कधीही विसरू शकत नाही. याच दिवशी आपल्या देशावर सर्वात भीषण दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी मुंबई आणि संपूर्ण देशच हादरवून टाकला होता. पण हेच भारताचे सामर्थ्य आहे की त्या हल्ल्यातून आपण सावरलो आणि आता अत्यंत धैर्याने दहशतवादाचा पाडाव करत आहोत. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात ज्यांनी आपले प्राण गमावले त्या सर्वाना मी श्रद्धांजली अर्पण करतो. या हल्ल्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या आपल्या शूरवीरांचे आज देश स्मरण करत आहे.जी 20 विद्यापीठ कनेक्ट फिनालेमध्ये पंतप्रधानांनी केले भाषण
September 26th, 04:12 pm
दोन आठवड्यांपूर्वी याच भारत मंडपमध्ये जोरदार घडामोडी घडत होत्या. हे भारत मंडपम एकदम ‘हॅपनिंग’ ठिकाण होते आणि मला आनंद आहे की आज माझा भावी भारत त्याच भारत मंडपमध्ये उपस्थित आहे. जी-20 च्या आयोजनाला भारताने ज्या उंचीवर नेले आहे ते पाहून जग आश्चर्यचकित झाले आहे.पण तुम्हाला माहीत आहे की , मी अजिबात थक्क नाही ,मला अजिबात आश्चर्य वाटले नाही.कदाचित तुमच्या मनात असेल की इतके मोठे आयोजन झाले तुम्ही खुश नाही , काय कारण आहे ? माहीत आहे का ? कारण कार्यक्रम यशस्वी करण्याची जबाबदारी तुमच्यासारखे तरुण विद्यार्थी घेतात , तरुणाईचा यात सहभाग असेल तर तो यशस्वी होणार हे निश्चित असते. .जी 20 युनिव्हर्सिटी कनेक्ट फिनालेला पंतप्रधानांनी केले संबोधित
September 26th, 04:11 pm
नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे जी 20 विद्यापीठ कनेक्ट फिनाले कार्यक्रमाला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. जी 20 युनिव्हर्सिटी कनेक्ट हा उपक्रम देशातल्या तरुणांना भारताच्या जी 20 अध्यक्षपदाबाबत माहिती देण्यासाठी आणि जी 20 च्या विविध कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग वाढवण्याच्या उद्देशाने हाती घेण्यात आला. पंतप्रधानांनी या प्रसंगी 4 प्रकाशनांचे : The Grand Success of G20 Bharat Presidency: Visionary Leadership, Inclusive Approach (भारताच्या जी 20 अध्यक्षतेचे भव्य यश: दूरदर्शी नेतृत्व, सर्वसमावेशक दृष्टिकोन;), India's G20 Presidency: Vasudhaiva Kutumbakam (भारताचे जी 20 अध्यक्षपद: वसुधैव कुटुंबकम; ) , Compendium of G20 University Connect Programme (जी 20 युनिव्हर्सिटी कनेक्ट कार्यक्रमाचे संकलन); आणि Showcasing Indian Culture at G20 (जी 20 मध्ये भारतीय संस्कृतीचे प्रदर्शन) यांचे अनावरण केले.भारत-सौदी अरेबिया राजनैतिक भागीदारी परिषदेच्या पहिल्या बैठकीत पंतप्रधानांचे प्रारंभिक निवेदन
September 11th, 03:51 pm
आज भारत-सौदी अरेबिया यांच्यातील राजनैतिक भागीदारी परिषदेच्या पहिल्या नेतृत्व बैठकीत सहभागी होत असतांना मला अतिशय आनंद होत आहे. 2019 च्या माझ्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यादरम्यान आम्ही या परिषदेची घोषणा केली होती.वैश्विक पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक (PGII) आणि भारत-मध्य-पूर्व-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर (IMEC) साठी भागीदारी
September 09th, 09:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी 9 सप्टेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे जी 20 शिखर परिषदेच्या निमित्ताने वैश्विक पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक (पीजीआयआय) आणि भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉर (आयएमईसी) साठी भागीदारी या विषयावरील विशेष कार्यक्रमाचे सहअध्यक्षपद भूषविले.पंतप्रधानांचे जागतिक पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीसाठी भागीदारी (PGII) आणि भारत-मध्य-पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉरसाठी भागीदारी कार्यक्रमात निवेदन
September 09th, 09:27 pm
या विशेष सोहळ्यात तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. माझे मित्र बायडन यांच्यासह या कार्यक्रमाचे सहअध्यक्षपद भूषवताना मला अत्यंत आनंद होत आहे. आज आपण सर्वानी एक महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक करार संपन्न होताना पाहिले आहे. आगामी काळात हा करार भारत, पश्चिम आशिया आणि युरोप यांच्यात आर्थिक समानव्य साधण्याचे एक प्रभावी माध्यम बनेल. हा करार संपूर्ण विश्वात संपर्क आणि विकासाला एक शाश्वत दिशा प्रदान करेल.ब्रिक्स विस्तारावर पंतप्रधानांचे निवेदन
August 24th, 01:32 pm
सर्वप्रथम, मी राष्ट्रपती, माझे मित्र रामाफोसा जी यांना या ब्रिक्स शिखर परिषदेच्या यशस्वी आयोजनाबद्दल शुभेच्छा देतो. त्यांचे अभिनंदन करतो.अंमली पदार्थांच्या सेवनाविरुद्धच्या मोहिमेतील तरुणांचा वाढता सहभाग अतिशय उत्साहवर्धक: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
July 30th, 11:30 am
माझ्या प्रिय देशवासियांनो, ‘मन की बात’मध्ये तुम्हां सर्वांचे खूप खूप स्वागत.जुलै महिना म्हणचे मान्सूनचा महिना, पावसाचा महिना. नैसर्गिक आपत्तींमुळे गेले काही दिवस चिंता आणि त्रासाने भरलेले होते.यमुनेसहअनेक नद्यांना आलेल्या पुरामुळे बऱ्याच भागांमधल्या लोकांना त्रास झाला. डोंगराळ भागात भूस्खलन होण्याच्या घटना देखील घडल्या. याच दरम्यान, काही काळापूर्वी देशाच्या पश्चिम भागात, पूर्व गुजरातच्या काही क्षेत्रामध्ये बिपरजॉय चक्रीवादळ देखील आले. पण मित्रांनो, या संकटांच्या काळात पुन्हा एकदा आपण सर्व देशवासीयांनी दाखवून दिले की, सामुहिक प्रयत्नांमध्ये किती शक्ती असते. स्थानिक लोकांनी, आपल्या एनडीआरएफच्या जवानांनी, स्थानिक प्रशासनात कार्यरत लोकांनी रात्रंदिवस झगडून अशा संकटांचा सामना केला आहे. कोणत्याही संकटातून बाहेत पडण्यासाठी आपले सामर्थ्य आणि साधनसंपत्ती यांची भूमिका फार मोठी असते – मात्र त्याबरोबरच आपली संवेदनशीलता आणि एकमेकांचा हात धरुन ठेवण्याची भावना देखील तितकीच महत्त्वाची असते. ‘सर्वजन हिताय’ ची हीच भावना भारताची ओळख देखील आहे आणि भारताची शक्ती देखील आहे.पंतप्रधानांनी मुस्लिम वर्ल्ड लीगच्या सरचिटणीसांशी केली चर्चा
July 12th, 05:31 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम वर्ल्ड लीगचे सरचिटणीस महामहिम शेख डॉ मोहम्मद बिन अब्दुलकरीम अल-इसा यांच्याशी आंतर-धर्मीय संवादाला चालना, उग्रवादी विचारसरणींचा प्रतिकार , जागतिक शांततेला प्रोत्साहन आणि भारत- सौदी अरेबिया दरम्यान भागीदारी अधिक दृढ करण्याबाबत चर्चा केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचे युवराज आणि पंतप्रधान यांच्याशी दूरध्वनीव्दारे साधला संवाद
June 08th, 10:07 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सौदी अरेबियाचे युवराज आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुलअजीज अल सौद यांच्याशी दूरध्वनीवरून संभाषण केले.गांधीनगर, गुजरात येथे झालेल्या अखिल भारतीय शिक्षण संघाच्या अधिवेशनातील पंतप्रधानांचे भाषण
May 12th, 10:31 am
गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री भूपेन्द्र भाई पटेल, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि जे आयुष्यभर स्वतःचा परिचय, शिक्षक असा करुन देत आहेत, असे परुषोत्तम रुपाला जी, गेल्या निवडणुकीत, भारताच्या संसदेत, देशात, संपूर्ण देशात सर्वाधिक मते मिळवून विजयी झालेले श्रीमान सी आर पाटील जी, गुजरात सरकारचे मंत्री, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे सर्व सदस्य, देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले सन्माननीय शिक्षक, बंधू आणि भगिनींनो!गुजरातमधील गांधीनगरमध्ये झालेल्या अखिल भारतीय शिक्षक संघ अधिवेशनात पंतप्रधान सहभागी
May 12th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अखिल भारतीय शिक्षक संघ अधिवेशनात सहभागी झाले. अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाची ही 29 वी द्विवार्षिक परिषद आहे. यावेळी आयोजित प्रदर्शनाचीही पंतप्रधानांनी पाहणी केली. ‘शिक्षणातील परिवर्तनाच्या केंद्रस्थानी 'शिक्षक ' अशी या परिषदेची संकल्पना आहे.सौदी अरेबियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री राजपुत्र फैझल बिन फरहान अल सौद यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
September 20th, 09:44 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सौदी अरेबियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री राजपुत्र फैझल बिन फरहान अल सौद यांची भेट घेतली. उभय देशांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या धोरणात्मक भागीदारी परिषदेअंतर्गत हाती घेण्यात आलेल्या उपक्रमांसह , सध्या सुरु असलेल्या विविध द्विपक्षीय उपक्रमांचा आढावा यावेळी घेण्यात आला.शांघाय सहकार्य संघटनेच्या राष्ट्राध्यक्षांच्या परिषदेच्या 21 व्या शिखर संमेलनातले पंतप्रधानांचे संबोधन
September 17th, 12:22 pm
सर्वप्रथम मी राष्ट्रपती रहमोन यांना एससीओ परिषदेच्या यशस्वी अध्यक्षतेसाठी शुभेच्छा देतो. ताजिक प्रेसिडेंसीने आव्हानपूर्ण जागतिक आणि क्षेत्रीय वातावरणात या संघटनेचं कौशल्याने संचालन केलं आहे. ताजिकिस्तानच्या स्वातंत्र्याच्या 30 व्या वर्षानिमित्ताने, मी संपूर्ण भारतातर्फे सर्व ताजिक बंधू भगीनी आणि राष्ट्रपती रहमोन यांना खूप खूप शुभेच्छा देतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुलाझिज अल सौद यांच्यात दूरध्वनीवरून संवाद
March 10th, 07:01 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुलाझिज अल सौद यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.