पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिल्हा न्यायपालिकेच्या राष्ट्रीय परिषदेत केलेले भाषण
August 31st, 10:30 am
तुम्ही लोक खूप गंभीर आहात, त्यामुळे मला असे वाटते की हा सोहळाही खूप गंभीर आहे. काही दिवसांपूर्वी मी राजस्थान उच्च न्यायालयाच्या प्लॅटिनम ज्युबिली समारंभाला गेलो होतो. आणि, आज सर्वोच्च न्यायालयाच्या 75 वर्षांच्या वाटचालीच्या निमित्ताने जिल्हा न्यायपालिकेची राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाची 75 वर्षे, हा केवळ एका संस्थेचा प्रवास नाही. हा आहे भारताच्या संविधानाचा आणि संविधानिक मूल्यांचा प्रवास! हा प्रवास आहे- एक लोकशाही म्हणून भारताचा अधिक परिपक्व होण्याचा प्रवास! आणि या प्रवासात आपल्या संविधान निर्मात्यांचे आणि न्यायव्यवस्थेतील अनेक जाणकारांचे योगदान मोलाचे आहे. यात पिढ्यानपिढ्या कोट्यवधी देशबांधवांचे योगदान आहे, ज्यांनी प्रत्येक परिस्थितीत न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवला आहे. भारतातील जनतेने सर्वोच्च न्यायालयावर, आपल्या न्यायव्यवस्थेवर कधीच अविश्वास दाखवला नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाची ही 75 वर्षे लोकशाहीची माता म्हणून भारताचा बहुमान आणखी वाढवत आहेत. हे आपल्या सांस्कृतिक घोषणेला बळ देते – ज्यामध्ये म्हटले आहे सत्यमेव जयते, नानृतम्. यावेळी देश आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करून संविधानाचा 75 वा वर्धापन दिन साजरा करणार आहे. त्यामुळे या प्रसंगी अभिमानही आहे, सन्मान आहे आणि प्रेरणा आहे. या निमित्त मी तुम्हा सर्व विधिज्ञांचे आणि सर्व देशवासियांचे अभिनंदन करतो. यानिमित्ताने राष्ट्रीय जिल्हा न्यायिक परिषदेच्या महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे जिल्हा न्यायपालिकांच्या राष्ट्रीय परिषदेचे केले उदघाटन
August 31st, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे जिल्हा न्यायपालिकेच्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधानांनी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेच्या अमृत महोत्सवी 75 वर्षांच्या कार्यकाळाच्या निमित्ताने एका टपाल तिकिटाचे आणि नाण्याचे प्रकाशन देखील केले. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने आयोजित केलेल्या या दोन दिवसीय परिषदेत जिल्हा न्यायव्यवस्थेशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा आणि विचारमंथन करण्यासाठी पाच कामकाजांची सत्रे आयोजित केली आहेत; ज्यात पायाभूत सुविधा आणि मानव संसाधने, सर्वांसाठी सर्वसमावेशक न्यायालये, न्यायिक सुरक्षा आणि न्यायिक कल्याण, खटल्यांचे व्यवस्थापन आणि न्यायिक प्रशिक्षण,या विषयांचा समावेश आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रील प्रभूपाद जी यांच्या 150 व्या जयंतीदिनानिमत्त आयोजित कार्यक्रमामध्ये केलेले भाषण
February 08th, 01:00 pm
हरे कृष्ण! हरे कृष्ण! हरे कृष्ण! आज तुम्ही सर्वजण इथे आला आहात, त्यामुळे भारत मंडपम् ची भव्यता आणखी वाढली आहे. या भवनाची उभारणी करताना, त्याच्या मूळाशी असलेला विचार भगवान बसवेश्वर यांच्या अनुभव मंडपम् बरोबर या भारत मंडपम् ची सांगड घातली आहे. अनुभव मंडपम् प्राचीन भारतामध्ये आध्यात्मिक चर्चा-परिसंवाद यांचे केंद्र होते. अनुभव मंडपम् लोक कल्याणाची भावना आणि संकल्प यांचे ऊर्जा केंद्र होते. आज श्रील भक्तिसिद्धान्त सरस्वती गोस्वामी प्रभुपाद जी यांच्या 150 व्या जयंती निमित्त आयोजित या कार्यक्रमामध्येही अशीच ऊर्जा, असेच चैतन्य दिसून येत आहे. आमचा विचारही असाच होता की, हे भवन, भारताचे आधुनिक सामर्थ्य आणि प्राचीन मूल्ये अशा दोन्ही गोष्टींचे केंद्र बनले पाहिजे.अलिकडेच, काही महिन्यांपूर्वी जी -20 शिखर परिषदेच्या माध्यमातून इथूनच नवीन भारताच्या सामर्थ्याचे दर्शन अवघ्या जगाला झाले होते. आणि आज इथेच, ‘वर्ल्ड वैष्णव कन्व्हेंशन’चे आयोजन करण्याची संधी मोठ्या सद्भाग्याने मिळत आहे. आणि इतकेच नाही तर, भारताची जी प्रतिमा आहे... जिथे विकासही आहे आणि वारसाही आहे, अशा दोन्ही गोष्टींचा संगम घडून आला आहे. जिथे आधुनिकतेचे स्वागतही आहे आणि आपल्या ओळखीविषयी अभिमानही आहे.पंतप्रधानांनी श्रील प्रभुपादजी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला केले संबोधित
February 08th, 12:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत प्रगती मैदान येथील भारत मंडपम येथे श्रील प्रभुपादजी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधानांनी यावेळी आचार्य श्रील प्रभुपाद यांच्या पुतळ्याला पुष्पांजली वाहिली आणि त्यांच्या सन्मानार्थ एक स्मरणार्थ टपाल तिकीट तसेच नाणे जारी केले. गौडीया मिशनचे संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांनी वैष्णव पंथाच्या मुलभूत तत्वांचे जतन करण्यात तसेच त्यांचा प्रसार करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली.