मध्य प्रदेशात चित्रकूट येथे दिवंगत अरविंदभाई मफतलाल जन्मशताब्दी समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण

October 27th, 02:46 pm

अर्थात्, चित्रकूटमध्ये प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मणजींच्या सोबत नित्य निवास करत असतात. येथे येण्यापूर्वी आता मला श्री रघुवीर मंदिर आणि श्रीराम जानकी मंदिरात दर्शन घेण्याचे भाग्य देखील लाभले आणि मी हेलीकॉप्टरमधूनच कामदगिरि पर्वताला देखील नमस्कार केला. मी पूज्य रणछोड़दास जी आणि अरविंदभाई यांच्या समाधीवर पुष्पांजली अर्पित करण्यासाठी गेलो होतो. प्रभू श्रीराम जानकीचे दर्शन, संतांचे मार्गदर्शन आणि संस्कृत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून वेदमंत्रांचे हे अद्भुत गायन, या अनुभवाचे, या अनुभूतीचे तोंडाने वर्णन करणे कठीण आहे. मानव सेवेच्या महान यज्ञाचा भाग बनवण्याचे आणि त्यासाठी श्री सद्गुरु सेवासंघाचे देखील आज मी सर्व पीड़ित, शोषित, गरीब, आदिवासींच्या वतीने आभार व्यक्त करतो. जानकीकुंड चिकित्सालयाच्या ज्या नव्या विंगचे आज लोकार्पण झाले आहे, यामुळे लाखों रुग्णांना नवीन जीवन मिळेल. आगामी काळात, सद्गुरु मेडिसिटी मध्ये गरीबांच्या सेवेच्या या अनुष्ठानाला नवा विस्तार मिळेल. आज या प्रसंगी अरविंद भाई यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भारत सरकार ने विशेष टपाल तिकिट देखील प्रकाशित केले आहे. हा क्षण आपल्या सर्वांसाठी गौरवास्पद क्षण आहे, समाधानाचा क्षण आहे, मी तुम्हा सर्वांना याबद्दल शुभेच्छा देतो.

मध्य प्रदेशातील चित्रकूट येथे दिवंगत अरविंद भाई मफतलाल यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित समारंभाला पंतप्रधानांनी केले संबोधित

October 27th, 02:45 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातील चित्रकूट येथे दिवंगत अरविंद भाई मफतलाल यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. श्री सद्गुरु सेवा संघ ट्रस्टची स्थापना 1968 मध्ये परमपूज्य रणछोडदासजी महाराज यांनी केली होती. अरविंद भाई मफतलाल हे परमपूज्य रणछोडदासजी महाराज यांच्या कार्याने प्रेरित होते आणि त्यांनी या ट्रस्टच्या स्थापनेत मोलाची भूमिका बजावली होती. अरविंद भाई मफतलाल हे स्वातंत्र्योत्तर भारतातील अग्रगण्य उद्योजकांपैकी एक होते, ज्यांनी देशाच्या विकासाच्या गाथेत महत्त्वाची भूमिका बजावली.

PM condoles the passing away of Satguru Sri Sivananda Murty

June 10th, 03:00 pm