सशक्त नारी- विकसित भारत कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर

March 11th, 10:30 am

केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, श्री. गिरीराज सिंह जी, श्री. अर्जुन मुंडा जी, श्री. मनसुख मांडविया जी, आणि देशाच्या विविध भागातून आलेल्या, मोठ्या संख्येने इथे आलेल्या आणि तुमच्यासोबतच व्हिडिओच्या माध्यमातूनही देशभरातील लाखोंच्या संख्येने दिदी आज आपल्या सोबत सहभागी झाल्या आहेत. मी तुम्हा सर्वांचे स्वागत आणि अभिनंदन करतो. आणि या सभागृहात मला दिसतंय की कदाचित हा तर छोटा भारतच आहे. भारतातील प्रत्येक भाषेतील आणि कानाकोपऱ्यातील लोक इथे दिसत आहेत. तर, तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन.

सशक्त नारी - विकसित भारत कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी

March 11th, 10:10 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सशक्त नारी - विकसित भारत कार्यक्रमात सहभाग घेतला आणि ते नवी दिल्लीतील पुसा येथील भारतीय कृषी संशोधन संस्था येथे नमो ड्रोन दिदीद्वारे केलेल्या कृषी ड्रोन प्रात्यक्षिकांचे साक्षीदार झाले.देशभरातील 10 वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेल्या नमो ड्रोन दीदींनीही एकाच वेळी ड्रोन प्रात्यक्षिकात भाग घेतला.कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी 1000 नमो ड्रोन दीदींना ड्रोनही सुपूर्द केले.पंतप्रधानांनी प्रत्येक जिल्ह्यात बँकांनी स्थापन केलेल्या बँक जोडणी शिबिराद्वारे बचत गटांना अनुदानित व्याजदरावर सुमारे 8,000 कोटी रुपयांचे बँक कर्ज वितरित केले.पंतप्रधानांनी सुमारे 2,000 कोटी रुपयांचा भांडवली सहाय्य निधी बचतगटांना वितरित केला. पंतप्रधानांनी लाभार्थ्यांशी संवादही साधला.

पंतप्रधान 11 मार्च रोजी नवी दिल्लीत सशक्त नारी-विकसित भारत कार्यक्रमात सहभागी होणार

March 10th, 11:14 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 मार्च रोजी सकाळी 10 वाजता नवी दिल्लीत पुसा इथे भारतीय कृषी संशोधन संस्थेत सशक्त नारी - विकसित भारत कार्यक्रमात सहभागी होतील आणि नमो ड्रोन दिदी सादर करणार असलेल्या कृषी ड्रोन प्रात्यक्षिकांना उपस्थित राहतील. देशभरातल्या विविध 11 ठिकाणांहून देखील नमो ड्रोन दिदी एकाचवेळी या ड्रोन प्रात्यक्षिकांमध्ये सहभागी होतील. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान 1,000 नमो ड्रोन दिदींना ड्रोनसुद्धा हस्तांतरित करणार आहेत.