पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत प्रमुख सचिवांची चौथी राष्ट्रीय परिषद संपन्न

December 15th, 10:15 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत मुख्य सचिवांच्या चौथ्या राष्ट्रीय परिषदेला संबोधित केले. ही तीन दिवसीय परिषद 13 ते 15 डिसेंबर 2024 या कालावधीत नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती.

सरदार पटेल यांच्या जयंतीदिनी पंतप्रधानांनी त्यांचे स्मरण केले

October 31st, 08:07 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार पटेल यांच्या जयंतीदिनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की अदम्य उर्जा, द्रष्टे नेतृत्व आणि असामान्य समर्पणभाव या मूल्यांसह सरदार पटेल यांनी आपल्या देशाचे भाग्य घडवले.

पंतप्रधान 30 - 31 ऑक्टोबर रोजी गुजरातला भेट देणार

October 29th, 02:20 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 - 31 ऑक्टोबर रोजी गुजरातला भेट देणार आहेत. 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वाजता ते अंबाजी मंदिरात पूजा करुन दर्शन घेतील. त्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास ते मेहसाणा येथील खेरालू येथे विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी करतील. 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता ते केवडियाला भेट देतील. इथे ते एकतेचा पुतळा (स्टॅच्यू ऑफ युनिटी) या वास्तुला पुष्पांजली अर्पण करतील, त्यानंतर राष्ट्रीय एकता दिवस कार्यक्रम साजरा होईल. त्यानंतर ते केवडियातच, अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. त्यानंतर, सकाळी सुमारे 11:15 वाजता, ते आरंभ 5.0 च्या समारोप प्रसंगी 98 व्या कॉमन फाउंडेशन कोर्स या अभ्यासक्रमाच्या अधिकारी प्रशिक्षणार्थींना संबोधित करतील.