संत मीराबाई यांच्या 525 व्या जयंतीनिमित्त मथुरा इथे आयोजित कार्यक्रमातील पंतप्रधानांचे संबोधन

November 23rd, 07:00 pm

राजस्थानच्या निवडणूक प्रचारामुळे मला यायला उशीर झाल्याबद्दल सर्वप्रथम मी आपणा सर्वांची क्षमा मागतो.प्रचार मैदानातून आता या भक्तिमय वातावरणात आलो आहे.आज ब्रज दर्शनाची संधी,ब्रजवासीयांच्या दर्शनाची संधी मला लाभली हे माझे भाग्य आहे. कारण इथे अशी व्यक्ती येते ज्यांना श्रीकृष्ण आणि श्रीजी बोलावतात.ही भूमी असाधारण आहे.ब्रज आपल्या ‘श्यामा- श्याम जू’ यांचे धाम आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातील मथुरा येथे संत मीराबाई जन्मोत्सवात झाले सहभागी

November 23rd, 06:27 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेश मधील मथुरा येथे संत मीराबाई यांच्या 525 व्या जयंती निमित्त आयोजित संत मीराबाई जन्मोत्सव कार्यक्रमात भाग घेतला. पंतप्रधानांनी यावेळी संत मीराबाई यांच्या स्मरणार्थ विशेष टपाल तिकीट आणि नाणे प्रकाशित केले. या ठिकाणी आयोजित प्रदर्शनालाही पंतप्रधानांनी भेट दिली आणि सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित राहिले. संत मीराबाई यांच्या स्मृती प्रीत्यर्थ वर्षभर चालणार्‍या कार्यक्रमांची आज सुरुवात झाली.

मीराबाई आपल्या देशातील महिलांसाठी प्रेरणा: पंतप्रधान मोदी मन की बात मध्ये

October 29th, 11:00 am

माझ्या प्रिय कुटुंबियांनो, नमस्कार ! ‘मन की बात’ मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. हा भाग, देशभरात सर्वत्र सणांचा उत्साह असताना होत आहे. आपणा सर्वांना येणाऱ्या सर्व सणांसाठी खूप खूप शुभेच्छा!

संत मीराबाई यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी देशबांधवांना दिल्या शुभेच्छा

October 28th, 06:32 pm

संत मीराबाई यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. पंतप्रधानांनी संत मीराबाईंना ‘भगवान कृष्णाच्या अतुलनीय भक्त’ असे संबोधले आहे. मीराबाईंची भजने प्रत्येक घरात गायली जात असून मीराबाईंचे जीवन समाजासाठी प्रेरणादायी असल्याचेही पंतप्रधान म्हणाले.