अंतराळ क्षेत्रातील सुधारणांचा देशातील तरुणांना फायदा: मन की बात दरम्यान पंतप्रधान मोदी
August 25th, 11:30 am
मित्रांनो, देशातील युवावर्गाला अंतराळ क्षेत्रातील सुधारणांमुळे देखील खूप फायदा झाला आहे, त्यामुळे मी असा विचार केला की आज 'मन की बात' मध्ये अंतराळ क्षेत्राशी संबंधित माझ्या काही तरुण मित्रांशी का बोलू नये! माझ्यासोबत बोलण्यासाठी स्पेस टेक स्टार्ट अप- गॅलेक्स आय चा चमू सहभागी होत आहे. हा स्टार्ट-अप- नवं उद्योग, आयआयटी-मद्रासच्या माजी विद्यार्थ्यांनी सुरू केला होता. ही सर्व तरुण मंडळी- सुयश, डेनिल, रक्षित, किशन आणि प्रणित, आज दूरध्वनीवरून आपल्यासोबत आहेत. चला, या तरुणांचे अनुभव जाणून घेऊया.भारत-पोलंड संयुक्त निवेदन "धोरणात्मक भागिदारीची स्थापना”
August 22nd, 08:21 pm
पोलंड प्रजासत्ताकाचे पंतप्रधान माननीय श्री डोनाल्ड टस्क यांच्या निमंत्रणावरून, भारतीय प्रजासत्ताकाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 21-22 ऑगस्ट 2024 या कालावधीत पोलंडला औपचारिक भेट दिली. दोन्ही राष्ट्रे आपल्या राजनैतिक संबंधांचा 70 वा वर्धापन दिन साजरा करत असताना ही ऐतिहासिक भेट झाली.पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांच्यासमवेत संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये पंतप्रधान मोदी यांनी दिलेले निवेदन
August 22nd, 03:00 pm
वॉर्सासारख्या सुंदर शहरामध्ये अतिशय उत्साहात केलेले स्वागत, भव्य आदरातिथ्य, सत्कार आणि मित्रत्वाच्या नात्याने भारलेले शब्द, यासाठी मी पंतप्रधान टस्क यांचे अगदी हृदयापासून आभार व्यक्त करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रियात व्हिएन्ना इथे भारतीय समुदायाला केलेले संबोधन
July 10th, 11:00 pm
सुरवात करू मी ? ऑस्ट्रियाचे सन्माननीय अर्थव्यवस्था विभाग आणि श्रम मंत्री, भारतीय समुदायाचा माझा सर्व मित्रवर्ग,शुभचिंतक आपणा सर्वाना नमस्कार.पंतप्रधानांनी ऑस्ट्रिया येथील भारतीय समुदायाला संबोधित केले
July 10th, 10:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ व्हिएन्ना येथे भारतीय समुदायाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधित केले.व्हिएन्ना येथे आगमन झाल्यानंतर तेथील समुदायाने विशेष स्नेहाने आणि आपुलकीने पंतप्रधानांचे स्वागत केले.ऑस्ट्रियाचे श्रम आणि अर्थव्यवस्था विभागाचे मंत्री मार्टिन कोचर देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. संपूर्ण ऑस्ट्रियातील विविध ठिकाणचे भारतीय या कार्यक्रमात सहभागी झाले होते.वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या संसद संस्कृत प्रतियोगिताच्या पारितोषिक वितरण समारंभातील पंतप्रधानांच्या भाषणाचा वृतांत
February 23rd, 11:00 am
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, काशी विद्वत परिषदेचे अध्यक्ष प्रोफेसर वशिष्ठ त्रिपाठी जी, काशी विश्वनाथ विश्वस्त परिषदेचे अध्यक्ष प्रोफेसर नागेंद्र जी, राज्य सरकारचे मंत्री आणि इतर लोकप्रतिनिधी, आदरणीय विद्वान, सहभागी मित्र, महिला आण सभ्य जन ,वाराणसी येथील काशी हिंदू विद्यापीठामध्ये स्वातंत्र्य सभागार येथे आयोजित सांसद संस्कृत प्रतियोगितेच्या पारितोषिक वितरण समारंभात पंतप्रधानांचा सहभाग
February 23rd, 10:20 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी येथील काशी हिंदू विद्यापीठामध्ये स्वातंत्र्य सभागार येथे आयोजित सांसद संस्कृत प्रतियोगितेच्या पारितोषिक वितरण समारंभात भाग घेतला. तसेच त्यांनी यावेळी काशी सांसद स्पर्धा आणि एक कॉफी टेबल बुक यांचे प्रकाशनही केले. पंतप्रधानांनी या कार्यक्रमात काशी सांसद ज्ञान स्पर्धा, काशी सांसद छायाचित्रण स्पर्धा तसेच काशी सांसद संस्कृत स्पर्धा या स्पर्धांच्या विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरवले तसेच वाराणसीमध्ये संस्कृत विषय शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तके, गणवेश संच, संगीताची वाद्ये तसेच गुणवत्ता शिष्यवृत्ती यांचे वितरण केले. त्यांनी काशी सांसद छायाचित्रण स्पर्धा दालनाला देखील भेट दिली आणि ‘संवरती काशी’ या संकल्पनेवर आधारित स्पर्धेत आपापल्या छायाचित्रांच्या प्रवेशिकांसह सहभागी झालेल्या स्पर्धकांशी संवाद साधला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रील प्रभूपाद जी यांच्या 150 व्या जयंतीदिनानिमत्त आयोजित कार्यक्रमामध्ये केलेले भाषण
February 08th, 01:00 pm
हरे कृष्ण! हरे कृष्ण! हरे कृष्ण! आज तुम्ही सर्वजण इथे आला आहात, त्यामुळे भारत मंडपम् ची भव्यता आणखी वाढली आहे. या भवनाची उभारणी करताना, त्याच्या मूळाशी असलेला विचार भगवान बसवेश्वर यांच्या अनुभव मंडपम् बरोबर या भारत मंडपम् ची सांगड घातली आहे. अनुभव मंडपम् प्राचीन भारतामध्ये आध्यात्मिक चर्चा-परिसंवाद यांचे केंद्र होते. अनुभव मंडपम् लोक कल्याणाची भावना आणि संकल्प यांचे ऊर्जा केंद्र होते. आज श्रील भक्तिसिद्धान्त सरस्वती गोस्वामी प्रभुपाद जी यांच्या 150 व्या जयंती निमित्त आयोजित या कार्यक्रमामध्येही अशीच ऊर्जा, असेच चैतन्य दिसून येत आहे. आमचा विचारही असाच होता की, हे भवन, भारताचे आधुनिक सामर्थ्य आणि प्राचीन मूल्ये अशा दोन्ही गोष्टींचे केंद्र बनले पाहिजे.अलिकडेच, काही महिन्यांपूर्वी जी -20 शिखर परिषदेच्या माध्यमातून इथूनच नवीन भारताच्या सामर्थ्याचे दर्शन अवघ्या जगाला झाले होते. आणि आज इथेच, ‘वर्ल्ड वैष्णव कन्व्हेंशन’चे आयोजन करण्याची संधी मोठ्या सद्भाग्याने मिळत आहे. आणि इतकेच नाही तर, भारताची जी प्रतिमा आहे... जिथे विकासही आहे आणि वारसाही आहे, अशा दोन्ही गोष्टींचा संगम घडून आला आहे. जिथे आधुनिकतेचे स्वागतही आहे आणि आपल्या ओळखीविषयी अभिमानही आहे.पंतप्रधानांनी श्रील प्रभुपादजी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला केले संबोधित
February 08th, 12:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत प्रगती मैदान येथील भारत मंडपम येथे श्रील प्रभुपादजी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधानांनी यावेळी आचार्य श्रील प्रभुपाद यांच्या पुतळ्याला पुष्पांजली वाहिली आणि त्यांच्या सन्मानार्थ एक स्मरणार्थ टपाल तिकीट तसेच नाणे जारी केले. गौडीया मिशनचे संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांनी वैष्णव पंथाच्या मुलभूत तत्वांचे जतन करण्यात तसेच त्यांचा प्रसार करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली.आई श्री सोनल मातेच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात पंतप्रधानांचा व्हिडिओ संदेश
January 13th, 12:00 pm
वर्तमान गादीपति- पूज्य कंचन माता व्यवस्थापक- पूज्य गिरीश आपा पौषच्या पवित्र महिन्यात आज आपण सगळे आई श्री सोनल मातेच्या जन्मशताब्दी सोहळ्याला उपस्थित आहोत. आई श्री सोनल मातेच्या आशीर्वादामुळेच मला या पवित्र सोहळ्याच्या आयोजनात सहभागी होण्याचे सौभाग्य लाभले आहे. मी संपूर्ण चारण समाजाचे, सर्व व्यवस्थापकांचे आणि सोनल मातेच्या सर्व भक्तांचे अभिनंदन करतो. मधडा धाम हे चारण समाजासाठी श्रद्धेचे केंद्र आहे , शक्तीचे केंद्र आहे , संस्कार आणि परंपरांचे केंद्र आहे. श्री सोनल मातेच्या चरणी मी विनम्र अभिवादन करतो.पंतप्रधानांनी आई श्री सोनल माता यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमाला व्हिडिओ संदेशाद्वारे केले संबोधित
January 13th, 11:30 am
तीन दिवसीय जन्मशताब्दी सोहळ्यामध्ये आलेल्या सोनल माता यांच्या आठवणी आपल्यासमवेत आहेत असे त्यांनी नमूद केले आणि सांगितले की कोणत्याही युगामध्ये भारतात अवतारी व्यक्तिमत्त्वांची कधीही कमतरता नव्हती या वस्तुस्थितीचे भगवती स्वरुपा सोनल माँ या साक्षात उदाहरण होत्या. गुजरात आणि सौराष्ट्र ही विशेषत्वाने संत आणि महान विभूतींची भूमी आहे असे नमूद करत पंतप्रधान मोदी म्हणाले की या भागात अनेक संत आणि महान व्यक्तींनी संपूर्ण मानवतेसाठी आपल्या ज्ञानाचा प्रकाश पसरवला. पवित्र गिरनार पर्वत हा भगवान दत्तात्रय आणि अनेक संतांचे स्थान असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. पंतप्रधान म्हणाले, सौराष्ट्रच्या या शाश्वत संत परंपरेत श्री सोनल माता आधुनिक युगासाठी प्रकाशस्तंभासारख्या होत्या. त्यांची आध्यात्मिक ऊर्जा, मानवतावादी शिकवण आणि तपश्चर्येने त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक अद्भुत दैवी आकर्षण निर्माण केले जे आजही जुनागढ आणि मढडा येथील सोनल धाममध्ये अनुभवता येते.”140 कोटी जनता अनेक बदल घडवून आणत आहे: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
November 26th, 11:30 am
‘मन की बात’ मध्ये आपले स्वागत आहे. आज 26 नोव्हेंबर. हा दिवस आपण कधीही विसरू शकत नाही. याच दिवशी आपल्या देशावर सर्वात भीषण दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी मुंबई आणि संपूर्ण देशच हादरवून टाकला होता. पण हेच भारताचे सामर्थ्य आहे की त्या हल्ल्यातून आपण सावरलो आणि आता अत्यंत धैर्याने दहशतवादाचा पाडाव करत आहोत. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात ज्यांनी आपले प्राण गमावले त्या सर्वाना मी श्रद्धांजली अर्पण करतो. या हल्ल्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या आपल्या शूरवीरांचे आज देश स्मरण करत आहे.मध्यप्रदेशात चित्रकूट इथे झालेल्या तुळसीपीठ कार्यक्रमात, पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 27th, 03:55 pm
सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित पूजनीय जगद्गुरु श्री रामभद्राचार्यजी, इथे आलेली सर्व तपस्वी ज्येष्ठ संत मंडळी, ऋषी मंडळी, मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल, मुख्यमंत्री बंधू शिवराजजी, उपस्थित इतर सर्व मान्यवर आणि सभ्य स्त्री पुरुष हो!PM addresses programme at Tulsi Peeth in Chitrakoot, Madhya Pradesh
October 27th, 03:53 pm
PM Modi visited Tulsi Peeth in Chitrakoot and performed pooja and darshan at Kanch Mandir. Addressing the gathering, the Prime Minister expressed gratitude for performing puja and darshan of Shri Ram in multiple shrines and being blessed by saints, especially Jagadguru Rambhadracharya. He also mentioned releasing the three books namely ‘Ashtadhyayi Bhashya’, ‘Rambhadracharya Charitam’ and ‘Bhagwan Shri Krishna ki Rashtraleela’ and said that it will further strengthen the knowledge traditions of India. “I consider these books as a form of Jagadguru’s blessings”, he emphasized.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’(104 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
August 27th, 11:30 am
माझ्या प्रिय परिवारातील सदस्यांनो, नमस्कार. मन की बात च्या ऑगस्ट भागात आपले पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. मला आठवत नाही की असं झालं असेल की श्रावणाचा महिना असेल आणि दोन दा मन की बातचा कार्यक्रम प्रसारित झाला असेल. पण यावेळी असंच होत आहे. श्रावण म्हणजे सदाशिवाचा महिना, उत्सव आणि उल्हासाचा महिना. चांद्रयानाच्या यसस्वीतेने या उत्सवाच्या वातावरणाला कित्येक पटींनी उत्साहपूर्ण बनवलं आहे. चांद्र यान चंद्रमावर पोहचण्याच्या घटनेस आता तीन दिवसांहून अधिक काळ गेला आहे. हे यश इतकं मोठं आहे की त्याची चर्चा जितकी केली तर ती कमीच आहे. जेव्हा मी आपल्याशी चर्चा करत आहे तर मला एक जुनी कविता आठवत आहे.जी20 आरोग्यमंत्र्यांच्या बैठकीत पंतप्रधानांनी दिलेला व्हिडिओ संदेश
August 18th, 02:15 pm
गांधीजींनी आरोग्य हा इतका महत्त्वाचा मुद्दा मानला की त्यांनी या विषयावर 'की टू हेल्थ' (आरोग्याची गुरुकिल्ली) या नावाचे पुस्तक लिहिले. निरोगी असणे म्हणजे मन आणि शरीर सुसूत्र आणि समतोल स्थितीत असणे म्हणजेच आरोग्य हा जीवनाचा मोठा पाया आहे, असे त्यांनी सांगितले होते. आपल्याकडे संस्कृतमध्ये एक श्लोक आहे:जी 20 आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीला पंतप्रधानांनी केले संबोधित
August 18th, 01:52 pm
या बैठकीला संबोधित करताना पंतप्रधानांनी, भारतातील आरोग्य सेवा क्षेत्रातील 2.1 दशलक्ष डॉक्टर, 3.5 दशलक्ष परिचारिका, 1.3 दशलक्ष निमवैद्यकीय कर्मचारी, 1.6 दशलक्ष औषध उत्पादक आणि विक्रेते तसेच इतर लाखो लोकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.जागतिक संस्कृत दिनाच्या पंतप्रधानांकडून शुभेच्छा
August 12th, 08:54 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक संस्कृत दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. संस्कृत भाषा लोकप्रिय करण्यासाठी काम करणाऱ्यांच्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली आहे. त्यांनी मन की बात मधील दोन उदाहरणे सामायिक केली ज्यामध्ये त्यांनी संस्कृतचे महत्त्व आणि सौंदर्य विशद केले. तरुणांमध्ये संस्कृतची लोकप्रियता वाढत असल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (90 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
June 26th, 11:30 am
ज्यांच्या मनामध्ये काही वर्षांपूर्वी अंतराळ क्षेत्राची प्रतिमा एखाद्या गुप्त मोहिमेसारखी होती, तेच हे युवक आज अंतराळ क्षेत्रामध्ये काम करीत आहेत. मात्र देशाने अंतराळ क्षेत्रामध्ये सुधारणा घडवून आणल्या, आणि आता युवकही उपग्रह प्रक्षेपित करण्याचे काम करीत आहेत. ज्यावेळी देशाचा युवक आकाशाला गवसणी घालण्यासाठी सिद्ध असतो, तर मग आपला देश या कामामध्ये मागे कसा काय राहू शकेल?Indian freedom struggle blessed with energy of equality, humanity & spiritualism received from the Saints: PM
February 05th, 05:54 pm
Prime Minister Narendra Modi dedicated to the nation the ‘Statue of Equality’ in Hyderabad. The 216-feet tall Statue of Equality commemorates the 11th century Bhakti Saint Sri Ramanujacharya, who promoted the idea of equality in all aspects of living including faith, caste and creed.