पंतप्रधान मोदींचे वाराणसीतील मतदारांशी व्हिडिओ संदेशाद्वारे हितगुज

May 30th, 02:32 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी या त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील मतदारांशी व्हिडिओ संदेशाद्वारे संवाद साधला. बाबा विश्वनाथांची अपार कृपा आणि काशीवासीयांच्या आशीर्वादामुळेच या शहराचे प्रतिनिधित्व शक्य होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळची या निवडणूक नवीन काशीसह नवा आणि विकसित भारत घडवण्याची संधी असल्याचे नमूद करत, पंतप्रधानांनी काशीतील रहिवाशांना, विशेषत: तरुण, महिला आणि शेतकऱ्यांना 1 जून रोजी विक्रमी संख्येने मतदानात सहभागी होण्याचे आवाहन केले.

अमेठी खासदार क्रीडा स्पर्धा 2023 च्या समारोप समारंभात पंतप्रधानांच्या व्हिडिओ संदेशाचा मूळ मजकूर

October 13th, 01:00 pm

अमेठी येथील माझ्या प्रिय कुटुंबियांनो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. अमेठी खासदार क्रीडा स्पर्धेच्या समारोप सत्रात तुमच्यासोबत असणे आणि या सत्रात सहभागी होणे, हे माझ्यासाठी खूपच विशेष आहे. देशात खेळांच्या दृष्टीने हा महिना अतिशय शुभ आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत आपल्या खेळाडूंनी पदकांचे शतक ओलांडले आहे. या स्पर्धा सुरू असतानाच अमेठीतील खेळाडूंनीही क्रीडा क्षेत्रात आपले कौशल्य दाखवले आहे. खासदार क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचे मी अभिनंदन करतो. या स्पर्धेतून मिळालेली नवी ऊर्जा आणि आत्मविश्वास तुम्हालाही नक्कीच जाणवत असेल, या संपूर्ण प्रदेशातील लोकांना ते जाणवत असेल आणि केवळ ऐकूनच मलाही ते जाणवू लागते. हा उत्साह आणि आत्मविश्वास आपल्याला कायम राखायचा आहे, तो वाढवायचा आहे, त्याची जोपासना करायची आहे, खत-पाणी द्यायचे आहे. गेल्या 25 दिवसात तुम्हाला मिळालेला अनुभव हा तुमच्या क्रीडा कारकीर्दीसाठी एक उत्तम पायाभरणी ठरणारा आहे. या मोहिमेत शिक्षक, निरीक्षक, शाळा आणि महाविद्यालयाच्या प्रतिनिधींच्या भूमिकेत सहभागी होऊन या युवा खेळाडूंना पाठिंबा देणाऱ्या आणि प्रोत्साहन देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मी अभिनंदन करतो. एक लाखापेक्षा जास्त खेळाडूंचे एकत्र येणे, ते सुद्धा इतक्या छोट्या भागात, ही निश्चितच मोठी गोष्ट आहे. अमेठीच्या खासदार भगिनी स्मृती इराणी जी यांचे मी विशेष अभिनंदन करतो, ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला.

अमेठी खासदार क्रीडा स्पर्धा 2023 च्या सांगता समारंभाला पंतप्रधानांनी केले संबोधित

October 13th, 12:40 pm

अमेठी खासदार क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये सहभागी खेळाडूंशी जोडले जाणे, हे विशेष आनंदाचे असल्याच्या भावना पंतप्रधानांनी कार्यक्रमाला संबोधित करताना व्यक्त केल्या. भारतीय खेळाडूंनी आशियाई स्पर्धेत पदकांचे शतक झळकावले आहेच, हा महिना देशातील खेळांसाठी शुभ ठरला आहे, असे ते म्हणाले. अमेठीच्या अनेक खेळाडूंनी अमेठी खासदार क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेऊन यात आपली क्रीडा प्रतिभा जगासमोर आणली असल्याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. या स्पर्धेतून खेळाडूंना मिळालेली नवी ऊर्जा आणि आत्मविश्वास जाणवत असून आता सर्वोत्तम फलनिष्पत्तीसाठी या उत्साहाची जोपासना, संवर्धन करण्याची गरज असल्याचे, ते म्हणाले. गेल्या 25 दिवसात तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या क्रीडा कारकिर्दीसाठी अत्यंत बहुमोल ठरेल, असे पंतप्रधान म्हणाले. शिक्षक, प्रशिक्षक, शाळा किंवा महाविद्यालयाचा प्रतिनिधी अशा विविध भूमिकेत या महाभियानात सहभागी होऊन युवा खेळाडूंना पाठिंबा आणि प्रोत्साहन देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे अभिनंदन पंतप्रधानांनी केले. एक लाखाहून अधिक खेळाडूंचा मेळावा ही एक मोठी बाब असल्याचे अधोरेखित करत त्यांनी या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करणाऱ्यांचे आणि विशेषत: अमेठीच्या खासदार स्मृती इराणी यांचे अभिनंदन केले.