वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या संसद संस्कृत प्रतियोगिताच्या पारितोषिक वितरण समारंभातील पंतप्रधानांच्या भाषणाचा वृतांत
February 23rd, 11:00 am
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, काशी विद्वत परिषदेचे अध्यक्ष प्रोफेसर वशिष्ठ त्रिपाठी जी, काशी विश्वनाथ विश्वस्त परिषदेचे अध्यक्ष प्रोफेसर नागेंद्र जी, राज्य सरकारचे मंत्री आणि इतर लोकप्रतिनिधी, आदरणीय विद्वान, सहभागी मित्र, महिला आण सभ्य जन ,वाराणसी येथील काशी हिंदू विद्यापीठामध्ये स्वातंत्र्य सभागार येथे आयोजित सांसद संस्कृत प्रतियोगितेच्या पारितोषिक वितरण समारंभात पंतप्रधानांचा सहभाग
February 23rd, 10:20 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी येथील काशी हिंदू विद्यापीठामध्ये स्वातंत्र्य सभागार येथे आयोजित सांसद संस्कृत प्रतियोगितेच्या पारितोषिक वितरण समारंभात भाग घेतला. तसेच त्यांनी यावेळी काशी सांसद स्पर्धा आणि एक कॉफी टेबल बुक यांचे प्रकाशनही केले. पंतप्रधानांनी या कार्यक्रमात काशी सांसद ज्ञान स्पर्धा, काशी सांसद छायाचित्रण स्पर्धा तसेच काशी सांसद संस्कृत स्पर्धा या स्पर्धांच्या विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरवले तसेच वाराणसीमध्ये संस्कृत विषय शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तके, गणवेश संच, संगीताची वाद्ये तसेच गुणवत्ता शिष्यवृत्ती यांचे वितरण केले. त्यांनी काशी सांसद छायाचित्रण स्पर्धा दालनाला देखील भेट दिली आणि ‘संवरती काशी’ या संकल्पनेवर आधारित स्पर्धेत आपापल्या छायाचित्रांच्या प्रवेशिकांसह सहभागी झालेल्या स्पर्धकांशी संवाद साधला.पाली येथे आयोजित केलेल्या 'संसद खेल महाकुंभ' कार्यक्रमामध्ये दूरदृश्य प्रणालीव्दारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण.
February 03rd, 12:00 pm
माझ्या प्रिय युवा मित्रांनो, पालीमध्ये आपल्यामधील खेळाची प्रतिभा दाखवणार्या सर्व खेळाडूंचे खूप खूप अभिनंदन! खेळामध्ये पराभव ही गोष्ट तर कधीच नसते. कारण खेळामध्ये एक तुम्ही जिंकता तरी किंवा तुम्ही काही नवीन शिकता तरी! म्हणूनच मी सर्व खेळाडूंबरोबरच इथं उपस्थित असलेल्या त्यांच्या प्रशिक्षकांना आणि खेळाडूंचे जे कुटुंबिय आहेत, त्या सर्वांना शुभेच्छा देतो.पंतप्रधानांनी पाली संसद खेळ महाकुंभला केले संबोधित
February 03rd, 11:20 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एका व्हिडिओ संदेशाद्वारे पाली संसद खेल महाकुंभाला संबोधित केले. सर्व स्पर्धकांनी त्यांच्या उल्लेखनीय क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन केल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले. “खेळात कधीही पराभव होत नाही; तुम्ही एकतर जिंकता किंवा काहीतरी शिकता, त्यामुळे मी केवळ सर्व खेळाडूंनाच नव्हे तर त्यांच्या प्रशिक्षकांना आणि उपस्थित असलेल्या कुटुंबीयांनाही माझ्या शुभेच्छा देतो.” असे पंतप्रधान म्हणाले.