26 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या संविधान दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान होणार सहभागी
November 24th, 05:14 pm
1949 मध्ये संविधान सभेने भारतीय राज्यघटना स्वीकारल्याच्या स्मरणार्थ देश 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करणार आहे. या ऐतिहासिक तारखेच्या महत्त्वाला योग्य ओळख देण्याच्या पंतप्रधानांच्या दूरदृष्टीच्या आधारे 2015 मध्ये संविधान दिन साजरा करण्यास सुरुवात झाली.गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी 2010 मध्ये आयोजित केलेल्या संविधान गौरव यात्रे मध्येही या दृष्टीकोनाची मुळे सापडतात.