शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

September 16th, 01:30 pm

आज, जेव्हा संपूर्ण जग महामारीनंतर ,आर्थिकदृष्ट्या पूर्वपदावर येण्यासाठीच्या आव्हानांना तोंड देत असताना ,शांघाय सहकार्य संघटनेची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. ,शांघाय सहकार्य संघटनेतील सदस्य देश जागतिक सकल देशांतर्गत उत्पादनात सुमारे 30 टक्के योगदान देतात आणि जगातील 40 टक्के लोकसंख्या शांघाय सहकार्य संघटनेतील सदस्य देशांमध्ये राहते. भारत शांघाय सहकार्य संघटनेतील सदस्य देशांमधील अधिक सहकार्य आणि परस्पर विश्वासाचे समर्थन करतो. महामारी आणि युक्रेनमधील संकटामुळे जागतिक पुरवठा साखळीमध्ये अनेक अडथळे आले. त्यामुळे संपूर्ण जगाला अभूतपूर्व ऊर्जा आणि अन्न संकटाचा सामना करावा लागत आहे.शांघाय सहकार्य संघटनेने आमच्या प्रदेशात विश्वासार्ह, लवचिक आणि वैविध्यपूर्ण पुरवठा साखळी विकसित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी उत्तम संपर्क सुविधा आवश्यक आहेत , त्याचप्रमाणे आपण सर्वांनी एकमेकांना माल वाहतुकीसंदर्भातील पूर्ण अधिकार देणेही महत्त्वाचे आहे.

एससीओ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधानांचे समरकंद येथे आगमन

September 15th, 10:01 pm

उझबेकिस्तानचे राष्ट्रपती महामहीम शौकत मिर्झीयोयेव्ह यांनी दिलेल्या आमंत्रणावरून, एससीओ अर्थात शांघाय सहकार्य संघटनेतील सदस्य देशांच्या राष्ट्राध्यक्ष मंडळाच्या 22 व्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काल उझबेकिस्तानमधील समरकंद येथे आगमन झाले.

उझबेकिस्तानच्या दौऱ्यापूर्वी पंतप्रधानांचे निवेदन

September 15th, 02:15 pm

उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शवकत मिरझीयोयेव यांच्या निमंत्रणावरून मी, शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) सदस्य राष्ट्रांच्या प्रमुखांच्या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी समरकंदला भेट देणार आहे.