साहिबाबाद आरआरटीएस स्थानक ते न्यू अशोक नगर आरआरटीएस स्थानकादरम्यान नमो भारत रेल्वे गाडीतील प्रवासादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थी आणि ट्रेन लोको पायलटशी साधलेला संवाद

January 05th, 08:50 pm

मनात आपल्या आपल्या बाळगून एक लक्ष्य, ध्येय आपुले घेऊनी प्रत्यक्ष

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमो भारत रेल्वे मधील संवाद केला सामायिक

January 05th, 08:48 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज साहिबााबाद आरआरटीएस स्थानक ते न्यू अशोक नगर आरआरटीएस स्थानकापर्यंत नमो भारत रेल्वे द्वारे प्रवास केला. आपल्या या प्रवासादरम्यान त्यांनी युवा मित्रांशी प्रेमळ संवाद साधला, ज्यांनी पंतप्रधानांना अनेक चित्रे आणि कलाकृती भेट दिल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीमध्ये 12,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे केले उद्घाटन आणि पायाभरणी

January 05th, 12:15 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्ली इथे 12,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. प्रादेशिक दळणवळणीय जोडणीचा विस्तार करणे आणि नागरिकांसाठी प्रवासात सुलभता सुनिश्चित करणे हे या प्रकल्पांचे मुख्य उद्दिष्ट आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज साहिबाबाद आरआरटीएस स्थानक ते न्यू अशोक नगर आरआरटीएस स्थानकापर्यंत नमो भारत रेल्वे गाडीने प्रवास देखील केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 5 जानेवारी रोजी दिल्ली इथे 12,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार

January 04th, 05:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 5 जानेवारी रोजी दुपारी 12.15 वाजण्याच्या सुमाराला दिल्ली इथे 12,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. त्याचबरोबर उद्या सकाळी 11 वाजता ते साहिबाबाद आरआरटीएस स्थानक ते न्यू अशोक नगर आरआरटीएस स्थानकापर्यंत नमो भारत रेल्वे गाडीतून प्रवास देखील करणार आहेत.