भारतीय उद्योग महासंघ- सीआयआय च्या 2021 च्या वार्षिक बैठकीत पंतप्रधानांनी केलेले भाषण

August 11th, 06:52 pm

भारताच्या प्रगतीला गती देणाऱ्या उद्योगजगतातील सर्व धुरीणांना, सीआयआयच्या सर्व सदस्यांना माझा नमस्कार ! केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे वरिष्ठ सहकारी, सीआयआय चे अध्यक्ष श्री टी व्ही नरेंद्रन जी, उद्योग संघाचे सर्व नेते, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मुत्सद्दी नीतिज्ञ, विविध देशांत नियुक्त असलेले भारतीय राजदूत, बंधू आणि भगिनींनो, !

भारतीय औद्योगिक महासंघ (सीआयआय) च्या वार्षिक बैठकीत पंतप्रधानांचे भाषण

August 11th, 04:30 pm

यावेळी बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, ही आजची सीआयआय बैठक, 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला होत आहे, आपल्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवादरम्यान होत आहे, ही विशेष बाब आहे. भारतीय उद्योगांना नवे संकल्प करण्याची, नवी उद्दिष्टे निश्चित करण्याची ही एक मोठी संधी आहे. आत्मनिर्भर भारताचा आपला संकल्प प्रत्यक्षात साकार करण्याची सर्वात मोठी जबाबदारी भारतीय उद्योगजगताची आहे, असे पंतप्रधान पुढे म्हणाले. महामारीच्या काळात, उद्योगक्षेत्राने दाखवलेल्या चिवट वृत्तीबद्दल, त्यांनी उद्योगजगताचे कौतुक केले.

गुजरातमध्ये विविध प्रकल्पांच्या उद्‌घाटन आणि लोकार्पण प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

July 16th, 04:05 pm

मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि गांधीनगरचे खासदार अमित शाह , रेल्वे मंत्री अश्विनी वैष्‍णव , गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी , उपमुख्यमंत्री नितिन भाई, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दर्शना जरदोश , गुजरात सरकारचे अन्य मंत्रिगण, संसदेतले माझे सहकारी आणि गुजरात प्रदेश भारतीय जनता पार्टीचे अध्‍यक्ष सीआर पाटील, अन्‍य खासदार, आमदार आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, तुम्हा सर्वांना नमस्‍कार.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधल्या विविध प्रकल्पांचे केले उद्‌घाटन आणि लोकार्पण

July 16th, 04:04 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधे, रेल्वेच्या अनेक महत्वाच्या प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि राष्ट्रार्पण दूरदृश्य प्रणाली द्वारे केले. यावेळी गुजरात सायन्स सिटी मधल्या एक्वेटिक्स आणि रोबोटिक्स गॅलरीचे आणि नेचर पार्कचे उद्‌घाटनही पंतप्रधानांनी केले. गांधीनगर राजधानी- वाराणसी अतिजलद गाडी आणि गांधीनगर राजधानी ते वरेठा दरम्यानच्या मेमू सेवा गाडी या दोन नव्या गाड्यांना पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला.